सेनेला उत्तर प्रदेश आणि गोवा निवडणुकीत दरवेळी डिपॉझिट घालवण्यासाठी पैसे मिळतात, ते घालवतात- चंद्रकांत पाटील

| Updated on: Jan 08, 2022 | 6:30 PM

पाच राज्याच्या निवडणुका या निवडणूक आयोग ठरवतो, संजय राऊताना साऱ्या जगाच्या विषयावर बोलण्याचा अधिकार आहे, मात्र अलीकडे त्यांना कुणी सिरीयस घेत नाहीत, असा टोला पाटलांनी लगावला आहे.

सेनेला उत्तर प्रदेश आणि गोवा निवडणुकीत दरवेळी डिपॉझिट घालवण्यासाठी पैसे मिळतात, ते घालवतात- चंद्रकांत पाटील
संजय राऊत, चंद्रकांत पाटील
Follow us on

काही वेळापूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊत निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर पंतप्रधान मोदींना डिवचून गेले, त्यानंतर त्यांनी भाजपवर टीका करतही चौफेर बँटिंग केली, त्यांनी उत्तर प्रदेशातील जास्त निवडणूक टप्प्यांवरूनही घणाघाती आरोप केले, त्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय. पाच राज्याच्या निवडणुका या निवडणूक आयोग ठरवतो, संजय राऊताना साऱ्या जगाच्या विषयावर बोलण्याचा अधिकार आहे, मात्र अलीकडे त्यांना कुणी सिरीयस घेत नाहीत, असा टोला पाटलांनी लगावला आहे.

शिवसेनेवरही चंद्रकांत पाटलांची खरपूस टीका

आगामी निवडणुकातही शिवसेनाही उतरणार आहे, त्यावरून त्यांनी शिवसेनालाही जोरदार टोला लगावला आहे, सेनेला उत्तर प्रदेश आणि गोव्यात निवडणूक लढवण्यासाठी दरवेळेस डिपॉझिट घालण्यासाठी पैसे मिळतात, त्यामुळे ते डिपॉझिट घालवतात, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेचाही समाचार घेतला आहे. महाविकास आघाडी संविधान मानत नसले तरी आम्ही मानतो, विरोधकांना त्यांच्या सोयीनुसार झालं की मग योग्य वाटतं असेही ते म्हणाले तसेच संजय राऊत यांना सर्व जगाचं कळतंय, अशी कोपरखिळीही त्यांनी लगावली आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

संजय राऊत यांनी पंतप्रधानांनी सभा घेऊ नये, त्यांनी इतरांना एक आदर्श घालून द्यावा अशी प्रतिक्रिया दिली आहे, बंगालच्या सभांमध्ये काय झालं हे आपण सर्वांनी पाहिले आहे, त्यामुळे पंतप्रधानांनी याचा विचार करावा, असे म्हणत संजय राऊतांनी पंतप्रधानांना डिवचले आहेत. कोरोनाच्या काळात या निवडणुका पार पडत आहेत, निवडणूक आयोगाने यासाठी घालून दिलेली नियमवली सर्वांना सारखी असावी ती एका राजकीय पक्षाच्या सोयीची नसावी, निवडणूक आयोगावर आमचा विश्वास आहे, असाही टोला राऊतांनी लगावला आहे. त्यावर आता भाजपकडून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

‘ममता सिंधूताई’ यांना कोरोनाची लागण ; अंत्यविधीसह सर्व ठिकाणी उपस्थित होत्या, चिंता वाढली

Toyota Hilux 23 जानेवारीला भारतात लाँच होणार, बुकिंग्स सुरु, पाहा लुक्स आणि फीचर्स

बूस्टर डोसची तयारी पूर्ण, दहा जानेवारीपासून ज्येष्ठांना तिसरा डोस – राजेश टोपे