AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनानं आई वडील गमावलेल्या विद्यार्थ्यांचं शुल्क माफ होणार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचा निर्णय

कोरोनामुळे व्यक्तिगत नुकसानाबरोबर आर्थिक नुकसान देखील मोठ्या प्रमाणावर झालं आहे. सोलापूर येथील अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानं कोरोनानं आई वडील गमावलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनानं आई वडील गमावलेल्या विद्यार्थ्यांचं शुल्क माफ होणार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचा निर्णय
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Jun 29, 2021 | 10:36 AM
Share

सोलापूर: कोरोना संसर्गाच्या (Corona Virus) पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये अनेक नागरिकांनी जीव गमावला आहे. अनेक जणांच्या कुटुंबातील कमावत्या व्यक्तींचं निधन झालं आहे. कोरोनामुळे व्यक्तिगत नुकसानाबरोबर आर्थिक नुकसान देखील मोठ्या प्रमाणावर झालं आहे. सोलापूर येथील अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानं कोरोनानं आई वडील गमावलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनानं आई वडील गमावलेल्या विद्यार्थ्यांची महाविद्यालय आणि विद्यापीठ फी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University decided to education fee waiver for students who loss parents in Corona)

नेमका निर्णय काय?

सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापू विद्यापीठानं कोरोनाने  आई-वडील अशा दोघा पालकांचा मृत्यू झालेला असल्यास विद्यार्थ्यांची महाविद्यालय आणि विद्यापीठाती शैक्षणिक फी परत करण्यात निर्णय घेतलाय. तर, विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेली परीक्षा माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोलापूरमधील विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांना 20 टक्के परीक्षा शुल्क परत

विद्यापीठाने कोरोना महामार्गामुळे मागील वर्षाची 20 टक्के परीक्षा शुल्काची रक्कम विद्यार्थ्यांना केली आहे. कोरोना संकटाच्या काळात विद्यापीठाने विद्यार्थी हित पाहून परीक्षा फी 35 लाख रुपये संलग्नित  महाविद्यालयांकडे परत केले आहेत. पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाने सर्व अभ्यासक्रमांच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 19.26 टक्के परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला होता.

20 हजार विद्यार्थ्यांना फायदा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठानं उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 20 टक्के परीक्षा शुल्क परत देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा 20 हजार विद्यार्थ्यांना फायदा झाला. 35 लाख रुपये इतकी रक्कम महाविद्यालयाकडे विद्यापीठाने वर्ग केली आहे. महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना पैसे फिसचे पैसे परत मिळणार आहेत.

संबंधित बातम्या:

ICAI CA Exams 2021: सीएच्या परिक्षेचं काय होणार? सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी

CBSE ने लॉंच केलं हँडबुक, इयत्ता 6 वी आणि 8 वीच्या विद्यार्थ्यांना ‘हँडक्राफ्ट’ शिकण्याची संधी

(Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University decided to education fee waiver for students who loss parents in Corona)

Follow Us
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?