Scholarship exam fee : पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या फीमध्ये वाढ, शिक्षण विभागाचा निर्णय

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेची फी वाढवण्यात आली आहे.

Scholarship exam fee : पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या फीमध्ये वाढ, शिक्षण विभागाचा निर्णय
प्रातिनिधिक फोटो

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेची फी वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून यासंदर्भात शासन निर्णय जारीर करण्यात आला आहे. राज्य परीक्षा परिषदेकडून या वर्षीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

जुनी फी किती होती?

सन 2016-17 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी या इयत्तेकरिता घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या शुल्कात सुधारणा करण्यात आल्या होत्या. त्यानुसार त्यावेळी बिगर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रवेश शुल्क रु. 10/- वरुन रु.20/- करण्यास तसेच परीक्षा शुल्क रु. 50/- वरुन रु.60/- करण्यास मान्यता देण्यात आली होती व मागासवर्गीय व दिव्यांग विद्यार्थ्यासाठी प्रवेश शुल्क रु.10/- वरुन रु.20/- करण्यास मान्यता देण्यात आली होती.

नव्या फीचा तपशील

नव्या शासन निर्णयाप्रमाणं बिगर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रवेश शुल्क 50 रुपये तसेच परीक्षा शुल्क 150 रुपये करण्यात आलंय. मागासवर्गीय व दिव्यांग विद्यार्थ्यासाठी प्रवेश शुल्क 50 रुपये तर परीक्षा शुल्क 75 रुपये करण्यात आलं आहे.

फी वाढ करण्याचं कारण

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आवेदनपत्रे भरणे, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची छपाई, उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग, निकाल जाहीर करणे, गुणवत्ता याद्या तयार करणे इत्यादी कामकाजासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येतो. त्यामुळं, शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रवेश शुल्क व परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आलं आहे.

दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात परीक्षा

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात शिष्यवृत्ती परीक्षेचं आयोजन केलं जातं. 2022 मध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये नवं शुल्क लागू करण्यात येणार आहे.

इतर बातम्या:

पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडणाऱ्यांसाठी खूशखबर; टपाल विभागाने उचलले मोठे पाऊल, पहिल्यांदाच मिळणार ‘ही’ सुविधा

ड्रग्ज प्रकरणी आतापर्यंत 14 जणांची चौकशी, गरज पडल्यास प्रभाकर साईलची पुन्हा चौकशी करू: ज्ञानेश्वर सिंह

Maharashtra State Examination Council Scholarship exam of 5th and 8th exam fee increased by Education Department

Published On - 6:24 pm, Fri, 12 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI