एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण?, इस्लामपूर आगाराच्या बसवर अज्ञातांकडून दगडफेक

आज राज्यभरातील 17 डेपोमधून 36 बसेस बाहेर पडल्या. त्या बसमधून जवळपास 900 प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे. अशावेळी आज सांगलीच्या वाळवा तालुक्यातील इस्लामपूर आगारातून वाटेगावकडे गेलेल्या एसटी बसवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्याची घटना घडली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण?, इस्लामपूर आगाराच्या बसवर अज्ञातांकडून दगडफेक
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर आगाराज्या एसटी बसवर दगडफेक

सांगली : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी होत भाजप नेते ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवत आहेत. तर दुसरीकडे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, आज राज्यभरातील 17 डेपोमधून 36 बसेस बाहेर पडल्या. त्या बसमधून जवळपास 900 प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे. अशावेळी आज सांगलीच्या वाळवा तालुक्यातील इस्लामपूर आगारातून वाटेगावकडे गेलेल्या एसटी बसवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्याची घटना घडली आहे. (Stone pelting on ST bus at Islampur depot in Sangli district)

सांगलीच्या वाळवा तालुक्यातील इस्लामपूर आगारातून वाटेगाव येथे गेलेल्या एसटी बसवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्याची घटना घडलीय. यात एसटीच्या पुढच्या काचा फुटल्या आहेत. घटनास्थळी कासेगाव पोलीसांनी तत्काळ धाव घेतली. एसटी चालक आणि वाहक यांनी याबाबत कासेगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु झाल्यापासून बसवर दगडफेक होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन आता हिंसक वळण घेणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. इस्लामपूर आगारातून वाटेगाव येथे वाहक मनोज देसाई आणि ए. बी. देसाई या एस टी कर्मचाऱ्यांनी इस्लामपूर मधून दुपारी सव्वा दोनच्या सुमारास एस बस वाटेगावला रवाना करण्यात आली. दुपारी साडे तीनच्या सुमारास वाटेगाव येथील मुख्य चौकात बस आल्यानंतर 4 अज्ञात लोकांनी तोंडाला रुमाल बांधलेल्या अवस्थेत बसवर दगडफेक केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अनिल परब यांचा सूचक इशारा

एसटी कामगार कामावर परतले नाहीत तर सरकार वेगळा म्हणजेच नव्या भरती प्रक्रियेचा विचार करणार का? असा सवाल अनिल परब यांना विचारण्यात आला. त्यावेळी परब यांनी सूचक उत्तर दिलंय. सरकारला एसटी कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक आणि पवाशांचाही विचार करावा लागतो. त्यामुळे सरकार सर्वच पातळ्यांवर विचार करत आहे. एसटी कामगार कामावर आले नाहीत तर आम्ही अन्य पर्यायांचा विचार करु, असं अनिल परब म्हणाले. कालपर्यंत 2 हजार एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. यापुढे ही कारवाई अधिक कडक करु. एसटी कर्मचाऱ्यांचं कधीही न भरुन येणारं हे नुकसान गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत भरुन देणार का? असा सवालही अनिल परब यांनी केलाय.

इतर बातम्या :

राज्यात 7 महिन्यात 8 हजार प्राध्यापकांची भरती पूर्ण करणार, तर 5 हजार प्राध्यापकांना जुनी पेन्शन, उदय सामंतांची घोषणा

एसटी कर्मचारी आमचेच, भाजप नेत्यांकडून आंदोलनात घुसखोरी; जयंत पाटलांची भाजपवर टीका

Stone pelting on ST bus at Islampur depot in Sangli district

Published On - 5:37 pm, Fri, 12 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI