Graphics Designing Jobs 2022: या कोर्सद्वारे डिजिटल इंडियाच्या दिशेने वाटचाल करत आहे तरूणाई, तुम्हीही या प्रवेश !

| Updated on: Aug 24, 2022 | 2:56 PM

सफलता डॉट कॉम ने ग्राफिक्स डिझाइनिंगचा एक स्पेशल कोर्स लाँच केला आहे. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हीही महिन्याभरात हजारो रुपये कवमू शकता. हा कोर्स करण्यासाठी कोणत्याही डिग्री अथवा डिप्लोमाची गरज नाही.

Graphics Designing Jobs 2022: या कोर्सद्वारे डिजिटल इंडियाच्या दिशेने वाटचाल करत आहे तरूणाई, तुम्हीही या प्रवेश !
Follow us on

मुंबईः आपले उत्पादन अथवा सुविधांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे, या प्रक्रियेस मार्केटिंग (Marketing) म्हटले जाते. कोणत्याही ब्रँडसाठी त्यांची क्वॉलिटी जितकी महत्वाची आहे, तितकेच त्याचे मार्केटिंगही महत्वाचे ठरते. तुमचा व्यवसाय नवा असो वा जुना, मोठा असो किंवा लहान, मार्केटिंग महत्वपूर्ण ठरते. आजच्या आधुनिक काळात मार्केटिंगच्या पद्धतीतही बदल झाला आहे. यापूर्वी पारंपारिक पद्धतीने एखाद्या ब्रँडचे मार्केटिंग केले जायचे मात्र आता ती जागा डिजिटल मार्केटिंगने (Digital Marketing) घेण्यास सुरूवात केली आहे. या दोन्ही पद्धतींमध्ये एक समान गोष्ट आहे, ती म्हणजे ग्राफिक्स डिझाइन(Graphic Design). तुम्हाला चांगली नोकरी हवी असेल तर लगेचच सफलता डॉट कॉमद्वारे चालवण्यात येणाऱ्या Advance Graphic Designing Course साठी प्रवेश घेऊ शकता. या कोर्ससाठी (Course)प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांना दोन महिन्यात डिझाइनिंगशी निगडीत सर्व टूल्सची पूर्ण माहिती शिकवली जाते. त्याशिवाय या विशेष कोर्ससाठी प्रवेश घेणाऱ्यांकडून प्रॅक्टिकलही करून घेतले जाईल.

भविष्यात किती संधी ?

एका रिपोर्टनुसार, ग्राफिक्स डिझाइनिंग मध्ये 2020 आणि 2030 पर्यंत सुमारे 3 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यानुसार, दरवर्षी या क्षेत्रात 23,900 ग्राफिक्स डिझायनर्सची मागणी असते. ऑनलाइन इंडस्ट्रीमध्ये सतत आपल्या सेवा आणि उत्पादने सुधारण्यासाठी आणि त्यांचा विस्तार करण्यासाठी कंपन्यांना डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट आणि चांगल्या ग्राफिक्स डिझायनर्सची गरज असते. CII नुसार, 2020 सालली भारतातील डिझाइन उद्योग 18,832 कोटी रुपयांचा होता, जो 2021 साली वाढला. या उद्योगाची वार्षिक वाढ 23 ते 25% दराने होत आहे.

मुलींना पुढे जाण्याची संधी मिळत आहे –

आग्रा येथील आयुषी गोएल हिला बॅचलर डिग्री पूर्ण केल्यानंतर कोणतीही नोकरी मिळाली नाही, म्हणून तिने क्रिएटिव्हिटीला चालना देण्यासाठी शॉर्ट-टर्म ग्राफिक्स डिझाइनिंग कोर्ससाठी प्रवेश घेतला. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आयुषी हिला आर्ट ग्लोर कंपनीमध्ये ग्राफिक्स डिझायनरचा जॉब मिळाला. तर चंदीगडमधील सिमी महावर ने सफलता डॉट कॉमचा ॲडव्हान्स्ड ग्राफिक डिझाइनिंग कोर्ससाठी प्रवेश घेतला. तो पूर्ण झाल्यानंतर तिला बॉलीग्रेड स्टुडिओजमध्ये ग्राफिक-डिझायनर इंटर्न म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

डिजिटल इंडियाच्या दिशेने वाटचाल करत आहेत तरुण –

तरुणांच्या रोजगाराच्या समस्या दूर करण्यासाठी आणि डिजीटल इंडियाच्या दिशेने वाटचाल करता यावी यासाठी सफलता डॉट कॉमने डिजीटल मार्केटिंगची दूसरी बॅच सुरू केली असून त्यातील अभ्यासक्रम या क्षेत्रातील तज्ज्ञांनी डिझाइन केला आहे. या बॅचचमध्ये अंकुर गुप्ता, अमित दुग्गल, मनीष पांडे यांसारख्या तज्ज्ञांकडून शिकण्याची संधी मिळेल, तसेच इंटर्नशिपचीही संधी मिळेल. तसचे या बॅचमध्ये कोर्स सर्टिफिकेट आणि जॉब प्लेसमेंट असिस्टटन्सही मिळू शकेल. या कोर्सचे वैशिष्ट्य म्हणजे तो हिंदीत उपलब्ध असून त्याची किंमतही कमी आहे.

स्पर्धा परीक्षांसाठी करा कसून तयारी –

NDA/NA CUET यांसारख्या प्रवेश परीक्षांसाठी अथवा सरकारी नोकरीच्या परीक्षांसाठी तयारी करणारे तरुण घरी बसूनच सफलता डॉट कॉमची मदत घेऊ शकतात. यूपी कॉन्स्टेबल, यूपी लेखापाल, रेल्वे ग्रुप D, SSC CHSL, SSC MTS तसेच अन्य परीक्षांची तयारी करण्यासाठी अनेक वर्षांचा अनुभव असलेले तज्ज्ञ आणि प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली अनेक अभ्यासक्रम सुरू आहेत.