AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitesh Rane : नितेश राणे कोर्टासमोर शरण, नितेश राणेंची कोठडी मागणार-सरकारी वकील

भाजप आमदार नितेश राणे कोर्टात शरण येणार असल्याची माहिती नितेश राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली आहे. कोर्टाच्या निर्णयाचा आदर ठेवून मी कोर्टासमोर शरण यायला जातोय. आजपर्यंत राज्य सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने बेकायदेशीररित्या मला अटक करण्याचा प्रयत्न केला, अशी छोटीशी मात्र सूचक प्रतिक्रिया शरण येण्यापूर्वीच नितेश राणे यांनी माध्यमांना बोलताना दिली आहे.

Nitesh Rane : नितेश राणे कोर्टासमोर शरण, नितेश राणेंची कोठडी मागणार-सरकारी वकील
नितेश राणे कोर्टासमोर शरण
| Edited By: | Updated on: Feb 02, 2022 | 3:36 PM
Share

सिंधुदुर्ग : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) कोर्टात शरण येणार असल्याची माहिती नितेश राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली आहे. तर नितेश राणे शरण आल्यास त्यांची कोठडी मागणार असल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात (Santosh Parab Attack Case) नितेश राणेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. आधी तीनवेळा जामीन फेटाळल्यांनंतर चौथ्यांदा काल सत्र न्यायालयाने जामीन फेटळला (Nitesh Rane bail Reject) त्यानंतर राणेंनी पुन्हा हायकोर्टात धाव घेतली आहे. मात्र आज राणेंची वकील सतीश मानेशिंदे यांनी नितेश राणे कोर्टासमोर शरण येणार असल्याची माहिती दिली, त्यामुळे पुन्हा काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच नितेश राणे यांनी आता एक सूचक ट्विट केलं आहे. अमित शाह यांचा फोटो पोस्ट करत समय बलवान है, असे ट्विट नितेश राणे यांच्याकडून करण्यात आल्याने राणेंचा नेमका रोख कुणाकडे आहे? अशा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

नितेश राणेंचं ट्विट

नितेश राणे काय म्हणाले?

कोर्टाच्या निर्णयाचा आदर ठेवून मी कोर्टासमोर शरण यायला जातोय. आजपर्यंत राज्य सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने बेकायदेशीररित्या मला अटक करण्याचा प्रयत्न केला, अशी छोटीशी मात्र सूचक प्रतिक्रिया शरण येण्यापूर्वीच नितेश राणे यांनी माध्यमांना बोलताना दिली आहे. नितेश राणे यांची कोठडी पोलीस मागणार असल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली आहे. त्यामुळे राणेंना आता कोर्ट कोठडी देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. गेल्या अनेक दिवासांपासून राणे जामीन मिळवण्यासाठी कोर्टाच्या फेऱ्या मारत होते, मात्र त्यांना कोणत्याही कोर्टात दिलासा मिळाला नाही, सेशन कोर्टापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत नितेश राणेंच्या पदरी निराशा आली, प्रत्येक ठिकाणी त्यांचा जामीन फेटाळला. त्यामुळे कणकवली कोर्टात आज नितेश राणे शरण आले आहेत.

शिवसैनिक संतोष परब हल्ल्यात नितेश राणे यांचा महत्वपूर्ण सहभाग असल्याचा आरोप नितेश राणे यांच्यावर आहे. याच प्रकरणात सुरूवातीला पोलिसांकडून शोधाशोध सुरू झाल्यावर नितेश राणे काही दिवस अज्ञातवासात होते, मात्र कोर्टाने अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर नितेश राणे तब्बल 15 दिवसांनंतर माध्यमांसमोर आले.

महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुश करण्यासाठी शिवसेनेने सावरकरांचा फोटो लावला नाही, भाजपचा घणाघात

स्वबळावर लढू तयारीला लागा, राज ठाकरेंचे आदेश; महापालिका निवडणुकीसाठी मनसेची रणनिती ठरली

MNS : मनसेची महत्त्वाची बैठक, राज ठाकरेंच्या उपस्थितीत महापालिका निवडणुकीची रणनिती ठरणार

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.