Goa Assembly Elections : आम आदमी पार्टीचंही काँग्रेसच्या पावलावर पाऊलं, गोव्यात उमेदवारांना दिली शपथ

| Updated on: Feb 02, 2022 | 5:12 PM

गोव्यात काँग्रेसने भाजपला (Goa Assembly election 2022) लागलेली गळती पाहून लगेच सावध पवित्रा घेतला आणि आपल्या उमेदवारांना पक्ष बदलण्याच्या शपथा दिल्या. त्यानंतर आता गोव्यात आम आदमी पार्टीनेही (Aap) काँग्रेसच्या पावलावर पाऊल टाकत, आपल्या सर्व उमेदवारांना अशीच न फूटण्याची शपथ दिली आहे.

Goa Assembly Elections : आम आदमी पार्टीचंही काँग्रेसच्या पावलावर पाऊलं, गोव्यात उमेदवारांना दिली शपथ
आपच्या उमेदवारांनी घेतली शपथ
Follow us on

गोवा : पाच राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या (Five State Elections) तोफा गडागाडत आहेत. निवडणूक जसजशी जवळ येईल तशी या पक्षातून त्या पक्षात आणि त्यापक्षातून या पक्षात कोलांट्याउड्या मारणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे आपला गड ढासळण्याची धास्ती सर्वच राजकीय पक्षांना लागली आहे. गोव्यात काँग्रेसने भाजपला (Goa Assembly election 2022) लागलेली गळती पाहून लगेच सावध पवित्रा घेतला आणि आपल्या उमेदवारांना पक्ष बदलण्याच्या शपथा दिल्या. त्यानंतर आता गोव्यात आम आदमी पार्टीनेही (Aap) काँग्रेसच्या पावलावर पाऊल टाकत, आपल्या सर्व उमेदवारांना अशीच न फूटण्याची शपथ दिली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत पक्षाच्या उमेदवारांना पक्षाशी प्रामाणिक राहण्याची शपथ दिल्याची माहिती देण्यात आली आहे.

कायदेशीर प्रतिज्ञापत्रावरही सह्या घेतल्या

सर्व उमेदवरांच्या कायदेशीर प्रतिज्ञापत्रावर आज सह्या घेतल्याचीही माहिती आम आदमी पार्टीकडून देण्यात आली आहे. महालक्ष्मी मंदिर आणि बांबोळीम क्रॉस येथे हा आम आदमी पार्टीचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला आहे. त्यामुळे इतर पक्षांचं टेन्शन चांगलच वाढलं आहे. निकालानंतर उमेदवार फुटण्याची विरोधी पक्षांना धास्ती लागली आहे. अनेकजण पक्षाला सोडचिठ्ठी देत दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत, तर काहीजण बंड करत अपक्ष लढण्याचा नारा देत आहेत.

गोव्यातली परिस्थितीही याहून वेगळी नाही, उत्तर प्रदेश आणि गोव्यातही नेत्यांचं इकडून तिकडे आणि तिकडून इकडे सुरू आहे. गोव्यात मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी बंड करत अपक्ष लढण्याची घोषणा केल्याने भाजपचे टेन्शन वाढले आहे, फक्त पर्रीकरच नाही तर काही जुन्या नेत्यांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. अशात काँग्रेसने सावध पवित्रा घेतलाय. कारण काँग्रेसने आपल्या उमेदवारांना पक्ष न बदलण्याच्या थेट शपथा दिल्या आहेत. निवडणुकीनंतर होणारे पक्षांतर टाळण्यासाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांना एकनिष्ठतेची शपथ दिली आहे. शपथ घेताना निवडणुकीनंतर पक्षांतर करणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे. काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी अशी शपथ देवी महालक्ष्मी आणि बांबोळीतील क्रॉससमोर घेतली आहे. त्यामुळे याशपथेनंतर तरी गोव्यातली पक्षांतरे थांबतात का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. निवडणुका आल्या की कुठल्याही राज्यात पक्षांतराला उत येतो. ज्याचा राजकीय फायदा जिकडे तिकडे तो नेता जाताना दिसून येतो. महाराष्ट्र विधानसभेच्या आधीही अशीच पक्षांतरे दिसून आली होती.

Goa Assembly Election 2022 : गोव्यासाठी राष्ट्रवादीकडून 24 स्टार प्रचारकांची यादी, शरद पवारांसह कोणते नेते प्रचारासाठी रिंगणात उतरणार?

Nanded महापालिका निवडणुकीच्या हालचाली, यंदा प्रथमच आरक्षणाशिवाय प्रभाग रचना, किती नगरसेवक वाढणार?

Nitesh Rane : नितेश राणे कोर्टासमोर शरण, नितेश राणेंची कोठडी मागणार-सरकारी वकील