AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डिजिटल लायब्ररी म्हणजे काय?

डिजिटल लायब्ररी म्हणजे काय आणि या लायब्ररीच्या मदतीने लाभ कसा मिळवता येईल हे तुम्हाला माहित आहे का?

डिजिटल लायब्ररी म्हणजे काय?
Digital LibraryImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Feb 08, 2023 | 10:51 AM
Share

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प (अर्थसंकल्प 2023) सादर केला असून यामध्ये शिक्षण क्षेत्रासाठी अनेक महत्त्वाच्या गोष्टींची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनामध्ये शिक्षणाचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी डिजिटल लायब्ररी उभारण्यात येणार असून सर्व शाळा डिजिटल लायब्ररीशी जोडल्या जातील, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. या ग्रंथालयांमध्ये भूगोल आणि साहित्यविषयक पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. परंतु डिजिटल लायब्ररी म्हणजे काय आणि या लायब्ररीच्या मदतीने लाभ कसा मिळवता येईल हे तुम्हाला माहित आहे का?

नावाप्रमाणेच, डिजिटल लायब्ररी ही अशी लायब्ररी आहे जिथे डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पुस्तके अस्तित्वात आहेत. इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या साहाय्यानेच ही पुस्तके उपलब्ध होऊ शकतात.

डिजिटल लायब्ररीला ऑनलाइन लायब्ररी आणि इंटरनेट लायब्ररी असेही म्हणतात. डिजिटल लायब्ररीची सर्वात खास गोष्ट म्हणजे वाचक जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात बसून त्याचा वापर करू शकतो.

देशातील अधिकाधिक लोक या क्षेत्राकडे आकर्षित होत असले तरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे डिजिटल लायब्ररी प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

इंटरनेटच्या साहाय्याने विद्यार्थी कुठेही डिजिटल लायब्ररीचा वापर करू शकतात. डिजिटल ग्रंथालयांमध्ये कोणत्याही भौतिक ग्रंथालयापेक्षा अमर्याद जागा असते. या लायब्ररीमध्ये जगभरातील जवळपास सर्व पुस्तके डिजिटल स्वरूपात उपलब्ध असतील, जी कोणत्याही ठिकाणाहून पाहता येतील.

विद्यार्थ्यांना कोणत्याही ठिकाणी जाऊन पुस्तकासाठी नोंदणी करण्याची गरज भासणार नाही, तर विद्यार्थ्यांना घरबसल्या आपल्या आवडीची पुस्तके वाचता येणार आहेत. अर्थसंकल्पीय घोषणे दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, राज्य डिजिटल लायब्ररी सर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली जाईल.

त्यासाठी पंचायत व प्रभाग स्तरापर्यंत राष्ट्रीय डिजिटल वाचनालय सुरू करण्यात येणार आहे. साहित्यापासून ते भूगोलपर्यंत सर्व पुस्तके येथे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान