Maharashtra MHT CET Result 2021 : एमएचटी सीईटीच्या निकालात 28 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल गुण, नांदेड कोल्हापूर आणि मुंबईचा डंका

महाराष्ट्रातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल बुधवारी सायंकाळी जाहीर झाला. एमएचटी सीईटी परीक्षेत राज्यातील 28 विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत.

Maharashtra MHT CET Result 2021 : एमएचटी सीईटीच्या निकालात 28 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल गुण, नांदेड कोल्हापूर आणि मुंबईचा डंका
MHT CET 2021


पुणे: महाराष्ट्रातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल बुधवारी सायंकाळी जाहीर झाला. एमएचटी सीईटी परीक्षेत राज्यातील 28 विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत. या परीक्षेला 4 लाख 14 हजार 968 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पीसीएम ग्रुपमधील 11 तर पीसीबी ग्रुपमधील 17 विद्यार्थ्यांनी पीसीबी ग्रुपमध्ये 100 पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत.

पीसीएम म्हणजेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या गटातील 11 विद्यार्थ्यांनी 100 टक्के पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत. तर, पीसीबी म्हणजेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र गटातील 17 विद्यार्थ्यांनी पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत. कोल्हापूरमधील तपन चिकनीस आणि मुंबईतील दिशी विंची यांनी पीसीएम तर नांदेडमधील फातेमा आयमन आणि अनिरुद्ध अनिवळे यांनी पीसीबी ग्रुपमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. पुण्यातील चार विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत.

2020 मध्ये राज्यातील 3 लाख 86 हजार 604 विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी सीईटी दिली होती. त्यावेळी 20 विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाईल गुण मिळवलं होते.

एमएचीटी सीईटी परीक्षेचा निकाल कसा पाहायचा?

स्टेप 1: महाराष्ट्र CET च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
स्टेप 2: होम पेजवर तुम्हाला MHT CET स्कोअर कार्डची लिंक मिळेल.
स्टेप 3 : नवीन पेज उघडेल. येथे दिलेल्या जागेत तुमचा रोल नंबर आणि पासवर्ड (जन्मतारीख) यासारखी आवश्यक माहिती भरून लॉग-इन करा.
स्टेप 4: तुम्ही लॉग इन करताच तुमचा निकाल आणि स्कोअर कार्ड स्क्रीनवर पाहायला मिळेल.

निकाल कुठं पाहणार?

भौतिकशास्त्र रसायनशास्त्र, गणित म्हणजे पीसीएम आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र अर्थात PCB या दोन्ही विषयांसाच्या ग्रुपचे निकाल जाहीर झाले आहेत. एमएचटी सीईटीचा निकाल cetcell.mahacet.org आणि mhtcet2021.mahacet.org या दोन अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येईल. तुम्ही दोन्हीपैकी कोणत्याही वेबसाईटला भेट देऊन तुमचा निकाल पाहू शकता.

इतर बातम्या:

राष्ट्रवादीत प्रवेश न करणाऱ्या नगरसेवकांची नावंही यादीत, टीम ओमी कलानीवर नामुष्की

या दिवाळीमध्ये खास आपल्या प्रियजनांना गिफ्ट करा ‘हा’ म्युच्युअल फंड, FD पेक्षा जास्त परतावा मिळेल!

Maharashtra MHT CET Result 2021 declared at mhtcet2021.mahacet. org and cetcell.mahacet.org check toppers list

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI