नीट परीक्षेत मोठे बदल, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा, थेट विद्यार्थ्यांना 15 मिनिटे..
नीट परीक्षा 2026 चा खेळ खंडोबा झाला. 3 मे रोजी देशभरात विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यानंतर थेट पेपरफुटीचे प्रकरण पुढे आले. सीबीआयने थेट परीक्षा रद्द करण्याचा अहवाल दिला. त्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली. आता नवीन तारीखही जाहीर करण्यात आली. यादरम्यानच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी मोठे भाष्य केले.

नीट 2026 परीक्षेचा मोठा खेळ खंडोबा झाला. थेट नीट परीक्षा रद्द करण्यात आली. नीट परीक्षेचा पेपरफुटला. एक दोन राज्यात नाही तर अनेक राज्यात पेपर फुटल्याचे उघडकीस आले. थेट सीबीआयकडून या प्रकरणात तपास सुरू आहे. काहींना अटक करण्यात आली. काल रात्री उशिरा केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित होते. शेवटी आज सकाळी नीट परीक्षा 2026 ची तारीख जाहीर करण्यात आली. 3 मे 2026 रोजी झालेली नीट परीक्षा रद्द केल्यानंतर आता नवीन तारीख 21 जून 2026 जाहीर करण्यात आली. पेपर फुटीनंतर विद्यार्थ्यांमध्ये मोठे संतापाचे वातावरण बघायला मिळतंय. नीट परीक्षेच्या पेपरफुटीनंतर पहिल्यांदाच केंद्रीय शिक्षण मंत्री मीडियासमोर आले. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रसाद प्रधान यांनी सांगितले की, आम्ही या घटनेनंतर तीन ते चार दिवसांचा वेळ घेतला आणि त्यानंतर परीक्षा रद्द करण्याचे ठरवले. विद्यार्थ्यांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, याकरिता आम्ही पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पुढे बोलताना सांगितले की, नीट यूजी 2026 चे एडमिड कार्ड 14 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना मिळेल.
यासोबतच आम्ही मोठा निर्णय घेत विद्यार्थ्यांना या परीक्षेकरिता 15 मिनिटांचा वेळ वाढून देण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांना 15 मिनिटे अधिकचा वेळ मिळेल. घडलेल्या घटनेनंतर मी खूप जास्त निराश आहे. पण काही वेळेला मोठे निर्णय घ्यावे लागतात. धर्मेंद्र प्रधान यांनी पुढे बोलताना म्हटले की, आज आम्ही परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली.
आजपासून एक महिन्याने परीक्षा होईल. परीक्षा माफियांविरोधात आमची लढाई आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना फसवले जाते, विद्यार्थ्यांनी अशा गोष्टींपासून दूर राहायला हवे. या घटनेनंतर सरकारने तात्काळ सीबीआयकडे तपास दिला. हेच तर या प्रकरणासा एजन्सीने गंभीरपणे घेतले आहे. सीबीआयकडून या प्रकरणात तपास हा केला जात आहे.