राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा 16 जानेवारीला, नोंदणीला आजपासून सुरुवात

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीनं राज्य पातळीवरील प्रज्ञाशोध परीक्षा 16 जानेवारी 2022 रोजी घेतली जाईल. तर राष्ट्रीय पातळीवरील प्रज्ञा शोध परीक्षा 12 जून 2022 रोजी घेण्यात येणार आहे.

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा 16 जानेवारीला, नोंदणीला आजपासून सुरुवात
MSCE NTS
| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 2:57 PM

पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीनं घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचं आयोजन 16 जानेवारी 2022 रोजी करण्यात येणार आहे. एनटीएस परीक्षा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येते. या परीक्षेसाठी नाव नोंदणी ऑनलाईन पद्धतीनं करण्यात येणार आहे. या परीक्षेसंदर्भातील माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीनं देण्यात आली आहे.

अर्ज कुठं दाखल करायचा?

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी विद्यार्थी 16 ते 30 नोव्हेंबर दरम्यान अर्ज दाखल करु शकतात. अर्ज दाखल करण्यासाठी विद्यार्थ्यांनी https://www.ntsemsce.in/ या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 1 ते 7 डिसेंबरदरम्यान विलंब शुल्क तर 8 डिसेंबर ते 13 डिसेंबर या कालावधीत अतिविलंब शुल्कासह अर्ज सादर करता येतील.

महाराष्ट्र पातळीवरील परीक्षा 16 जानेवारी तर राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा 12 जून

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीनं राज्य पातळीवरील प्रज्ञाशोध परीक्षा 16 जानेवारी 2022 रोजी घेतली जाईल. तर राष्ट्रीय पातळीवरील प्रज्ञा शोध परीक्षा 12 जून 2022 रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती तुकाराम सुपे यांनी दिली.

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेला अर्ज कुणाला करता येतो?

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा महाराष्ट्र सरकारनं मान्यता दिलेल्या शाळेतील दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याला देता येते. या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही गुणांची, वयाची आणि उत्पन्नाची अट नाही.

शिष्यवृत्ती किती मिळते?

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीनंतरच्या अकरावी आणि बारावीच्या वर्गासाठी 1250 रुपये तर, पदवी शिक्षणासाठी 2 हजार रुपये आणि पुढील शिक्षणासाठी 2 हजार रुपये दरमहा शिष्यवृत्ती दिली जाते.

इतर बातम्या:

ठाकरे सरकारनं शब्द पाळला, 2088 पदांसाठी प्राध्यापक भरतीचा शासन निर्णय जारी, पुढील प्रक्रिया कशी असणार?

NEET PG 2021 : AIQ कोट्यातील OBC आणि EWS आरक्षणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी, समुपदेशनाचा तिढा सुटणार?

MSCE NTSE National Talent Search Exam registrations start from today check details here