Video | गोवा प्रदेश काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षांच्या नातीनं ओपेरा गायला! प्रियंका गांधीच्या अंगावर काटा उभा राहिला

| Updated on: Feb 07, 2022 | 4:41 PM

काँग्रेसला जास्तीत जास्त जागा मिळाव्या यासाठी राहुल गांधी घरोघरी जात प्रचार करताना दिसून आले. आता प्रियंका गांधीही गोवा पिंजून काढत आहे. यावेळी गोव्यातल्या प्रचारावेळी माजी काँग्रेस अध्यक्षांच्या मुलीने असा भन्नाट ओपेरा (Opera) गायला की प्रियंका गांधी यांच्याही अंगवार काटा उभा राहिला.

Video | गोवा प्रदेश काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षांच्या नातीनं ओपेरा गायला! प्रियंका गांधीच्या अंगावर काटा उभा राहिला
गोवा निवडणूक प्रचारातील विविध रंग
Follow us on

गोवा : गोव्यातला प्रचार अंतिम टप्प्यात आल्याने सध्या प्रचाराचे काही वेगळेही रंग पहायला मिळत आहेत. काँग्रेस नेत्या प्रियंका गाधीही (Priyanka Gandhi) गोव्याच्या प्रचारात (Goa Elections 2022) उतरल्या आहे. भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी काँग्रेस पूर्ण जोर लावत आहे. दोन दिवसांपूर्वीच राहुल गांधीही गोव्यात दिसून आले. भाजपमधील तिकीटवाटपावेळी झालेली पडझड बघून आधीच काँग्रेसने सावध पवित्रा घेत आपल्या उमदवारांना एकनिष्ठतेची शपथ दिली. काँग्रेसला जास्तीत जास्त जागा मिळाव्या यासाठी राहुल गांधी घरोघरी जात प्रचार करताना दिसून आले. आता प्रियंका गांधीही गोवा पिंजून काढत आहे. यावेळी गोव्यातल्या प्रचारावेळी माजी काँग्रेस अध्यक्षांच्या मुलीने असा भन्नाट ओपेरा (Opera) गायला की प्रियंका गांधी यांच्याही अंगवार काटा उभा राहिला. या मुलीने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे.

लक्षवेधी गोवा निवडणूक

गोवा हे राज्य छोटं जरी असली तरी गोव्यातली निवडणूक नेहमीच देशाचं लक्ष वेधून गेते. त्यामुळेच अमित शाह यांनीही गोव्याला भारतमातेच्या भांगातील बिंदी असल्याचे म्हटले आहे. इरेन बॅरोस यांनी प्रियंका यांच्या उपस्थितीत केलेल्या या सुंदर गायनाची देशभर चर्चा आहे. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटरवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. जो सर्वांनाच भूरळ घालतो आहे. तिकडे पंजाबमध्ये राहुल गांधीही निवडणुकीत जोर लावत आहे. काँग्रेसला पुन्हा बळ देण्यासाठी प्रियंका गांधी मैदानात उतरल्या आहे, त्यामुळे गोव्यातलं चित्र काय असेल? हे निवडणुकानंतरच स्पष्ट होईल.

काँग्रेसकडून व्हिडिओ ट्विट

राहुल गांधींवर झेंडा पेकल्याचे प्रकरणही चर्चेत

काँग्रेस नेते राहुल गांधी पंजाबमधील लुधियाना येथे प्रचार फेरीसाठी गेले होते. प्रचारफेरी संपवून येताना त्यांची कार पंजाब काँग्रेसचे नेते सुनील जाखड चालवत होते. राहुल गांधी पुढच्या सीटवर बसले होते. मागच्या सीटवर मुख्यमंत्री चरणजीत चन्नी आणि नवज्योतसिंग सिद्धू बसले होते. राहुल गांधी विमानतळावरून हॉटेलकडे निघाले. तेव्हा रस्त्यावरील अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना हात दाखवायला सुरुवात केली. त्यांनी त्यांचा नमस्कार स्वीकारण्यासाठी गाडीची काच खाली केली. नेमके त्याचवेळी कोणीतरी त्यांच्या कारवर झेंडा फेकला. हा झेंडा राहुल यांच्या तोंडावर लागला. त्यानंतर राहुल यांनी तातडीने काच बंद केली. त्यानंतर सुरक्षा यंत्रणा दक्ष झाली. याही घेटनेने या निवडणुकीत लक्ष वेधून घेतलं आहे.

Rahul Gandhi Security | पंजाबमध्ये राहुल गांधींच्या सुरक्षेत चूक; तरुणाने फेकलेला झेंडा थेट तोंडावर आपटला, विरोधकांच्या हाती कोलीत!

ओवेसींवर गोळ्या झाडणारे हल्लेखोर कोण? किती जण घेतले ताब्यात? अमित शाह यांनी दिलं उत्तर

येणारा काळ इंदिरा गांधींचा असेल हे केरळमधील ‘त्या’ घटनांनी अधिक गडद केले, आणि त्या घटना आहेत तरी कोणत्या…