IGNOU June TEE 2021: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठानं जून सत्र परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (इग्नू) जूनमध्ये होणाऱ्या सत्र परीक्षेसाठी अर्ज करण्याची लिंक पुन्हा चालू केली आहे.

IGNOU June TEE 2021: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठानं जून सत्र परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ

नवी दिल्ली: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (इग्नू) जूनमध्ये होणाऱ्या सत्र परीक्षेसाठी अर्ज करण्याची लिंक पुन्हा चालू केली आहे. इग्नूकडून सत्र परीक्षा 2021 चं आयोजन 15 जूनपासून करण्यात येणार होतं. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाची वाढती रुग्णसंख्या पाहता ते लांबणीवर टाकण्यात आलं आहे. येत्या काही दिवसांमध्ये परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली जाईल. (IGNOU June TEE 2021 submission of application form date extended click here for online link)

IGNOU ने, जून 2021 टर्म-एंड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म जमा करण्यासाठी मुदत वाढवून दिली आहे. ऑनलाईन लिंक पुन्हा एकदा चालू करण्यात आली आहे. विद्यार्थी तिथे जाऊन ऑनलाईन अर्ज करु शकतात. विद्यार्थ्यांकडून आनलाईन अर्ज जमा केले जात आहेत.

IGNOU Term End Exam 2021 साठी अर्ज कसा करायचा?

स्टेप 1:सर्वात आधी ignou.ac.in या संकेतस्थळाला भेट द्या.
स्टेप 2: त्यानंतर होमपेजवर जाऊन रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3: होमपेज उघडेल. त्यावर Term End Exam या लिंकवर क्लिक करा
स्टेप 4: अर्जामधील माहिती अचूकपणे भरा

यूजी, पीजी, डिप्लोमा कोर्सेसाठी नोंदणी करण्यास मुदतवाढ

इंदिरा गांधी नॅशनल ओपन विद्यापीठाने (इग्नू) अनेकदा प्रवेशासाठी अर्ज करण्याची तारीख वाढवलेली आहे. त्यानंतर पुन्हा ही तारीख वाढवून आता 15 जुलै करण्यात आली आहे. जुलै सत्रासाठी प्रवेश अर्ज करण्यासाठी 15 जूनपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठानं यासोबत टीईई जून 2021 साठी असाईनमेंटची मुदत वाढवण्यात आली आहे. आता असाईनमेंट जमा करण्याची अंतिम तारीख 31 मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर, यूजी, पीजी, डिप्लोमा आणि इतर कोर्सेससाठी नोंदणी करण्यासाठी आता 15 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.

असा करा अर्ज

स्टेप 1: इग्नूच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर सर्वात आधी ignou.ac.in या संकेतस्थळाला भेट द्या.
स्टेप 2: त्यानंतर होमपेजवर जाऊन रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3: होमपेज उघडेल. त्यात तुम्हाला तुमची डिटेल्स भरावी लागेल.
स्टेप 4:संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमचं अकाऊंट लॉगइन होणार. या लॉगइन आयडीद्वारे तुम्ही अर्ज भरू शकता.

शुल्कही ऑनलाईन भरावे लागणार

शेवटी तुम्हाला नोंदणी शुल्क भरण्याचा पर्याय दिसेल. त्यावर जाऊन शुल्क भरल्यानंतर तुमची अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. भविष्यात कोणतीही अडचण होऊ नये म्हणून तुम्ही त्याची प्रिंटही काढू शकता.

संबंधित बातम्या:

नागपूर ग्रामीणमधील शाळा 13 डिसेंबरपासून सुरु, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरेंचा निर्णय

आदिवासी विभागाच्या आश्रमशाळा सुरु करण्याचा निर्णय घाईगर्दीत, खासदार हिना गावित यांचा आरोप

(IGNOU June TEE 2021 submission of application form date extended click here for online link)