दहावीच्या परीक्षा रद्द, आणखी एका बोर्डाचा निर्णय, NIOS च्या बारावीच्या परीक्षा लांबणीवर

एनआयओएसचे (NIOS) चे विद्यार्थी दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी करत होते. NIOS cancelled class 10 exams

दहावीच्या परीक्षा रद्द, आणखी एका बोर्डाचा निर्णय, NIOS च्या बारावीच्या परीक्षा लांबणीवर
Student
Follow us
| Updated on: May 19, 2021 | 3:11 PM

नवी दिल्ली: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगने (National Institute of Open Schooling) दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांनी बऱ्याच दिवसांपासून केलेल्या मागणीचा विचार करून दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात एनआयओएसचे (NIOS) चे विद्यार्थी दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी करत होते. (NIOS cancelled class 10 exams and postpone board exams of class 12)

दहावीच्या परीक्षा रद्द, बारावीच्या लांबणीवर

एनआयओएस (NIOS) बोर्डानं दहावीच्या परीक्षा जूनमध्ये घेण्याचं निश्चित केलं होतं. मात्र, आता त्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, बारावीच्या परीक्षा देखील जून 2021 मध्ये होणार होत्या त्यादेखील लांबणीवर टाकण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. 12 वी च्या परीक्षांची नवीन तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. एनआयओएस बोर्डाने कळवल्यानुसार बारावीच्या परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील.

सीबीएसईच्या धर्तीवर बारावीच्या परीक्षा लांबणीवर

केंद्रीय केंद्रीय माध्यमिक परीक्षा बोर्ड म्हणजेच सीबीएससीच्या धर्तीवर एनआयओएस बोर्डाने देखील त्यांच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा आणि बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय जाहीर केला आहे. बारावीच्या परीक्षांबाबत लवकरच नवीन नोटिफिकेशन जारी करू असं म्हटलं आहे. नवीन वेळापत्रक जाहीर करताना विद्यार्थ्यांना 15 दिवसांचा वेळ अभ्यासासाठी देण्यात येईल, असे देखील कळवण्यात आलं आहे.

एनआयओएस दहावीसाठी स्वतंत्र फॉर्म्युला ठरवणार

सीबीएसई आणि एनआयओएस यांच्यामध्ये मूलभूत फरक असल्यामुळे सीबीएससीने दहावीच्या पुन्हा साठी वापरलेला फॉर्म्युला एनआयओएस वापरू शकत नाही. कारण सीबीएससी नियमितपणे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे काम करते. तर, एनआयओएस ओपन लर्निंग स्वरूपातील असल्यामुळे आणि दूरस्थ पद्धतीने शिक्षण होत असल्यामुळे बोर्डाने स्वतःची स्वतंत्र प्रणाली तयार करण्याचं ठरवलं आहे. दहावीच्या गुणांसाठी तयार करण्यात येणारा फॉर्म्युला हा विद्यार्थ्यांच्या हिताचा असेल असेही एनआयओएसनं सांगितलं आहे.

संबंधित बातम्या:

CBSE चा दहावीच्या निकालाविषयी मोठा निर्णय, अंतर्गत मूल्यमापनाचे गुण सादर करण्याबाबत महत्वाचे आदेश जारी

कोरोनानं पालक गमावेल्या विद्यार्थ्यांकडून फी घेणार नाही, ‘या’ राज्यातील खासगी शाळांचा निर्णय

(NIOS cancelled class 10 exams and postpone board exams of class 12)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.