NEET सह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा रद्द करा, नरेंद्र मोदींकडे मुख्यमंत्र्यांनंतर विरोधी पक्षाच्या नेत्याची मागणी

नीट सह सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा रद्द करण्याची मागणी अण्णाद्रमुकचे नेते पनीरसेल्वम यांनी केली आहे. Panneerselvam demanding abolish NEET

NEET सह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा रद्द करा, नरेंद्र मोदींकडे मुख्यमंत्र्यांनंतर विरोधी पक्षाच्या नेत्याची मागणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यापाठोपाठ अण्णा द्रमुक पक्षाचे प्रमुख नेते पनीरसेल्वम (Panneerselvam) यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र लिहिले आहे. नीट (NEET) सह सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बारावीचे गुण ग्राह्य धरले जावेत, असे देखील त्यांनी म्हटलं आहे. पनीरसेल्वम यांनी एक प्रकारे तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुकच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. (AIDMK leader Panneerselvam wrote letter to PM Narendra Modi demanding abolish NEET and other entrance exams)

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचं नरेंद्र मोदींना पत्र

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी नरेंद्र मोदींकडे पत्र लिहून राष्ट्रीय स्तरावरील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. तामिळनाडूमध्ये एमबीबीएस सह सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी बारावीच्या परीक्षांच्या आधारावर प्रवेश निश्चित करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली होती. पनीरसेल्वम यांनी देखील तशा प्रकारचं पत्र लिहिल्यामुळे त्यांनी राज्य सरकारचं एक प्रकारे समर्थन केलं आहे .

पनीरसेल्वम काय म्हणाले

पनीरसेल्वम यांनी नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात अण्णा द्रमुकच्या दिवंगत नेत्या जयललिता यांनी नीट परीक्षेचा कडाडून विरोध केला होता. अण्णाद्रमुक सरकारने 2011 ते 2021 दरम्यान नीटचा कडाडून विरोध केला आहे. 2017 मध्ये याविरोधात दोन विधेयक आणली गेली मात्र त्याचा फायदा झाला नाही, असं ते म्हणाले.

पनीरसेल्वम यांनी तामिळनाडूतील विद्यार्थ्यांचा प्रामुख्याने सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेता ही मागणी केली आहे. प्रवेश परीक्षांच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त कोचिंग क्लासेस लावावे लागतात. कारण नीटची परीक्षा किंवा व्यवसायिक परीक्षा या एनसीआरटी आणि सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांपुढे अडचणी निर्माण होतात. विद्यार्थी कोचिंग क्लासेसची फी भरण्यास असमर्थ असल्यानं ते यापासून वंचित राहतात, असं देखील पनीरसेल्वम यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा:

NCC : देशातील 91 विद्यापीठांकडून राष्ट्रीय छात्र सेनेचा अभ्यासक्रमात समावेश, यूजीसीच्या पत्राला मोठा प्रतिसाद

कर्नाटक सरकार अगोदर म्हणालं दहावीच्या परीक्षा घेणार, आता मुख्यमंत्री येडियुरप्पा म्हणतात…

(AIDMK leader Panneerselvam wrote letter to PM Narendra Modi demanding abolish NEET and other entrance exams)