MHT CET Result 2021: एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार? निकाल कुठं पाहायचा

महाराष्ट्र राज्य सामान्य प्रवेश परीक्षा अर्थात महा सीईटी परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार यासंदर्भात उत्सुकता निर्माण झालीय. महासीईटीचा निकाल या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.

MHT CET Result 2021: एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार? निकाल कुठं पाहायचा
MHT CET Cell
| Edited By: | Updated on: Oct 24, 2021 | 12:27 PM

MHT CET Result 2021 मुंबई : महाराष्ट्र राज्य सामान्य प्रवेश परीक्षा अर्थात महा सीईटी परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार यासंदर्भात उत्सुकता निर्माण झालीय. महासीईटीचा निकाल या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. भौतिकशास्त्र रसायनशास्त्र, गणित म्हणजे पीसीएम आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र अर्थात PCB या दोन्ही विषयांसाठी प्रसिद्ध केले जातील. एमएचटी सीईटीचा निकाल cetcell.mahacet.org आणि mhtcet2021.mahacet.org या दोन अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध केला जाईल. तुम्ही दोन्हीपैकी कोणत्याही वेबसाईटला भेट देऊन तुमचा निकाल पाहू शकता.

MHT CET स्कोअरकार्ड कसं पाहावं

स्टेप 1: महाराष्ट्र CET च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
स्टेप 2: होम पेजवर तुम्हाला MHT CET स्कोअर कार्डची लिंक मिळेल (निकाल जाहीर झाल्यानंतर). त्यावर क्लिक करा.
स्टेप 3 : नवीन पेज उघडेल. येथे दिलेल्या जागेत तुमचा रोल नंबर (अर्ज क्रमांक) आणि पासवर्ड (जन्मतारीख) यासारखी आवश्यक माहिती भरून लॉग-इन करा.
स्टेप 4: तुम्ही लॉग इन करताच तुमचा निकाल आणि स्कोअर कार्ड स्क्रीनवर पाहायला मिळेल.

स्वतंत्र गुणवत्ता यादी

एमएचटी सीईटी निकालासोबत गुणवत्ता यादी देखील प्रसिद्ध केली जाईल. B.Tech आणि B.Arch अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी अभ्यासक्रम आणि श्रेणीनिहाय स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार केली जाईल. उमेदवारांना त्यांच्या गुणवत्ता यादीतील रँकच्या आधारे जागा वाटप केल्या जातील पण त्यासाठी आधी समुपदेशन केले जाईल.

एमएचटी सीईटी 2021 समुपदेशन कधी होईल?

समुपदेशन प्रक्रिया महाराष्ट्र CET निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच सुरू होईल. समुपदेशन फक्त ऑनलाईन केले जाईल. सर्वप्रथम, यशस्वी विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. त्यानंतरच ते समुपदेशन प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील. नोंदणी केल्यानंतर, निवड भरणे, जागा वाटप होईल. तुम्हाला मिळालेल्या महाविद्यालयातील जागेवर प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी प्रवेश शुल्क भरून तुम्हाला प्रवेश निश्चित करावा लागेल. दरम्यान, तुमच्या सर्व कागदपत्रांची पडताळणीही केली जाईल.

इतर बातम्या:

VIDEO : Pune | पुण्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेचा गोंधळ

VIDEO : Chhagan Bhujbal | शाहरुख खान उद्या भाजपमध्ये गेल्यानंतर, तिथे कोकेन नाही पीठ सापडलं म्हणतील – भुजबळ

MHT CET result 2021 date time how to check at mhtcet2021 mahacet org