Toyota Hilux 23 जानेवारीला भारतात लाँच होणार, बुकिंग्स सुरु, पाहा लुक्स आणि फीचर्स

Toyota Hilux पिकअप 23 जानेवारी रोजी भारतात लॉन्च होईल. Toyota Hilux साठी बुकिंग्स घेण्यास कंपनीने सुरुवात केली आहे. बुकिंग्सची रक्कम 50,000 ते 2 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.

Toyota Hilux 23 जानेवारीला भारतात लाँच होणार, बुकिंग्स सुरु, पाहा लुक्स आणि फीचर्स
Toyota Hilux

मुंबई : Toyota Hilux पिकअप 23 जानेवारी रोजी भारतात लॉन्च होईल. Toyota Hilux साठी बुकिंग्स घेण्यास कंपनीने सुरुवात केली आहे. बुकिंग्सची रक्कम 50,000 ते 2 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. ही रक्कम डीलरशिपवर अवलंबून आहे. टोयोटाच्या हिलक्स लाइफस्टाइलला पिकअप ट्रक्सच्या सेगमेंटमध्ये स्थान दिले जाते, जिथे या ट्रकचा एकमेव स्पर्धक Isuzu D-Max असेल. (Toyota Hilux to launch on January 23 in India, bookings open)

पण लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इनोव्हा क्रिस्टा आणि फॉर्च्युनर या दोन्ही गाड्या भारतातच बनवल्या जातात, म्हणजेच किंमत कमी ठेवणे हे टोयोटासमोरचे मोठे आव्हान असणार नाही. जागतिक स्तरावर, हिलक्स हे टोयोटाचे लोकप्रिय मॉडेल आहे, 1968 मध्ये पहिल्यांदा लॉन्च झाल्यापासून आतापर्यंत या ट्रकच्या 1.8 कोटी युनिट्सची विक्री झाली आहे.

टोयोटा हिलक्सची अपेक्षित किंमत

इसुझू डी-मॅक्स हा सध्या भारतात विक्रीसाठी असलेला एकमेव लाईफस्टाईल पिकअप ट्रक आहे आणि लॉन्च झाल्यावर तो टोयोटा हिलक्सचा एकमेव प्रतिस्पर्धी असेल. इसुझू डी-मॅक्सची एक्स शोरुम (दिल्ली) किंमत 18.05 लाख रुपये ते 25.60 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. Hilux च्या किंमतीबद्दल कोणतीही बातमी समोर आलेली नाही. मात्र असे मानले जात आहे की, या लाईफस्टाईल ट्रकची किंमत 30 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) आसपास असू शकते.

2021 टोयोटा हिलक्स फेसलिफ्ट मॉडेल, जे अलीकडेच जागतिक बाजारपेठेत सादर केले गेले आहे, ते IMV-2 प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. टोयोटाची फॉर्च्युनर एसयूव्ही आणि इनोव्हा क्रिस्टा देखील याच प्लॅटफॉर्मवर आधारित आहेत. जागतिक बाजारपेठेत विकले जाणारे Hilux मॉडेल 2.8 लीटर टर्बो डिझेल इंजिनसह सुसज्ज आहे, जे सहा-स्पीड मॅन्युअल किंवा सहा-स्पीड ऑटोमॅटिक ट्रांसमिशन युनिटशी जोडलेले आहे.

टोयोटा हिलक्स पिकअप ट्रकचे फंक्शन्स

हिलक्स एक सक्षम ऑफ-रोडर मानला जातो, तसेच लाईफस्टाईल व्हीकल म्हणून भूमिका बजावण्यासाठी केबिनमध्ये अनेक सुखसोयी आणि सुविधा दिल्या आहेत. यामध्ये अॅम्बियंट लाइट, ऑटो एअर कंडिशनिंग, आठ इंची इन्फोटेनमेंट स्क्रीन, जेबीएल स्पीकर यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे. भारतात, टोयोटा हिलक्स फॉर्च्युनरसोबत काही प्रमुख भाग शेअर करण्याची शक्यता आहे आणि त्याची किंमत 30 लाख रुपये इतकी असू शकते. हे वाहन भारतीय बाजारात इसुझू व्ही-क्रॉसला टक्कर देईल.

इतर बातम्या

कारसाठी NOC का गरजेचं? जाणून घ्या अप्लाय करण्याची सोपी ऑनलाईन पद्धत

1.5 ते 2 रुपयात एक किलोमीटरचं मायलेज, Hero, TVS, Bajaj च्या एकापेक्षा एक बाईक बाजारात उपलब्ध

Mahindra Thar ला टक्कर देणारी Force Gurkha SUV महागली, जाणून घ्या नवीन किंमत

(Toyota Hilux to launch on January 23 in India, bookings open)

Published On - 6:15 pm, Sat, 8 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI