AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune School Reopen : पुण्यात उद्यापासून शाळा कॉलेज पुन्हा सुरु होणार, पहिली ते आठवीचे वर्ग 4 तास भरणार

उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी घोषणा केल्याप्रमाणं पुण्यातील शाळा आणि महाविद्यालयं 1 फेब्रुवारी म्हणजेच उद्यापासून शाळा (Pune School Reopen) सुरु होणार आहेत.

Pune School Reopen : पुण्यात उद्यापासून शाळा कॉलेज पुन्हा सुरु होणार, पहिली ते आठवीचे वर्ग 4 तास भरणार
Pune School Reopen
| Edited By: | Updated on: Jan 31, 2022 | 1:04 PM
Share

पुणे : उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी घोषणा केल्याप्रमाणं पुण्यातील शाळा आणि महाविद्यालयं 1 फेब्रुवारी म्हणजेच उद्यापासून शाळा (Pune School Reopen) सुरु होणार आहेत. विद्यार्थ्यांचं लसीकरणावर जोर देण्यात येणार येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. पहिली ते आठवीचे वर्ग चार तास सुरु राहतील, असं अजित पवार म्हणाले इयत्ता पहिली ते 8 वी हाफ डे आणि नववी ते दहावी पूर्णवेळ शाळा सुरू राहील, असंही ते म्हणाले. तसेच नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचं लसीकरण (Corona Vaccine) करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांचं शाळेतच लसीकरण केलं जाणार आहे. याबाबतची माहिती शाळा चालक आणि संचालकांना देण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं होतं.उद्यापासून शाळा सुरु होत असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

पुण्यात उद्यापासान शाळा सुरु, पहिली ते आठवीचे वर्ग चार भरणार

पालकमंत्री अजित पवार यांच्या आदेशाप्रमाणं पुणे जिल्ह्यात उद्यापासून शाळा महाविद्यालय सुरु होणार आहेत. पुण्यात लहान मुलांच्या तब्येतीविषयी खबरदारीचा उपाय म्हणून पहिली ते आठवीचे वर्ग चार तास भरवण्यात येणार आहेत. तर, नववी आणि दहावीचे वर्ग हे पूर्णवेळ भरवले जातील, असा निर्णय घेण्यात आला होता.

पालकांची संमती महत्त्वाची

उद्यापासून शाळा सुरु होत असल्या तरी विद्यार्थ्यांना शाळेत येताना पालकांची संमती सादर करावी लागेल. पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठण्यासंदर्भातली संमत्रीपत्र दिल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

आठवडाभर हाफ डे

पहिली ते आठवीच्या शाळा आठवडाभर हाफ डे असतील. त्यानंतर आढावा घेऊन पुढचा निर्णय घेऊ. तसेच शाळेत विद्यार्थ्यांना पाठवणं बंधनकारक नाही. ते पालकांवर अवलंबून आहे. आम्ही पालकांना जबरदस्ती करणार नाही, असंही अजित पवारांनी सांगितलं होतं.

धुळ्यात आजपासून शाळा सुरु

धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर बंद झालेल्या शाळा तब्बल महिनाभराच्या अवधीनंतर पहिली ते सातवीच्या माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहे. शाळा सुरू झाल्याने पालकांसह शिक्षकांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने रांगोळी काढत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येत आहे. तसेच शासनाने घालून दिलेल्या सर्व कोरोनाच्या अटी व नियम पाळून शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोनामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये असलेलं ऑनलाईनचे शिक्षण आता शाळा सुरु झाल्याने प्रत्यक्षात अनुभवायला मिळणार आहे. तसेच कोरोनामुळे शिक्षणात पडलेला खंड भरून काढण्यास देखील शिक्षक तयार असल्याचे शिक्षकांनी सांगितले आहे. आता शाळा नियमित सुरू व्हाव्यात अशी इच्छा पालकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे एकंदरीत शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षक यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

इतर बातम्या:

VIDEO: कोण ढोकळा विकतो ते सोडा, वाईनच्या धंद्यात पार्टनरशीप कशी मिळाली ते सांगा?; सोमय्यांचं राऊतांना आव्हान

IND vs WI: रोहित बरोबरची मैत्री विसरणार, पुढचं लक्ष्य भारत, कायरन पोलार्डची गर्जना

Pune School Reopen as per orders of Ajit Pawar and Maharashtra Government school will restart form tomorrow

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.