Goa Election 2022 : या निवडणुकीच्या प्रचारातही अमित शाह यांच्याकडून सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख, गोव्यात काय म्हणाले शाह?

दिनेश दुखंडे

दिनेश दुखंडे | Edited By: दादासाहेब कारंडे, Tv9 मराठी

Updated on: Jan 30, 2022 | 5:36 PM

गोव्यात देवेंद्र फडणवीसांसह इतर भाजप नेते ठाण मांडून बसले आहेत. यावेळी प्रचारसभेत अमित शाह यांनी पुन्हा सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेक केला आहे.

Goa Election 2022 : या निवडणुकीच्या प्रचारातही अमित शाह यांच्याकडून सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख, गोव्यात काय म्हणाले शाह?
अमित शाह यांनी घेतले साईबाबाचे दर्शन

गोवा : देशात सध्या पाच राज्यांच्या निवडणुकांची (Five State Election 2022) रणधुमाळी सुरू आहे. पाच राज्यत सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचारतोफा धडाडत आहेत. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह (Amit Shah) सध्या गोव्यात प्रचाराला पोहोचले आहेत. तर गोवा (Goa Elections 2022) पुन्हा काबीज करण्याची जबाबदारी प्रभारी देवेंद्र फडणवीसांवर देण्यात आली आहे. गोव्यात देवेंद्र फडणवीसांसह इतर भाजप नेते ठाण मांडून बसले आहेत. यावेळी प्रचारसभेत अमित शाह यांनी पुन्हा सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेक केला आहे. मोदींना काय काय कामं केली हे शाह यांनी जनतेला सांगत मतदारांना आपल्याकडे वळण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच मनोहर पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे, छोट्याशा गोव्यात येवढ्या सगळ्या पार्टी का आहेत? अन्य पार्टी येथे आल्या आहेत त्या गोव्याचा विकास नाही करु शकत. काँग्रेसचे सरकार होते अस्थिरता, अराजकता आणि भ्रष्टाचार म्हणून ओळखले जायचे, अशी टीका अमित शाह यांनी केली आहे.

शाह काय म्हणाले?

देशाच्या नकाशात गोवा छोटा दिसतो, पण मी बोलतो की भारत मातेच्या भांगातील बिंदी आहे गोवा, गोव्याचा विकास, लोकांना रोजगार फक्त भाजप देऊ शकते, सरकार फक्त भाजप बनवू शकते. मोदीजींना गोव्याला 2567 कोटी दिले, मोदींजींची निती आहे, प्रदेश जेवढा छोटा तेवढा विकास जास्त, असेही अमित शाह यावेळी म्हणाले आहेत. गोव्याचा विकास भाजप करेल, आधीही भाजपने गोव्याचा विकास केला, मी इथे सगळा हिशोब घेऊन आलो आहे, असे म्हणत अमित शाह यांनी गोव्यात केलेले काम समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

कोरोना आला तेव्हा सगळ्या मुख्यमंत्र्यांशी बोलणी करत होतो, प्रमोद सावंत यांनी गोव्याला सुरक्षितता प्रदान केली आहे. स्टार्टअपला गोव्यात प्रोत्साहन दिले. वेगळ्या पार्टी आल्यात त्यांना विचारा, गोव्याला काय देणार? ते वचन यासाठी देत आहेत कारण त्यांना माहिती आहे की सरकार स्थापन होणार नाही. त्यामुळे वचन पूर्ण करावे लागणार नाही, असा टोलाही शाह यांनी लगावला आहे. जर त्यांचे सरकार बनले तर अस्थिरता वाढेल, भ्रष्टाचार वाढेल. मोदीजींच्या सरकारने गरींबांच्या घरात शौचायलय असावे त्यासाठी काम केले. विधवांना सहाय्यता निधी गोवा सरकारने दिले सगळे काम सांगत गेलो तर 7 दिवसांचा सप्ताह लागेल असेही शाह म्हणाले आहेत. उरीवर हल्ला केला तेव्हा आतंकवाद्यांना वाटले हे पण मनमोहन सिंगांचे सरकार आहे, मात्र मोदीजींनी सर्जिकल स्ट्राईक केले, मोदीजींनी भारताला सुरक्षित करण्याचे काम केले, हे काम राहुल गांधींची पार्टी करु शकते का? असा सवालही शाह यांनी काँग्रेसला विचारला आहे.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI