NEET 2021 Exam Date: विद्यार्थ्यांनो तयारीला लागा!, नीट परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर होणार

नीट परीक्षेची तारीख आठवड्यात जाहीर केली जाईल अशी माहिती एनटीएच्या संचालकांनी दिली आहे. NEET Exam Date 2021

NEET 2021 Exam Date: विद्यार्थ्यांनो तयारीला लागा!, नीट परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर होणार
दहावीची परीक्षा रद्द
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 12:07 PM

NEET Exam Date 2021 नवी दिल्ली : नीट परीक्षा म्हणजे राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेची तारीख लवकरचं जाहीर होणार आहे. नीट परीक्षेच्या तारखेसंदर्भात नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या संचालकांनी TV9 भारतवर्षशी बोलताना माहिती दिली. नीट परीक्षेची तारीख आठवड्यात जाहीर केली जाणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून नीट परीक्षेची तयारी करण्यात येत आहे. नीट परीक्षेच्या(NEET 2021 Exam Date) तारखा जाहीर होण्याची वाट विद्यार्थ्यांकडून पाहिली जात आहे. विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेच्या माहितीसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीची अधिकृत वेबसाईट ntaneet.nic.in वर भेट द्यावी. परीक्षेसंदर्भातील सर्व माहिती एनटीएच्या वेबसाईटवर मिळेल. (NTA DG said NEET Exam Date 2021 will declared soon)

NEET 2021 परीक्षा पॅटर्नमध्ये बदल?

राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET-UG) च्या परीक्षा पॅटर्नमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जून आणि जुलै महिन्यात ऑफलाईन पद्धतीनं नीट परीक्षा घेतली जाईल. टाईम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार उच्च शिक्षण विभागाचे सचिव अमित खरे परीक्षा पद्धतीत बदल करणं योग्य नसल्याचं म्हटलं आहे. ऐनवेळी परीक्षा पॅटर्न बदलल्यास विद्यार्थ्यावर त्याचा परिणाम होईल, असं अमित खरे यांनी म्हटलंय.

खरे यांच्यानुसार, NEET परीक्षा वर्षभरात अधिकवेळा आयोजित केली गेली पाहिजे. काही विद्यार्थी अडचणींमुळे परीक्षेवर लक्ष केंद्रीत करता येत नाही. विद्यार्थ्यांचं त्यामुळे वर्ष वाया जाते. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये आणि त्यांना संधी मिळावी यासाठी वर्षभरात परीक्षा अधिक वेळा झाली पाहिजे. एका वर्षात अधिक वेळा परीक्षा घेण्यासाठी ऑफलाईन पद्धतीऐवजी ऑनलाईन पद्धतीचा वापर करावा, असं अमित खरे म्हणाले.

अधिक वेळा परीक्षा घेण्यावर चर्चा व्हावी

NEET परीक्षा अधिक वेळा घेण्यासाठी त्यासंबंधित घटकांशी चर्चा करण्याची गरज असल्याचं अमित खरे म्हणाले. JEE आणि NEET परीक्षांमध्ये फरक आहे. JEE परीक्षा सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी आयोजित करण्याची गरज नसते. मात्र, NEET परीक्षा सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश करण्यासाठी अनिवार्य आहे. अमित खरेंनी सांगतिलं की विज्ञान विषयातील विद्यार्थ्यांना कॉमप्युटर हाताळण्यामध्ये सुलभता येण्यासाठी सात आठ महिने अगोदर त्याबाबत घोषणा करणं गरजेचे आहे.

संबंधित बातम्या:

JEE आणि NEET परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा, अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांना सल्ला

JEEAdvanced 2021 परीक्षेची तारीख ठरली, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा

(NTA DG said NEET Exam Date 2021 will declared soon)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.