सीबीएसई बोर्डाच्या 10वी आणि 12वी परीक्षांच्या वेळापत्रकामध्ये अत्यंत मोठे बदल, थेट हे पेपर आता..

| Updated on: Jan 05, 2024 | 7:34 PM

सीबीएसई बोर्डाकडून मोठे बदल करण्यात आले आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षेबद्दलचे हे बदल आहेत. काही दिवसांपूर्वीच दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक हे सीबीएसई बोर्डाकडून प्रसिद्ध करण्यात आले. मात्र, आता यामध्ये काही महत्वाचे बदल हे केले गेले आहेत.

सीबीएसई बोर्डाच्या 10वी आणि 12वी परीक्षांच्या वेळापत्रकामध्ये अत्यंत मोठे बदल, थेट हे पेपर आता..
Follow us on

मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड अर्थात सीबीएसई बोर्डाकडून अत्यंत महत्वाचे अपडेट आले आहे. 10वी आणि 12वीचे काही दिवसांपूर्वीच परीक्षेचे वेळापत्रक जाहिर करण्यात आले. ज्यामध्ये आता नुकताच काही बदल हे करण्यात आले. यामध्ये काही मोठे बदल झाले आहेत. सुधारित वेळापत्रक देखील जाहिर करण्यात आलंय. यामध्ये पेपर्स आणि काही महत्वाचे बदल हे करण्यात आले. ही बातमी 10वी आणि 12वीची सीबीएसई बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे.

परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये सीबीएसई बोर्डाकडून काही बदल हे करण्यात आले आहेत. सीबीएसच्या 10वी आणि 12वीच्या दोन्ही वेळापत्रकामध्ये हे बदल झाले आहेत. पूर्वी जो पेपर 4 मार्चला होणार होता तो पेपर आता 23 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे. रिटेल विषयाचा पेपर अगोदर 16 फेब्रुवारी 2024 रोजी होणार होता. आता तो 26 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे.

बारावीचा फॅशन स्टडीज विषयाचा पेपर यापूर्वी 11 मार्च 2024 रोजी होणार होता. आता त्यामध्ये बदल करण्यात आले असून 21 मार्च 2024 रोजी हा पेपर घेतला जाणार आहे. सीबीएसईकडून या अगोदरच 10वी आणि 12 चे परीक्षेचे वेळापत्रक हे प्रसिद्ध करण्यात आले आहे. मात्र, आता त्यामध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आले.

सीबीएसईच्या वेळापत्रकानुसार इयत्ता 10वी बोर्डाच्या परीक्षा 15 फेब्रुवारी 2024 ते 13 मार्च 2024 या कालावधीमध्ये पार पडणार आहेत. 12वीच्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा या 15 फेब्रुवारी 2024 ते 2 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये पार पडणार आहेत. उमेदवारांनी CBSE 10th, 12th Revised Date Sheet 2024 Download Direct Link या साईटवर जाऊन नवीन वेळापत्रक हे डाऊनलोड करावे.

तिथेच विद्यार्थ्यांना नवीन अपडेट झालेले वेळापत्रक मिळेल. तसेच आपण हे वेळापत्रक डाऊनलोड देखील करू शकता. काही दिवसांपूर्वीच सीबीएसईकडून प्रात्यक्षिक परीक्षेसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली. फक्त विद्यार्थीच नाही तर शाळांना देखील या काही सूचना या सीबीएसई बोर्डाकडून देण्यात आल्या आहेत.