कोण आहेत अपर्णा यादव? ज्यांनी मुलायमसिंह यादव, अखिलेश यादव यांना घरातच दिलं आव्हान; वाचा सविस्तर

कोण आहेत अपर्णा यादव? ज्यांनी मुलायमसिंह यादव, अखिलेश यादव यांना घरातच दिलं आव्हान; वाचा सविस्तर
नेत्या अपर्णा यादव

समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांची धाकटी सून अपर्णा यादव यांनी आज भारतीय जनता पक्षातात प्रवेश केला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 19, 2022 | 11:41 AM

दिल्ली – मुलासिंह यांची सुन अपर्णा यादव (aprana yadav) यांनी आज भाजप (bjp) पक्षात प्रवेश केल्याने राजकीय (up politics) समीकरण बदल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. मागच्या अनेक दिवसांपासून युपीत राजकारण तापल्याचे पाहायला मिळत होते. परंतु नुकत्याच झालेल्या प्रवेशामुळं कोणाचं पारडं जड होणार हे सुध्दा पाहावयास मिळणार आहे.

समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांची धाकटी सून अपर्णा यादव यांनी आज भारतीय जनता पक्षातात प्रवेश केला आहे. त्यांचा पक्षप्रवेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी केला असल्याची जोरदार चर्चा.त्यादरम्यान उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्यही उपस्थित होते. पक्ष प्रवेशावेळी अपर्णा यादव यांना भाजपचे सदस्यत्व देण्यात आले. अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अखिलेश यादव यांच्यावर जोरदार हल्ला केला.

सद्याच्या भाजपच्या नेत्या अपर्णा यादव या मुलायम सिंह यांच्या दुसऱ्या पत्नी साधना गुप्ता यांचा मुलगा प्रतीक यादव यांच्या पत्नी आहेत. त्यांनी 2017 ची विधानसभा निवडणूक लखनऊच्या कँट मतदारसंघातून लढवली होती. त्यावेळी त्या समाजवादी पक्षाच्या नेत्या होत्या. त्यावेळी भाजपच्या रिटा बहुगुणा जोशी यांच्याकडून पराभव झाला. त्यावेळी अपर्णा यांना जवळपास 63 हजार मते मिळाली होती. रिटा बहुगुणा जोशी या खासदार झाल्यानंतर तिथली जागा रिक्त झाली. त्यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे सुरेशचंद तिवारी चौथ्यांदा आमदार झाले.

रिटा बहुगुणा जोशी त्या क्षेत्रासाठी आपल्या मुलासाठी उमेदवारी भाजपकडे उमेदवारी मागत होत्या. परंतु त्यांना तिथं डावलेल्यामुळे त्या काय निर्णय घेतात हे सुध्दा लवकरचं पाहायला मिळेल. तिथं मुलासाठी उमेवारी घेऊन त्या इतर ठिकाणी उमेदवारी मागणार होत्या असंह सुत्रांकडून समजतंय. अपर्णा यादव नेहमीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना आपण पाहिलंय, त्यामुळे त्या कधीतरी आपलं पाऊल तिरक टाकतील अशी सुध्दा चर्चा होती, पण लोकांची चर्चा खरी ठरली आहे. तसेच त्यांनी राम मंदिरासाठी 11 लाख 11 हजारांची देणगीही दिली आहे.

अरविंद केजरीवाल यांचा फॉर्म्युला अखिलेश यादव यांना उत्तर प्रदेशात विजयाच्या जवळ घेऊन जाणार?

फॉर्ममध्ये नाव लिहा, 300 यूनिट वीज मोफत घ्या; सपाच्या ऑफरने भाजप, बसपाची कोंडी?

असदुद्दीन ओवेसी बिघडवू शकतात अखिलेश यादवांचा खेळ


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें