Maharashtra MHT CET Result 2021 : एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर, रिझल्ट कुठं पाहायचा?

महाराष्ट्र राज्य सामान्य प्रवेश परीक्षा अर्थात महा सीईटी परीक्षेचा निकाल आज सांयकाळी 7 वाजता जाहीर झाला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात ट्विटव्दारे माहिती दिली होती.

Maharashtra MHT CET Result 2021 : एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर, रिझल्ट कुठं पाहायचा?
MHT CET 2021


MHT CET Result 2021 मुंबई : महाराष्ट्र राज्य सामान्य प्रवेश परीक्षा अर्थात महा सीईटी परीक्षेचा निकाल आज सांयकाळी 7 वाजता जाहीर झाला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात ट्विटव्दारे माहिती दिली होती. विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता राज्य सीईटी कक्षाकडून घेण्यात आलेल्या MHT-CET-2021 ऑनलाईन प्रवेश परीक्षेचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून https://mhtcet2021.mahacet.org या संकेतस्थळावर  पाहता येईल.

निकाल कुठं पाहणार?

भौतिकशास्त्र रसायनशास्त्र, गणित म्हणजे पीसीएम आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र अर्थात PCB या दोन्ही विषयांसाच्या ग्रुपचे निकाल प्रसिद्ध केले गेले आहेत. एमएचटी सीईटीचा निकाल cetcell.mahacet.org आणि mhtcet2021.mahacet.org या दोन अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध केला आहे. तुम्ही दोन्हीपैकी कोणत्याही वेबसाईटला भेट देऊन तुमचा निकाल पाहू शकता.

MHT CET निकाल कसा पाहायचा?

स्टेप 1: महाराष्ट्र CET च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
स्टेप 2: होम पेजवर तुम्हाला MHT CET स्कोअर कार्डची लिंक मिळेल.
स्टेप 3 : नवीन पेज उघडेल. येथे दिलेल्या जागेत तुमचा रोल नंबर आणि पासवर्ड (जन्मतारीख) यासारखी आवश्यक माहिती भरून लॉग-इन करा.
स्टेप 4: तुम्ही लॉग इन करताच तुमचा निकाल आणि स्कोअर कार्ड स्क्रीनवर पाहायला मिळेल.

स्वतंत्र गुणवत्ता यादी

एमएचटी सीईटी निकालासोबत गुणवत्ता यादी देखील प्रसिद्ध करण्यात आलीय  . B.Tech आणि B.Arch अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी अभ्यासक्रम आणि श्रेणीनिहाय स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात आलीय.  उमेदवारांना त्यांच्या गुणवत्ता यादीतील रँकच्या आधारे जागा वाटप केल्या जातील पण त्यासाठी आधी समुपदेशन केले जाईल.


इतर बातम्या: 

MHT CET Result 2021: एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार? निकाल कुठं पाहायचा

VIDEO : Pune | पुण्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेचा गोंधळ

MHT CET Result 2021 declared latest update check official website mhtcet2021.mahacet. org and cetcell.mahacet.org for score online

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI