वडिलांचे अंत्यसंस्कार थांबवून मुलाने दिला स्पर्धापरीक्षेचा कठीण इंटरव्ह्यू; रँक पाहून सर्वजण थक्क!

| Updated on: Jan 24, 2024 | 2:05 PM

UP PSC Exam Result Anand Singh Rajput 30 th Rank : वडिलांवरील अंत्यसंस्कार थांबवून मुलाने PSC इंटरव्ह्यू दिला. रँकने सर्वांनाच केलं चकीत! आनंद सिंह राजपूतची प्रेरणादायी कहानी... जेव्हा जेव्हा खचून गेल्यासारखं वाटतं तेव्हा तेव्हा वाचावी, अशी प्रेरणादायी कहानी... वाचा सविस्तर...

वडिलांचे अंत्यसंस्कार थांबवून मुलाने दिला स्पर्धापरीक्षेचा कठीण इंटरव्ह्यू; रँक पाहून सर्वजण थक्क!
Follow us on

नवी दिल्ली | 24 जानेवारी 2024 : आपल्या आयुष्यात थोडं काही घडलं की आपण खचून जातो. पण समाजात असे काही लोक असतात. ज्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळतो. मात्र ते खचत नाहीत. हिमतीने उभे राहतात आणि सगळ्यांसमोर आदर्श उभा करतात. अशीच एक कहानी… गोष्ट आहे उत्तप प्रदेशमधील आनंद सिंह राजपूत याची… उत्तर प्रदेश पीसीएस 2023 ही परीक्षा आनंद देत होता. मात्र तितक्यात त्याच्या जीवनात अनपेक्षित वळण आलं. त्यांच्या वडीलांचा हार्ट अॅटॅकने मृत्यू झाला. एका क्षणाला आनंदला वाटलं की आता सगळं संपलं. आपल्या पाया खालची जमीन सरकलीय… पण पुन्हा तो उमेदीने उभा राहिला.

आधी इंटरव्ह्युव मग वडीलांवर अंत्यसंस्कार

उत्तर प्रदेश पीसीएस परिक्षेची मुलाखत होती. या मुलाखतीची आनंद तयारी करत होता. मात्र या इंटव्ह्युवच्या आदल्या दिवशी त्याला कळालं की त्याच्या वडीलांचा मृत्यू झाला आहे. हार्ट अॅटॅकने त्यांचा मृत्यू झाला आहे. त्याला वाटलं आपला आधार गेला. आता पुढे आपलं कसं होणार? पण त्याने स्वत: ला सावरलं अन् इंटरव्ह्युव दिला. इंटरव्ह्युव देवून परत आल्यानंतर आनंदने आपल्या वडिलांवर अंत्यसंस्कार केले.

“आज वडील पाहिजे होते…”

आता या परिक्षेचा निकाल आला आहे. या परिक्षेत आनंदला भरघोस यश मिळालं. त्याचा 30 वा रँक आला. या निकालानंतर आनंदला आपल्या वडिलांची प्रकर्षाने आठवण येत आहे. परिक्षेतील हे यश म्हणजे माझ्या वडिलांना खरी श्रद्धांजली आहे. आज ते असते तर त्यांना किती आनंद झाला असता, असं आनंदने सांगितलं.

आईच्या डोळ्यात आनंदाश्रू

आनंदने मिळवलेलं हे यश पाहून त्याच्या आईला प्रचंड आनंद झाला. आनंदाश्रूंनी त्याच्या आईचा पदर आज भिजला आहे. आज जर आनंदचे वडील असते. तर त्यांना किती आनंद झाला असता? आपल्या मुलाचं हे यश पाहून त्यांचा आनंद गगनात मावला नसता. मला आनंदचा अभिमान आहे. त्याने मिळवलेलं यश म्हणजे आमची सगळ्यात मोठी कमाई आहे, असं आनंदच्या आईने म्हटलं.