जनरल बिपिन रावत यांच्या भावाचा भाजप प्रवेश; इथून लढणार निवडणुक

| Updated on: Jan 19, 2022 | 12:33 PM

कर्नल विजय रावत यांनी दिल्लीत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह यांची भेट घेतल्याची मोठी चर्चा होती.

जनरल बिपिन रावत यांच्या भावाचा भाजप प्रवेश; इथून लढणार निवडणुक
कर्नल विजय रावत,
Follow us on

उत्तराखंड – भाजपमध्ये (bjp) चर्चेतल्या अनेक चेह-यांना संधी देण्याचं काम भाजप पक्ष श्रेष्ठी केलं जात आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून भाजपकडून अनेक नेत्यांच्या मुलांना किंवा चर्चेत असलेल्या व्यक्तीच्या घरी उमेदवारी जाहीर केल्याचं आपण पाहतोय. तोच प्रयोग आता भाजपकडून उत्तराखंडमध्ये (uttarakhand) केला आहे, सीडीएस जनरल बिपिन रावत (bipin rawat) यांचे धाकटे भाऊ कर्नल विजय रावत (vijay rawat) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

कर्नल विजय रावत यांनी दिल्लीत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह यांची भेट घेतल्याची मोठी चर्चा होती. त्यामुळे त्यांना भाजपकडून तिकीट मिळेल अशी चर्चा होती. ती खरी ठरली आहे.
डेहराडून उमेदवारी जाहीर होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. पुढच्या 14 तारखेला उत्तराखंडचंमध्ये निवडणुका होणार असून 10 मार्चला निवडणुकांचा निकाल असेल.

भाजपचं काम करण्यासाठी मी पक्षाशी जोडला जात असून आमच्या कुटुंबाची भाजपची विचारसरणी जुळत असल्याचं त्यांनी एका वाहिणीशी बोलताना सांगितलं. हेलिकॉप्टर दुर्घटनेत जनरल बिपिन रावत आणि यांच्या त्यांच्या पत्नीचं डिसेंबर महिन्यात निधन झालं. कर्नल विजय रावत हे त्यांचे सख्खे भाऊ आहेत.

पाच राज्यांची निवडणुक जाहीर झाल्यापासून भाजपने प्रत्येक राज्यात कंबर कसली आहे. प्रत्येक ठिकाणी विजय गरजेचा असल्याचे लक्षात असल्याने, प्रत्येक पाऊल टाकताना अधिक विचार केला जातोय हे आत्तापर्यंतच्या राजकारणावरून तुमच्या लक्षात आलं असेल. अनेक ठिकाणी भाजपच्या आमदारांना नाकारून नव्या उमेदवारांना संधी दिल्याचे चित्र आहे. तसेच युपीत ओबीसी कार्ड खेळल्याचे म्हणटले जात आहे. येणा-या निवडणुकीत कोण किती ठिकाणी बाजी मारेल हा मार्च महिन्याच्या 10 तारखेला स्पष्ट होईल.

Uttar pradesh assembly election 2022: अखिलेश यादव आझमगडच्या गोपालपुरातून विधानसभा लढणार

कोण आहेत अपर्णा यादव? ज्यांनी मुलायमसिंह यादव, अखिलेश यादव यांना घरातच दिलं आव्हान; वाचा सविस्तर

Uttar Pradesh Election: मुलायमसिंह यादवांच्या घरातच फूट; सून अपर्णा यादव भाजपात; निवडणुकीच्या धामधुमीत समाजवादी पार्टीची कोंडी