AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET Admit Card 2021 : नीट यूजी परीक्षेचं प्रवेशपत्र ‘या’ दिवशी जारी होणार, NTA ची विद्यार्थ्यांना महत्वाची सूचना

राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट यूजी 2021 परीक्षा 12 सप्टेंबरला आयोजित केली झाणार आहे. विद्यार्थ्यांना या परीक्षेचं प्रवेशपत्र 9 सप्टेंबर रोजी मिळणार आहे.

NEET Admit Card 2021 : नीट यूजी परीक्षेचं प्रवेशपत्र 'या' दिवशी जारी होणार, NTA ची विद्यार्थ्यांना महत्वाची सूचना
नीट
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Aug 21, 2021 | 10:30 AM
Share

NEET Admit Card 2021 नवी दिल्ली: राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट यूजी 2021 परीक्षा 12 सप्टेंबरला आयोजित केली झाणार आहे. विद्यार्थ्यांना या परीक्षेचं प्रवेशपत्र 9 सप्टेंबर रोजी मिळणार आहे. विद्यार्थी परीक्षेपूर्वी तीन दिवस अगोदर प्रवेशपत्र एनटीएच्या वेबसाईटवरुन डाऊनलोड करु शकतात. प्रवेशपत्र जाहीर होण्यासंदर्भातील तारीख जाहीर झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.

नीट यूजी परीक्षेचं प्रवेशपत्रासोबत विद्यार्थ्यांना एक स्वयंघोषणापत्र उपलब्ध होार आहे. त्या स्वयंघोषणापत्रामध्ये विद्यार्थ्यांना त्यांनी अलीकडील काळात केलेल्या प्रवासाची माहिती भरावी लागणार आहे. कोरोनाचा प्रास रोखण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून हा अर्ज भरण्यास सांगण्यात आलं आहे.

नीट यूजी प्रवेशपत्र कसं डाऊनलोड करायचं?

स्टेप 1 : सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी एनटीएची अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in या वेबसाईटला भेट द्यावी स्टेप 2 : वेबसाईटवरील प्रवेशपत्र लिंकवर क्लिक करावं स्टेप 3 : अर्ज क्रमांक आणि पासवर्ड दाखल करावा स्टेप 4 : प्रवेशपत्र ओपन होईल ते डाऊनलोड करुन सोबत ठेवावं

नीट यूजी परीक्षा प्रादेशिक भाषांमध्ये

गेल्या वर्षी कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करीत 13 सप्टेंबर रोजी नीट परीक्षा घेण्यात आली. परीक्षेला एकूण 13.66 लाख उमेदवार परीक्षेला बसले होते, त्यापैकी 7,71,500 विद्यार्थी पात्र ठरले होते. यावर्षी ही परीक्षा इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, ओडिया, तामिळ, तेलगू आणि उर्दू या 11 भाषांमध्ये घेण्यात येणार आहे.

कोरोना नियमांचं पालन करणार

या परीक्षेबरोबरच विद्यार्थ्यांना नीट युजी परीक्षेसाठी परीक्षा केंद्रे उपलब्ध करुन दिली जातील. कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याबरोबरच परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना मास्क वाटप करण्यात येणार आहे. यासह विद्यार्थ्यांच्या येण्या-जाण्याचा स्लॉटही ठरविला जाईल. तसेच, सर्व प्रकारच्या नोंदणी शारीरिक संपर्काशिवाय असतील. सामाजिक भेदभावाविरुद्ध संपूर्ण खबरदारी घेतली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

नीट परीक्षेमध्ये ओबीसी आणि ईडब्ल्यूएस आरक्षण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारनं नीट परीक्षेमध्ये अखिल भारतीय कोट्यातून ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी 27 टक्के तर आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 10 टक्के आरक्षण लागू केलं आहे. हे आरक्षण वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी लागू असेल.

इतर बातम्या:

NEET 2021 Exam Date: नीट यूजी परीक्षेची तारीख ठरली, www.nta.nic.in वेबसाईटवर उद्यापासून नोंदणी सुरु

NEET सह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा रद्द करा, नरेंद्र मोदींकडे मुख्यमंत्र्यांनंतर विरोधी पक्षाच्या नेत्याची मागणी

NEET Admit Card 2021 Releasing On neet.nta.nic in on this date check details here

Follow Us
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
Sanjay Raut EXCLUSIVE | ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत संजय राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
Sushma Andhare | राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही भ्रमात नाही...
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
Omraje Nimbalkar | धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या एका निर्णयाने बदलणार राजकीय गणित, घडामोडींना वेग
गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
Viral Photos | गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
Jayant Patil UNCUT | सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; भ्रष्टाचारावरून घणाघात!
एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण... जाधवांनी अधिवेशनाआधीच सरकारला घेरलं
Bhaskar Jadhav UNCUT | एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण...भास्कर जाधवांनी अधिवेशनाआधीच फडणवीस सरकारला घेरलं!
चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा
Bhaskar Jadhav । चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा; भास्कर जाधवांचा सरकारवर थेट हल्लाबोल
वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर....
मोठी बातमी! वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर, भूमिका स्पष्ट करत म्हणाल्या....
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार निर्णायक भेट
ओमराजेंच्या निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, तर ठाकरे गटाची मनधरणी सुरूच
Omraje Nimbalkar | ओमराजेंच्या एका निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, रोखण्यासाठी ठाकरे गटाची मनधरणी सुरूच