
युपीएससी ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात, मात्र फक्त काहीच उमेदवार ही परीक्षा पास करतात. यातील काही विद्यार्थी असे असतात जे अभ्यासात सामान्य असतात, मात्र कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाच्या जोरावर ते आपले स्वप्न पूर्ण करतात. आज आपण अंजली सोंधिया यांची अशीच एक प्रेरणादायी कहाणी जाणून घेणार आहोत. अंजली यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत युपीएससी परीक्षा पास केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अंजली सोंधिया मध्य प्रदेशातील राजगड येथील रहिवासी आहेत. त्या सध्या भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी आहे. युपीएससी परीक्षा पास करण्याचा तिचा मार्ग सोपा नव्हता, कारण अवघ्या 15 वर्षी अंजली यांचा साखरपुडा झाला होता. तिचे कुटुंब तिचे लग्न लावून तिला सासरच्या घरी पाठवण्याची तयारी करत होते, मात्र तिच्या आईने तिला साथ देत लग्न थांबवले आणि तिला अभ्यास करण्यास प्रोत्साहित केले.
अंजली केवळ 15 वर्षांची होती त्यावेशी तिचा साखर पुडा झाला होता, काही दिवसांनी तिले लग्न होणार होते. मात्र अंजलीच्या आईने तिला अभ्यासासाठी पाठिंबा दिला. मात्र काही दिवसांनंतर तिच्या वडिलांचे निधन झाले. कुंटुंबावर संकट आले तरी तिने कधीही अभ्यास सोडला नाही. 2024 च्या यूपीएससी भारतीय वन सेवा परीक्षेत तिने देशात 9 वा क्रमांक मिळवला आणि अधिकारी होण्याचे आपले स्वप्र पूर्ण केले.
अंजलीने बारावी पास झाल्यानंतर 2016 मध्ये यूपीएससीची तयारी सुरू केली. तिने एनसीईआरटी पुस्तके आणि ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून अभ्यास केला. पहिल्या तीन प्रयत्नात तिला पूर्व परीक्षाही पास करला आली नाही, मात्र चौथ्या प्रयत्नात तिने पूर्व, मुख्य आणि मुलाखत असे सर्व टप्पे पार करत यूपीएससी पास केली आणि अधिकारी बनली.
अंजलीने नवव्या क्रमांकासह यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. अंजली सध्या भारतीय वन सेवा अधिकारी म्हणून काम करत आहे. अंजलीच्या यशाने सामान्य कुटुंबात आणि कठीण परिस्थितीतही स्वप्ने पूर्ण करता येतात हे सिद्ध झाले आहे. ती आता सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान बनली आहे. एका मुलाखतीत अंजलीने सांगितले की, ‘मी अभ्यासक्रम समजून घेतला, मॉक टेस्ट दिल्या आणि तयारी केली. जर तुम्ही प्रामाणिकपणे कठोर परिश्रम केले तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल.’