AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कोण नितेश राणे? त्यांच्या आरोपांना आम्ही मोजत नाही’, राणेंच्या आरोपांना अनिल परबांचं प्रत्युत्तर

आज आमदार नितेश राणे यांनीही आंदोलकांची भेट घेत ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही नितेश राणे यांनी निशाणा साधलाय. याबाबत अनिल परब यांना विचारलं असता, कोण नितेश राणे? त्यांच्या आरोपांना आम्ही मोजत नाही, असं प्रत्युत्तर परब यांनी दिलं आहे.

'कोण नितेश राणे? त्यांच्या आरोपांना आम्ही मोजत नाही', राणेंच्या आरोपांना अनिल परबांचं प्रत्युत्तर
नितेश राणे, अनिल देशमुख
| Edited By: | Updated on: Nov 12, 2021 | 3:48 PM
Share

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील आझाद मैदानात गेल्या चार दिवसांपासून एसटी कर्मचारी ठाण मांडून बसले आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत हे या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत. आज आमदार नितेश राणे यांनीही आंदोलकांची भेट घेत ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही नितेश राणे यांनी निशाणा साधलाय. याबाबत अनिल परब यांना विचारलं असता, कोण नितेश राणे? त्यांच्या आरोपांना आम्ही मोजत नाही, असं प्रत्युत्तर परब यांनी दिलं आहे. (Anil Parab’s reply to the criticism made by BJP MLA Nitesh Rane )

नितेश राणे यांचे आरोप आम्ही मोजतच नाही. कोण नितेश राणे? त्यांची मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याची पात्रता आहे का? त्यामुळे त्यांच्या आरोपांना आम्ही महत्व देत नाही, असं अनिल परब म्हणाले. तसंच कालपर्यंत 2 हजार एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. यापुढे ही कारवाई अधिक कडक करु. एसटी कर्मचाऱ्यांचं कधीही न भरुन येणारं हे नुकसान गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत भरुन देणार का? असा सवालही अनिल परब यांनी केलाय.

‘कर्मचाऱ्यांनी कामावर यावं, आम्ही संरक्षण देऊ’

अनेक कर्मचारी कामावर येत आहेत. काल सांगितलं होतं की कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना संरक्षण दिलं जाईल आणि जे अडवणूक करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कर्मचाऱ्यांनी एसटीच्या विलिनीकरणाच्या मागणीबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या कमिटीसमोर जावं आणि म्हणणं मांडावं. 12 आठवड्याच्या कालावधीत समितीचा जो अहवाल येईल तो आम्हाला आणि कर्मचाऱ्यांनाही मान्य असेल. आपण कामावर जा, कामावर गेलात तर आपलं नुकसान होणार नाही. राजकीय पक्ष राजकीय पोळ्या भाजतील, पण नुकसान आपल्याला सहन करावं लागेल, असं आवाहनही परब यांनी केलं.

‘विलिनीकरणाचा विषय उच्च न्यायालयातूनच सोडवला जाईल’

एसटीच्या विलिनीकरणाचा विषय उच्च न्यायालयातूनच सोडवला जाईल. सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर हे संपकऱ्यांना भडकावण्याचं काम करत आहेत. कर्मचाऱ्यांची जबाबदारी घ्यायला ते तयार नाहीत. कामगारांनी सदसद्विवेकबुद्धीने विचार करावा. कोरोना काळात एसटीचं मोठं नुकसान झालं आहे. आता संपकऱ्यांनी एसटी पुन्हा खड्ड्यात जाईल असं काही करु नये, असंही परब म्हणाले.

‘माझ्यावर आरोप करा, पण कामगारांचं नुकसान करु नका’

शरद पवार यांच्या एका व्हिडीओबाबत पत्रकारांनी विचारलं असता, पवारांचा व्हिडीओ मी पाहिलेला नाही. विलिनीकरण्याची मागणी दोन-तीन वा चार दिवसांत मान्य होऊ शकत नाही. समितीचा अहवाल आल्याशिवाय त्यावर निर्णय होऊ शकत नाही. पगाराबाबत काही मागण्या आहेत त्यावर चर्चा होऊ शकते. हायकोर्टाच्या निर्णयानुसार कमिटीच विषय हाताळेल आणि त्यानुसार निर्णय घेतला जाईल, असं परब यांनी स्पष्ट केलंय. तसंच माझ्यावर काय आरोप करायचे ते करा, पण कामगारांचं नुकसान करु नका. आज जे काही सुरु आहे त्यातून कामगारांचं नुकसान होत आहे. त्यांनाही माहिती आहे की आपण चुकीची मागणी लावून धरली आहे, असंही परब म्हणाले.

इतर बातम्या :

राज्यात 7 महिन्यात 8 हजार प्राध्यापकांची भरती पूर्ण करणार, तर 5 हजार प्राध्यापकांना जुनी पेन्शन, उदय सामंतांची घोषणा

सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावरुन नवे वादंग! संजय राऊतांची जहरी टीका; तर तक्रार दाखल करण्यासाठी भाजप आक्रमक

Anil Parab’s reply to the criticism made by BJP MLA Nitesh Rane

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.