चहाची चवही चाखायला शिकवली जाते, हे आहेत देशातील टॉप 5 हटके कोर्सेस

हे सर्व करिअर ऑप्शन्स आहेत, ज्यांचा अभ्यास आपल्या देशात केला जातो.

चहाची चवही चाखायला शिकवली जाते, हे आहेत देशातील टॉप 5 हटके कोर्सेस
tea testing courseImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 12, 2023 | 4:58 PM

कठपुतलीचा खेळ शिकणं असो किंवा हॅकिंग ट्रेनिंग असो, हे सगळं भारतात शिकवलं जातं. आज आम्ही तुम्हाला भारतात शिकवल्या जाणाऱ्या काही विचित्र कोर्सेसबद्दल सांगणार आहोत. तुम्हाला माहित आहे का की तुम्ही कठपुतली शिकण्याची पदवी मिळवू शकता? किंवा चहाची चव चाखून तुम्ही पैसे कमवू शकता. हे सर्व करिअर ऑप्शन्स आहेत, ज्यांचा अभ्यास आपल्या देशात केला जातो. आज अशाच काही विचित्र कोर्सेसविषयी जाणून घेऊयात, जे आपल्या देशातील विद्यापीठांमध्ये शिकवले जातात.

  1. स्पा मॅनेजमेंट: तुम्ही कधी विचार केला आहे का की स्पा कंपन्यांना सर्वोत्तम मसाजर आणि थेरपिस्ट कुठून मिळतात? वास्तविक, देशभरात अशा अनेक संस्था आहेत, ज्या स्पा मॅनेजमेंटचे अभ्यासक्रम उपलब्ध करून देतात. कोर्सदरम्यान, आपल्याला स्पा शी संबंधित बारकावे शिकवले जातात. तसेच मसाज करण्याच्या टेकनिक्स सुद्धा सांगितल्या जातात.
  2. कठपुतली: कठपुतली ही जगातील सर्वात जुनी मनोरंजन पद्धती आहे. हे म्हणजे केवळ कठपुतलीचा खेळ नाही. या माध्यमातून अनेक गोष्टी सांगितल्या जातात आणि महत्त्वाचे संदेशही मुलांना मोठ्यांना दिले जातात. याच कारणामुळे मुंबई विद्यापीठात कठपुतली खेळाचा सर्टिफिकेट कोर्स दिला जातो.
  3. चहाची चव: जेव्हा आपल्याला चहाचा घ्यायला मिळतो आणि त्यातून मोठे पैसे मिळतात तेव्हा काय होते? खरं तर, आसाम कृषी विद्यापीठासह अनेक संस्था चहा समोलियर (चहाची चाचणी) चा कोर्स देतात. हा कोर्स केल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना दरमहा ५० हजार रुपये कमवण्याची संधीही मिळते.
  4. बॅचलर ऑफ रुरल स्टडीज: गावावर प्रेम असेल आणि जमिनीशी कनेक्टेड राहायचं असेल तर. ग्रामीण लोकांसाठी काही करायचं असेल तर बॅचलर इन रुरल स्टडीज या कोर्सला प्रवेश घेता येईल. गुजरात, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये हा अभ्यासक्रम सुरू आहे. अभ्यासक्रमात पशुपालन, शेती व्यवस्थापन, खेळ अशा गोष्टी शिकवल्या जाणार आहेत.
  5. एथिकल हॅकिंग: सर्वसाधारणपणे तरुणांचा कल हॅकिंगकडे असतो. पण हॅकिंग हा तोट्याचा सौदा ठरू शकतो, कारण तो बेकायदेशीर मानला जातो. मात्र, अनेक ठिकाणी सरकारला हॅकर्सचीही गरज भासते, त्यामुळे अनेक संस्था एथिकल हॅकिंगचे अभ्यासक्रम उपलब्ध करून देतात. पुणे येथील ॲरिझोना इन्फोटेकमध्येही 15 दिवसांचा शॉर्ट कोर्स उपलब्ध आहे.
Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.