कोरोनानं पालक गमावेल्या विद्यार्थ्यांकडून फी घेणार नाही, ‘या’ राज्यातील खासगी शाळांचा निर्णय

देशभरात खासगी शाळांच्या फीचा मुद्दा निर्माण होत थेट सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला होता. private school fee

कोरोनानं पालक गमावेल्या विद्यार्थ्यांकडून फी घेणार नाही, 'या' राज्यातील खासगी शाळांचा निर्णय
प्रातिनिधिक फोटो

रायपूर: भारत कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे भारतात दररोज दोन ते तीन लाखांच्या जवळपास कोरोना रुग्ण आढळत आहेत. काही राज्यांनी कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारला आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत. पालकांचं काम सुटलेय त्यामुळे ते आर्थिक अडचणीत आहेत. देशभरात खासगी शाळांच्या फीचा मुद्दा निर्माण होत थेट सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला होता. छत्तीसगडमधील खासगी शाळांच्या संघटनेने आदर्श असा निर्णय घेतला आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं कोरोना विषाणू संसर्गामुळे निधन झालं आहे, त्यांची फी माफ करण्याचा निर्णय छत्तीसगड प्रायवेट स्कूल मॅनेजमेंटनं घेतला आहे. (Chattisgarh private school organization decided not take fees from students whose parents died due to corona)

खासगी शाळा त्या विद्यार्थ्यांकडून फी घेणार नाहीत

छत्तीसगड प्रायवेट स्कूल मॅनेजमेंटनं ज्या विद्यार्थ्यांना कोरोनामुळं पालकांना गमवावं लागलं त्यांची फी न घेण्याच निर्णय घेतला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांकडून स्कूल बस, गणवेशाची फी याचा देखील समावेश असेल. कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं आहे. हे लक्षात ठेऊन निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री यांच्याकडेही प्रस्ताव

छत्तीसगड प्रायवेट स्कूल मॅनेजमेंटनं मुख्यमंत्री बाघेल यांच्याकडे ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं कोरोनानं निधन झालंय, अशा विद्यार्थ्यांचा समावेश आरटीईमध्ये करण्याची मागणी केली आहे. तसा प्रस्ताव राज्य सरकारला देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. छत्तीसगड प्रायवेट स्कूल मॅनेजमेंटचे अध्यक्ष राजीव गुप्ता यांनी राज्य सरकारचा निर्णय येईपर्यंत अशा विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबवलं जाणार नाही, असं म्हटलं आहे.

विद्यार्थ्यांच्या मदतीचं आवाहन

राजीव गुप्ता यांनी छत्तीसगड प्रायवेट स्कूल मॅनेजमेंटच्या वतीनं ज्या विद्यार्थ्यांनी कोरोना विषाणू संसर्गामुळे त्यांचे पालक गमावले त्यांच्यासाठी मदतीचं आवाहन केलं आहे.

देशात 2 लाख 63 हजार 533 नवीन कोरोनाबाधितांची नोंद

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा मोठी घट (Corona Cases in India) पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात तीन लाखांहून कमी नवीन रुग्ण सापडले आहेत. कालच्या दिवसात 2 लाख 63 हजार 533 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. आदल्या दिवसाच्या तुलनेत 18 हजारांनी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र कोरोनाबळींचा आकडा वाढला असून तब्बल 4 हजार 329 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.

संबंधित बातम्या:

IGNOU June TEE 2021: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठानं जून सत्र परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली

दहावीचा निकाल कसा जाहीर करणार? फॉर्म्युला ठरला का? बोर्डानं हायकोर्टात काय सांगितलं?

(Chattisgarh private school organization decided not take fees from students whose parents died due to corona)