Special Report | JEE Advance 2021 अभ्यासक्रम आणि कोरोना काळातल्या अटी, वाचा सविस्तर…

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी JEEAdvanced 2021 परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. ही परीक्षा आयआयटी खरगपूरतर्फे 3 जुलै रोजी घेण्यात घेणार आहे.

  • शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 7:18 AM, 23 Jan 2021
Special Report | JEE Advance 2021 अभ्यासक्रम आणि कोरोना काळातल्या अटी, वाचा सविस्तर...

मुंबई : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी JEEAdvanced 2021 परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. ही परीक्षा आयआयटी खरगपूरतर्फे 3 जुलै रोजी घेण्यात घेणार आहे. या परीक्षेसाठी लागणारी 75 टक्यांची अट रद्द कऱण्यात आली आहे. केंद्र सरकारनं JEE Main 2020 परीक्षेमध्ये क्वालिफाय झालेल्या पण कोरोनामुळे दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना JEEAdvanced2021 च्या परीक्षेला बसण्याची परवानगी दिली आहे. ( Special report on JEE Advance 2021 Exam )

इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणाऱ्या जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम अर्थात JEE परीक्षेच्या अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. कारण मध्यंतरी अशी चर्चा होती की, यंदा JEE च्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु अभ्यासक्रमात जरी बदल झाला नसला तरी, परीक्षेत विद्यार्थ्यांना विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची संख्या वाढवण्यात येणार आहे.

JEE Main 2021 चा अभ्यासक्रम मागील वर्षीप्रमाणेच असेल. विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायॉलॉजीमधील प्रत्येकी 25 प्रश्न सोडवायचे आहेत. विचारण्यात आलेल्या प्रश्नांची एकूण संख्या 90 असेल या 90 पैकी 75 प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवायचे आहेत.

फेब्रुवारी महिन्यातील 23, 24, 25 आणि 26 या तारखांना जेईई मेन 2021 चा पहिला टप्पा पार पडणार आहे. देशातील आयआयटी, एनआयटी आणि अन्य सीएफटीआय संस्थांमधील अभियांत्रिकीच्या यूजी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ही परीक्षा घेतली जाते. यंदा तब्बल चार वेळा ही परीक्षा होणार आहे.

फेब्रुवारीव्यतिरिक्त मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात या परीक्षेचे अन्य तीन टप्पे पार पडणार आहे. शैक्षणिक वर्ष 2021- 2022 साठी 12 वीला 75 टक्के गुणांची अट रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या शिक्षण विभागानं घेतला आहे. कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात अनेक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला होता.

आयआयटी खरगपूर परीक्षेचे आयोजन करणार

JEEAdvanced2021परीक्षेचे आयोजन आयआयटी खरगपूर करणार आहे. जॉईंट एक्झामिनेशन बोर्डाच्या सहकार्यानं आयआयटी खरगपूर परीक्षेचे आयोजन करेल. आयआयटीमधील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवण्यासाठी JEEAdvanced परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक असतं.

महत्त्वाच्या तारखा

– आय कार्ड मिळण्याची तारीख – 6 फेब्रुवारी 2021
– जेईई मेन्स परीक्षा – 22 ते 25 फेब्रुवारी 2021
– परीक्षेचा निकाल – 6 मार्च

जेईई (मेन्स) परीक्षेशी संबंधित महत्त्वाच्या बाबी

1. एनटीएने परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांची एक विस्तृत यादी जारी केली. यामध्ये फेस मास्क आणि ग्लोव्हजचा वापर अनिवार्य केला आहे. तसेच हात स्वच्छ धुणे, पिण्याच्या वैयक्तिक पाण्याच्या बाटल्या यांचाही समावेश आहे. उमेदवारांनी परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी साबण आणि पाण्याने आपले हात धुणे आवश्यक आहे.

2. एनटीएने म्हटले होते की विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यासाठी थर्मल स्कॅन करणे बंधनकारक आहे. ज्यांच्या शरीराचे तापमान एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त आहे अशा उमेदवारांसाठी वेगळे वर्ग असतील. एनटीएने सेल्फ-डिक्लेरेशनही मागितले आहे. उमेदवारांमध्ये कोविडची लक्षणे नाहीत किंवा ते कोणत्याही संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात नव्हते, हे सांगावे लागेल.

3. एनटीएने असेही म्हटले आहे की सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी परीक्षा केंद्रांची संख्या वाढवली आहे.

4. कोव्हिड काळात प्रवासादरम्यान होणारी गैरसोय टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे शहर निवडण्याची परवानगी देण्यात आली आहे, जेणेकरुन त्यांना परीक्षा सहजतेने घेता येईल.

( Special report on JEE Advance 2021 Exam )