Goa Elections 2022 : काँग्रेसनं 432 कोटी दिले होते, भाजपनं 2,567 कोटी दिले! गोव्यासाठी किती खर्च केला? शाहांनी वाचला पाढा

| Updated on: Jan 30, 2022 | 8:10 PM

काँग्रेसनं गोव्याला केवळ 432 कोटी दिले होते, भाजपनं 2,567 कोटी दिले!, सगळ्या योजना सांगायला गेलो तर एक सप्ताह लागेल, असे म्हणत त्यांनी काँग्रेसला टोलेबाजी केली आहे.

Goa Elections 2022 : काँग्रेसनं 432 कोटी दिले होते, भाजपनं 2,567 कोटी दिले! गोव्यासाठी किती खर्च केला? शाहांनी वाचला पाढा
अमित शाह यांनी योजनांचा वाचला पाढा.
Follow us on

गोवा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) सध्या गोव्याच्या दौऱ्यावर (Goa Elections 2022) आहेत, गोव्यातला प्रचार सध्या जोरात सुरू आहे. पुन्हा भाजपचे (Bjp) सरकार आणण्यासाठी भाजप नेत्यांची फौज सध्या गोव्यात रात्रीचा दिवस करत आहे. अमित शाह यांनी गोव्यात दाखल होताच, पहिल्याच प्रचारसभेत काँग्रेसवर हल्लाबोल चढवलाय. त्यांनी गोव्यात काय काय केलं याचा पाढा वाचून दाखवाला आहे. काँग्रेसनं गोव्याला केवळ 432 कोटी दिले होते, भाजपनं 2,567 कोटी दिले!, सगळ्या योजना सांगायला गेलो तर एक सप्ताह लागेल, असे म्हणत त्यांनी काँग्रेसला टोलेबाजी केली आहे. छोट्याशा गोव्यात येवढ्या सगळ्या पार्टी का आहेत? अन्य पार्टी येथे आल्या आहेत त्या गोव्याचा विकास नाही करु शकत. काँग्रेसचे सरकार होते अस्थिरता, अराजकता आणि भ्रष्टाचार म्हणून ओळखले जायचे, अशी टीका अमित शाह यांनी केली आहे.

अमित शाह यांनी वाचला पाढा

गोव्यात अमित शाह यांच्या एन्ट्रीने पुन्हा वातावरण तापले आहे, गोव्याचा विकास, लोकांना रोजगार फक्त भाजप देऊ शकते, सरकार फक्त भाजप बनवू शकते. मोदीजींना गोव्याला 2567 कोटी दिले, मोदींजींची निती आहे, प्रदेश जेवढा छोटा तेवढा विकास जास्त, असेही अमित शाह यावेळी म्हणाले आहेत. गोव्याचा विकास भाजप करेल, आधीही भाजपने गोव्याचा विकास केला, मी इथे सगळा हिशोब घेऊन आलो आहे, असे म्हणत अमित शाह यांनी गोव्यात केलेले काम समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

अमित शाह काय म्हणाले?

कोरोना आला तेव्हा सगळ्या मुख्यमंत्र्यांशी बोलणी करत होतो, प्रमोद सावंत यांनी गोव्याला सुरक्षितता प्रदान केली आहे. स्टार्टअपला गोव्यात प्रोत्साहन दिले. वेगळ्या पार्टी आल्यात त्यांना विचारा, गोव्याला काय देणार? ते वचन यासाठी देत आहेत कारण त्यांना माहिती आहे की सरकार स्थापन होणार नाही. त्यामुळे वचन पूर्ण करावे लागणार नाही, असा टोलाही शाह यांनी लगावला आहे. जर त्यांचे सरकार बनले तर अस्थिरता वाढेल, भ्रष्टाचार वाढेल. मोदीजींच्या सरकारने गरींबांच्या घरात शौचायलय असावे त्यासाठी काम केले. विधवांना सहाय्यता निधी गोवा सरकारने दिले सगळे काम सांगत गेलो तर 7 दिवसांचा सप्ताह लागेल असेही शाह म्हणाले आहेत. उरीवर हल्ला केला तेव्हा आतंकवाद्यांना वाटले हे पण मनमोहन सिंगांचे सरकार आहे, मात्र मोदीजींनी सर्जिकल स्ट्राईक केले, मोदीजींनी भारताला सुरक्षित करण्याचे काम केले, हे काम राहुल गांधींची पार्टी करु शकते का? असा सवालही शाह यांनी काँग्रेसला विचारला आहे.

Goa Election 2022 : या निवडणुकीच्या प्रचारातही अमित शाह यांच्याकडून सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख, गोव्यात काय म्हणाले शाह?

मोदी-शहांचा उदय होताच शिवसेना नकोशी का झाली?, तेव्हा पूनम महाजन निर्भयपणे का बोलल्या नाहीत?: राऊत

देश हिंदुत्वाच्या विचाराने नाही गांधी विचाराने चालेल, कोल्हेंबाबत पटोलेंची भूमिका काय?