ठाकरे सरकारनं शब्द पाळला, 2088 पदांसाठी प्राध्यापक भरतीचा शासन निर्णय जारी, पुढील प्रक्रिया कशी असणार?

सहायक प्राध्यापक पदाच्या 2088 तर 370 प्राचार्य पदांच्या भरतीसाठी मान्यता देणारा शासन निर्णय जारी केला आहे. राज्य सरकारनं या शासन निर्णयाद्वारे प्राध्यापक आणि प्राचार्य पदाच्या भरतीवरील निर्बंध शिथील केले आहेत.

ठाकरे सरकारनं शब्द पाळला, 2088 पदांसाठी प्राध्यापक भरतीचा शासन निर्णय जारी, पुढील प्रक्रिया कशी असणार?
PROFESSOR RECRUITMENT
Follow us
| Updated on: Nov 16, 2021 | 11:39 AM

मुंबई: उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून सहायक प्राध्यापक पदाच्या 2088 तर 370 प्राचार्य पदांच्या भरतीसाठी मान्यता देणारा शासन निर्णय जारी केला आहे. राज्य सरकारनं या शासन निर्णयाद्वारे प्राध्यापक आणि प्राचार्य पदाच्या भरतीवरील निर्बंध शिथील केले आहेत. प्राध्यापक भरतीसाठी सेट नेट पात्रताधारक आणि तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांनी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन केलं होतं. राज्य सरकारनं आंदोलकांच्या मागणीला प्रतिसाद देत तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला. आता 2088 सहायक प्राध्यापक पदासाठी शासन निर्णय जाहीर करत पुढील प्रक्रिया कशी असेल हे स्पष्ट केलं आहे.

अतिरिक्त ठरलेल्या पदांचं समायोजन

राज्य सरकारनं जारी केलेल्या शासन निर्णयानुसार सहायक प्राध्यापक भरतीसाठी प्रक्रिया सुरु करण्यापूर्वी अतिरिक्त ठरलेल्या प्राध्यापकाचं समायोजन करण्याच्या सूचना राज्य सरकारच्यावतीनं देण्यात आल्या आहेत. संबंधित विषयासाठी सहायक प्राध्यापकाचे पद अतिरिक्त नसल्याचे विभागीय सहसंचालकांनी प्रमाणित केल्यानंतरच संबंधित संस्था आणि महाविद्यालयाला पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करता येईल.

शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून नियुक्ती

सहायक प्राध्यापक पदावर निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती सन 2022-23 या शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या दिनांकापासून करण्यात यावी. तसेच वेतन सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाच्या प्रथम दिनांकापासून सुरू करण्यात यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

नियमांचं पालन करण्याच्या सूचना

राज्य सरकारनं सहायक भरतीस मान्यता दिलेल्या शिक्षकीय पदांची पदभरती करताना प्रत्येक महाविद्यालयास संबंधित विद्यापीठ / नियामक प्राधिकरणाने दिलेली संलग्नता (Affiliation) अबाधित राहण्यासाठी तसेच महाविद्यालयाचे मूल्यांकन (Accreditation) व पुर्नमूल्यांकन (Reaccreditation) होण्याकरिता आवश्यक असलेली मर्यादा विचारात घेऊनच शिक्षकीय पदांचे वाटप करण्यात आलेले आहे. त्यानुसारच पदभरती करण्यात यावी.

विद्यापीठ अधिनियमांतील तरदुतींचं पालन करणं बंधनकारक

अकृषी विद्यापीठ संलग्नित अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील पदभरती करताना विद्यापीठ अधिनियमातील विहीत तरतूदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. तसेच विहीत प्रक्रीयेनंतर उमेदवाराच्या निवडीनंतर उमेदावारांना सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाच्या प्रथम दिनांकापासून नियुक्ती आदेश द्यावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत मासिक प्रगती अहवाल प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला संचालकांनी शासनास सादर करावा, अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

इतर बातम्या:

Professors Recruitment | मोठा निर्णय ! राज्यात प्राध्यापक भरतीला मान्यता, पहिल्या टप्प्यात 2088 प्राध्यापकांची भरती

ऑस्ट्रेलियाच्या 7 मैदानांवर 45 सामने, T20 World Cup 2022 चं शेड्यूल जाहीर, सेमीफायनल-फायनल कधी?

Maharashtra Government issue GR of Professor and Principal Recruitment check details here

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.