‘ममता सिंधूताई’ यांना कोरोनाची लागण ; अंत्यविधीसह सर्व ठिकाणी उपस्थित होत्या, चिंता वाढली

पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठ्याप्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. त्यानंतर शहारतील ठोसरपागा स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात महानुभाव पद्धतीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. शहारातील वाढती कोरोनाचे रुग्ण वाढत आहे.

'ममता सिंधूताई' यांना कोरोनाची लागण ; अंत्यविधीसह सर्व  ठिकाणी उपस्थित होत्या, चिंता वाढली
mamta sindhutai sapkal

पुणे – ‘अनाथांची माय’ म्हणून ओळखलया जाणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां सिंधुताई सपकाळ (74) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने नुकतेच निधन झाले. त्यानंतर तीन दिवसांनी त्यांची मुलगी ममता सिंधुताई यांना करोनाची लागण झाल्याचं माहिती समोर आली आहे ममता या सिंधुताई सपकाळ यांच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होत्या.त्यामुळे चिंता वाढली आहे.

अशी दिली माहिती

ममता सिंधूताई यांनी फेसबुकवर पोस्ट करुन कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे. आपल्या संपर्कात आलेल्या इतरांनी काळजी घेण्याचं आवाहन ममता यांनी केलं आहे. माईंच्या मृत्यूनंतर हडपसर येथील मांजरी येथील सन्मती बाल निकेतन संस्थेत त्यांचे पार्थिव आणण्यात आल होतं. त्यावेळी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठ्याप्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. त्यानंतर शहारतील ठोसरपागा स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात महानुभाव पद्धतीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. शहारातील वाढती कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. रुग्णसंख्या वाढीचा वेग लक्षात घेता महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा सर्तक झाली आहे. शहरातील जम्बो कोविड सेंटर हे तयार ठेवले आहे

शहरातील कोरोनाच्या रुग्णाची सद्यस्थिती आज कोरोनाच्या 2 हजार 471 रुग्णांचे निदान झाले आहे. शुक्रवारच्या तुलनेत शहरातील प्रतिदिन रुग्णसंख्या काही प्रमाणात घटली आहे. शहरात शुक्रवारी 2 हजार 757 रुग्ण आढळले होते. तर आज शहरातील 711  रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. कोरोनामुळे पुणे शहरातील दोन तर पुण्याबाहेरील एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरातील आतापर्यंतची पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 5  लाख 22 हजार 6 वर गेली आहे. सध्या शहरात 11 हजार 550 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरात 19 हजार186  कोरोनाच्या चाचण्या केल्या होत्या त्यामध्ये 2 हजार 471  जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे शहरातील आजचा पॉझिटिव्हिटी रेटही कमी होऊन तो 6.06  टक्क्यांपर्यंत आला आहे.

Toyota Hilux 23 जानेवारीला भारतात लाँच होणार, बुकिंग्स सुरु, पाहा लुक्स आणि फीचर्स

बूस्टर डोसची तयारी पूर्ण, दहा जानेवारीपासून ज्येष्ठांना तिसरा डोस – राजेश टोपे

कारसाठी NOC का गरजेचं? जाणून घ्या अप्लाय करण्याची सोपी ऑनलाईन पद्धत

Published On - 6:22 pm, Sat, 8 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI