AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CBSE Exam 2022 : ‘ऐन परीक्षेत समजा विद्यार्थ्याला कोरोना झाला तर…?’, ‘सीबीएसई’ ने केली सोय, विद्यार्थी निश्चिंत…

त्याचबरोबर कोविड-19 च्या केसेस सुद्धा वाढू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत, प्रत्येकाला कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन करण्याचा तसेच उष्णतेपासून त्यांचे संरक्षण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

CBSE Exam 2022 : 'ऐन परीक्षेत समजा विद्यार्थ्याला कोरोना झाला तर...?', 'सीबीएसई' ने केली सोय, विद्यार्थी निश्चिंत...
'सीबीएसई' ने केली सोय, विद्यार्थी निश्चिंत...Image Credit source: TV9 marathi
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: May 05, 2022 | 6:08 PM
Share

नवी दिल्ली  : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावी बारावी परीक्षा (Board Exam)देणाऱ्या विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण नोटीस बजावली आहे. सीबीएसईने कोविड-19 (Covid-19) संक्रमित विद्यार्थ्यांबाबत मोठी घोषणा केली आहे. कोरोना व्हायरस संसर्गामुळे जर एखादा विद्यार्थी दहावी किंवा बारावीची परीक्षा देऊ शकला नाही तर अशा विद्यार्थ्यांचा बोर्डाकडून टर्म-1 च्या कामगिरीच्या आधारे अंतिम निकाल मिळणार आहे असं सीबीएसई परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी सांगितलंय. सीबीएसई बोर्ड कोविड-19 प्रोटोकॉल लक्षात घेऊन परीक्षा घेत आहे. संयम भारद्वाज म्हटले की, बोर्डाच्या परीक्षेवेळी विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्यास त्या विद्यार्थ्याला कोविड रिपोर्ट सहित संपूर्ण माहिती द्यावी लागेल.

कंपार्टमेंट परीक्षेचे नियम

संयम भारद्वाज म्हणाले, बोर्डाच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना कंपार्टमेंट कॅटेगरीमध्ये ठेवले तरच कंपार्टमेंट परीक्षा देता येईल. बोर्ड विद्यार्थ्यांना कोणत्याही दोन विषयांमध्ये कंपार्टमेंट परीक्षेला बसण्याची परवानगी देते. या परीक्षा पाच ते सात दिवसांच्या कालावधीत घेतल्या जातात. त्याचबरोबर बारावीसाठी विद्यार्थ्यांना कंपार्टमेंटची परीक्षा एका दिवसात घेतल्या जातात.

CBSE मार्गदर्शक तत्त्वे

सीबीएसई बोर्डाने दहावी आणि बारावीची टर्म 2 ची परीक्षा सुरु होण्यापूर्वी विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वं जारी केली होती. सीबीएसई बोर्ड परीक्षा केंद्रातील प्रत्येकाला या मार्गदर्शक तत्वांचं सक्तीने पालन करावं लागणार आहे. आजकाल देशाच्या विविध भागात उष्णतेची लाट सुरु आहे. त्याचबरोबर कोविड-19 च्या केसेस सुद्धा वाढू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत, प्रत्येकाला कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन करण्याचा तसेच उष्णतेपासून त्यांचे संरक्षण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Follow Us
मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग... गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा
मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग... गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा मुंडे हे काय बोलून गेल्या?
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद अवैध? थेट नोटीस पाठवल्याने एकच खळबळ;
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद अवैध? थेट नोटीस पाठवल्याने एकच खळबळ; राष्ट्रवादी पक्षातील संघर्ष चव्हाट्यावर?
पेपरफुटीतील एकालाही सोडणार नाही! दादा भुसेंचा मोठा इशारा...
Dada Bhuse | पेपरफुटीतील एकालाही सोडणार नाही! दादा भुसेंचा मोठा इशारा... नेमकं काय म्हणाले?
लग्न झाल्याच्या दीड वर्षातच भयंकर.... एकीकडे लेकीच्या बारशाची लगबग
लग्न झाल्याच्या दीड वर्षातच भयंकर.... एकीकडे लेकीच्या बारशाची लगबग दुसरीकडे आईनं संपवलं जीवन
सुरत बायपासवर मृत्यूचा सापळा! कंटेनरच्या धडकेत 5 वर्षीय चिमुकल्यासह वड
Dhule | सुरत बायपासवर मृत्यूचा सापळा! कंटेनरच्या धडकेत 5 वर्षीय चिमुकल्यासह वडिलांचा मृत्यू
उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर सचिन अहिरांना शिंदे गटाकडून मोठं गिफ्ट?
मोठी बातमी! उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर सचिन अहिरांना शिंदे गटाकडून मोठं गिफ्ट? थेट वरळीतच...
देवाभाऊ-शिंदेभाऊंना लाडक्या बहिणींचा खर्च जड झाला का?
देवाभाऊ-शिंदेभाऊंना लाडक्या बहिणींचा खर्च जड झाला का?; सुनेत्रा पवारांना रोहिणी खडसेंचं थेट आवाहन, म्हणाल्या...
सावधान! तुम्ही वापरत असलेलं तेल इतकं अशुद्ध की... FDA च्या कारवाईत
सावधान! तुम्ही वापरत असलेलं तेल इतकं अशुद्ध की... FDA च्या कारवाईत धक्कादायक खुलासा
भररस्त्यात दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला बॅनर; अन् पुढे जे घडलं...
थरारक VIDEO! भररस्त्यात दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला बॅनर; अन् पुढे जे घडलं...
काँग्रेसला मोठा धक्का? तालुकाध्यक्षांसह 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर!
मोठी घडामोड! गोंदियात काँग्रेसला मोठा धक्का? तालुकाध्यक्षांसह 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर!