यूपी विधानसभा 2022: असदुद्दीन ओवेसी बिघडवू शकतात अखिलेश यादवांचा खेळ

ओवेसी यांच्या उमेदवारांची नावे जाहीर होताच उत्तर प्रदेशमधील काही जिल्ह्यात अखिलेश यादव यांचा राजकीय खेळ बिघडणार असल्याचे चित्र दिसत आहे.

यूपी विधानसभा 2022: असदुद्दीन ओवेसी बिघडवू शकतात अखिलेश यादवांचा खेळ
Asaduddin Owaisi
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 8:48 PM

लखनऊ: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Assembly Election) पूर्वेसंध्येला ओवसी यांनी आता फक्त 9 उमेदवारांचीच नावे घोषित केली तर समाजवादी आणि आरएलडी पक्षाचे धाबे दणाणले आहेत. या निवडणुकीत ओवेसी (Asaduddin owaisi) यांनी शंभरच्या शंभर उमेदवार उतरवले तर समाजवादी आणि आरएलडी यांच्या गठबंधनाचे काय होईल असा सवाल उपस्थित होत आहे. उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आता सर्व पक्षांनी आपापले मोहरे उतरविण्यास सुरूवात केली आहे.

सध्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील सर्वच जागांवर पक्षातील उमेदवार अजून आमने-सामने आले नाहीत. यामुळे निवडणुकीत उमेदवारांची नावे जाहीर झाली की, उत्तर प्रदेशमधील निवडणुकीला खरी रंगत येणार आहे. असुदुद्दीन ओवेसी यांनी पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत आपल्या पक्षाचे 9 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. राहिलेल्या इतर जागांवरही आता लवकरच नावे निश्चित होणार आहेत.

उत्तर प्रदेशमधील निवडणुकीत ओवेसी यांचे उमेदवार रिंगणात उतरल्यानंतर आता समाजवादी आणि रालोदचे धाबे दणाणले आहेत. सध्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीतील कोणतेही उमेदवार अजून आमने-सामने आले नाहीत. त्यामुळे या निवडणुकीतील नावे जाहीर झाल्यानंतरच उत्तर प्रदेशमधील सामना कसा रंगणार आहे हे कळणार आहे.

ओवेसी यांच्या उमेदवारांची नावे जाहीर होताच उत्तर प्रदेशमधील काही जिल्ह्यात अखिलेश यादव यांचा राजकीय खेळ बिघडणार असल्याचे चित्र दिसत आहे. रविवारी असुदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या पक्षातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामधील सर्व उमेदवार हे मुस्लिम असून ओवेसी यूपीमध्ये वंचित समाज संमेलन घेत आहेत. ओवेसी आपल्या भाषणातून मुस्लिम समाजाबरोबरच दलित आणि वंचित घटकातील अधिकाराच्या लढाईची भाषा करतात, मात्र या निवडणुकीत त्यांनी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत आरक्षित एकाही जागेवर त्यांनी उमेदवार दिला नाही. त्यामुळे यावरून स्पष्ट होते की, ओवेसी वंचित घटकातील समाजाला कुठेपर्यंत साथ देणार आहेत. त्यांच्या प्रचारसभा आणि रॅलीमध्ये बोलणारे सगळेच मुस्लिम, मंचावर बसणारेही मुस्लिम आणि भाषण ऐकणारेही मुस्लिम समाजातीलच असतात.

काही जागांवर मुस्लिम उमेदवारांबरोबर काटे की टक्कर ओवेसी यांच्या पक्षाची यादी जाहीर झाल्यानंतर काही जागांवर रंगतदार लढत होणार आहे. गाजियाबादमधील लोनी विधानसभेच्या जागेवर समाजवादी, कॉंग्रेस आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन पक्षाचे मुस्लिम उमेदवार आपआपसात लढणार आहेत. अशीच लढत हापूड जिल्ह्यातील धौलाना जागेवर समाजवादी, बसपा आणि मजलिसच मुस्लिम उमेदवारांची टक्कर होणार आहे. गडमुक्तेश्वरमध्येही बसपाचे मोहम्मद आरिफ यांना मजलिसचे फुरकान चौधरी लढत देणार आहेत. मेरठमध्ये मजलिसचे उमेदवार तस्लीम अहमद यांनी सपाच्या शाहिद मंजूर यांच्या अडचणीत वाढ करून ठेवली आहे. शाहिद मंजूर अखिलेश सरकारचे मंत्री आहेत. तर सिवालखासमध्ये मजलिसचे रफत अली बसपाचे मुकर्रम अली उर्फ नन्हे खान यांच्या मार्गात अडथळा आणणार आहेत. या सगळ्या राजकीय समीकरणाचा फायदा भाजपला मिळण्याची शक्यता आहे.

ओवेसींकडून आधीच आपल्या उमेदवारांची घोषणा सहारनपूर आणि बेहटमध्ये अमजद अली आणि सहारनपूर नगरमध्ये महबूब हसन यांची उमेदवारी जाहीर करून ओवेसी यांनी आपले इरादे साफ केले आहेत. या जागेवर समाजवादी, आरएलडीने उमेदवारी जाहिर केले ना बसपा ना कॉंग्रेसने. या जागांवर मजलिसकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोन्ही पक्षाच्या उमेदवारीचा घोळ वाढला आहे. समाजवादी आणि आरएलडीच्या गठबंधनात तिकिटासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन समाजवादी पक्षात गेलेले माजी आमदार आणि कॉंग्रेसच राष्ट्रीय सचिव राहिलेले इमरान मसूद आणि कॉंग्रेसचे आमदार मसूद अख्तर यांना अजूनही उमेदवाही दिली गेली नाही. हे दोन्हीही उमेदवार आता बसपाच्या तिकिटासाठी जुगाड करत आहेत. त्यामुळे ओवेसी यांचा पक्ष याचा फायदा उठविण्याच्या तयारीत आहेत.

मुजफ्फरनगरमध्ये समाजवादी-आरएलडीच्या गठबंधनाने मुस्लिम नाराज समाजवादी आणि आरएलडीच्या गठबंधनामुळे मुजफ्फरनगरसह काही जिल्ह्यात जाट-मुस्लिम एकतेचा फायदा होईल असे वाटत असतानाच या गठबंधनामुळे मुजफ्फरनगरमधील मुस्लिम समाज नाराज झाला आहे. त्यामुळे याठिकाणी एकही मुस्लिम उमेदवार देण्यात आला नाही. मुजफ्फरनगर जिल्ह्यातील पाच जागांवर गठबंधनाच्या पाच जागांची घोषणा झाली आहे, मात्र यामध्ये एकही उमेदवार मुस्लिम नाही. यामध्ये आता फक्त एका मुजफ्फरनगरची एकच उमेदवारी बाकी आहे, तरीही गठबंधनामधील दोन्ही पक्षाकडूनही सांगण्यात येत आहे की, या ठिकाणीही त्यांचा उमेदवार नसणार आहे. यावर समाजवादी पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, धर्म आणि जाती बघून तिकिट दिले जात नाही. तसेच आरएलडीच्यावतीने सांगण्यात येत आहे की, शामलीमध्ये दोन मुस्लिम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहेत.शामली हा मतदारसंघ आधीपासूनच मुजफ्फरनगरचा हिस्सा होता.

नाराज मुस्लिम नेता मुजफ्फरनगर जिल्ह्यामध्ये ओवेसी समाजवादी आणि आरएलडीच्या गठबंधनाचा खेळ बिघडवू शकतात. राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू आहे की, या पक्षातील नेते तिकीटासाठी ओवेसी यांच्या संपर्कात आहेत. या मतदारसंघात ओवेसी यांनी तगडा मुस्लिम उमेदवार दिला तर सपा आणि रालोद यांच्या गठबंधनाच्या विजय कठीण असणार आहे. जिल्ह्यातील कादिर राणा, मुरसलीन राणा, लियाकत अली असे राजकारणातील तगडे नेते सपा आणि रालोदच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यास इच्छूक होते. कादिर राणा हे तर खासदार आणि आमदार म्हणून निवडून आले होते. त्यामुळे मुस्लिम समाज नाराज झाला आहे, त्यामुळे यांच्या नाराजाची परिणाम गठबंधनला सोसावा लागणार आहे. त्यामुळे या राजकीय लढाईत ओवेसी यांनी तगडा उमेदवार दिला तर मुस्लिम समाज त्यांच्यासोबत जाऊन समाजवादी-आरएलडीला मोठा धक्का देऊ शकतात.

Non Stop LIVE Update
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.