ड्रग्ज प्रकरणी आतापर्यंत 14 जणांची चौकशी, गरज पडल्यास प्रभाकर साईलची पुन्हा चौकशी करू: ज्ञानेश्वर सिंह

मुंबई क्रुझ पार्टी प्रकरणी आतापर्यंत 14 जणांची चौकशी करण्यात आली आहे. प्रभाकर साईलची दोनवेळा चौकशी करण्यात आली असून गरज पडल्यास साईलसह इतरांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येईल, असं एनसीबीचे उपसंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितलं.

ड्रग्ज प्रकरणी आतापर्यंत 14 जणांची चौकशी, गरज पडल्यास प्रभाकर साईलची पुन्हा चौकशी करू: ज्ञानेश्वर सिंह
Gyaneshwar Singh
Follow us
| Updated on: Nov 12, 2021 | 6:10 PM

मुंबई: मुंबई क्रुझ पार्टी प्रकरणी आतापर्यंत 14 जणांची चौकशी करण्यात आली आहे. प्रभाकर साईलची दोनवेळा चौकशी करण्यात आली असून गरज पडल्यास साईलसह इतरांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येईल, असं एनसीबीचे उपसंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितलं.

ज्ञानेश्वर सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन क्रुझ पार्टी प्रकरणातील तपासाची माहिती दिली. या प्रकरणी आम्ही काही कागदपत्रं जमा केली आहेत. आमची टीम क्राईम सीनवर जाऊन आली. घटना कशी घडली ते समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. आतापर्यंत 14 ते 15 जणांची चौकशी करण्यात आली आहे. या सर्वांना गरज पडल्यास पुन्हा चौकशीसाठी बोलावलं जाईल. प्रभाकर साईललाही बोलावलं जाईल, असं सांगतानाच त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यांचं सहकार्य मिळणार आहे. देशाला नशामुक्त करण्यासाठी एनसीबीच्या कामात सहकार्य करण्याचं आश्वासन मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी दिलं आहे, असं सिंह म्हणाले. काही सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. काही मिळायचे बाकी आहेत, असंही ते म्हणाले.

तोपर्यंत निष्कर्ष काढता येणार नाही

ड्रग्ज प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यालाच प्राधान्य दिलं आहे. ही केस आव्हानात्मक आहे. आम्हाला लवकर चौकशी करायची आहे. काही साक्षीदारांची अजून चौकशी करायची आहे. त्यानतंर काही निष्कर्ष काढू. प्रभाकर साईल या मुख्य साक्षीदाराने साक्ष दिली आहे. त्याची दोनदा चौकशी केली आहे. पुरावे मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या वेगाने चौकशी सुरू आहे, त्यावर आम्ही समाधानी आहोत. आता चौकशी कधी पूर्ण होईल ते आताच सांगू शकत नाही. कारण चौकशी सुरू आहे. डेटा अॅनालाईज करायचा आहे. त्याचं लिंकिंग करायचं आहे. त्यानंतरच काही तरी निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, आर्यन खानची व्हिजिलन्सच्या टीमने चौकशी केली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

गोसावीचीही चौकशी करणार

केपी गोसावीला ताब्यात घेणार का? असा सवाल करण्यात आला असता गोसावीचा ताबा मिळावा म्हणून कोर्टात अर्ज दिल्याचं त्यांनी सांगितलं. गोसावी प्रकरणी कोर्टात अर्ज दिला आहे. त्यावर सोमवारी सुनावणी आहे. गोसावी पोलीस कोठडीत आहे. न्यायालयीन कोठडीत गेल्यावर कोर्टाच्या आदेशानंतर आम्ही त्यांची चौकशी करू, असं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

कोरोनाची लस न घेतल्याने चौघांचा मृत्यू; लस बंधनकारकच; जिनोम सिक्वेसिंगचा निष्कर्ष

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट? मुंबई सेंट्रल आगारातून पहिली एसटी धावली; राज्यात 826 एसटी रस्त्यावर

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण?, इस्लामपूर आगाराच्या बसवर अज्ञातांकडून दगडफेक

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.