MNS | असं काय घडलं की मनसेला ट्विट डिलीट करावं लागलं?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सकाळी एक ट्विट केलं होतं. पण ते ट्विट त्यांनी नंतर डिलीट केलं. राज ठाकरे यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीविषयी ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये त्यांनी मतदारांना मराठी उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन केलेलं. पण नंतर त्यांनी ते ट्विट डिलीट करत महत्त्वाची भूमिका मांडली.

MNS | असं काय घडलं की मनसेला ट्विट डिलीट करावं लागलं?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 08, 2023 | 4:52 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Election 2023) पार्श्वभूमीवर बेळगावातील मराठी जनतेला महत्त्वाचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना निवडून द्या, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी सकाळी केलेलं ट्विट अकाउंटवरुन हटवलं आहे. सीमा भागातील मराठी उमेदवारांना निवडून द्या, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं होतं. पण काही तासातच राज ठाकरे यांनी आपली भूमिका बदलली आहे. राज ठाकरे यांनी नेमकी अशी का भूमिका घेतली असावी? अशी चर्चा सुरुवातीला समोर आली. पण नंतर राज ठाकरेंनी भूमिका का बदलली? याबाबतची माहिती समोर आली.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलेला आहे. येत्या 10 मे ला कर्नाटकात मतदान पार पडणार आहे. कर्नाटकात आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. या दरम्यान राज ठाकरे यांनी आज सकाळी एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यांनी मतदारांना मराठी उमेदवाराला निवडून द्या, असं आवाहन केलं.

राज ठाकरे यांचं पहिलं ट्विट काय?

“सीमाभागातील मराठी उमेदवारांना निवडून द्या. मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या. मराठी उमेदवाराने निवडून जाऊन कर्नाटक विधानसभेत आवाज उठवला पाहिजे”, अशी भूमिका राज ठाकरे यांनी पहिल्या ट्विटमध्ये केला होता. राज ठाकरे यांची भूमिका समोर आल्यानंतर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने नाराजी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची नेमकी नाराजी काय?

“मराठी संस्कृतीचा ऱ्हास करणाऱ्या विचारांना किंवा त्या प्रयत्नांना तुम्ही या भूमिकेच्या माध्यमातून खतपाणी घालत आहात. तुम्हाला काय चूक काय बरोबर हे समजलं पाहिजे”, अशा शब्दांत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या ट्विटनंतर राज ठाकरे यांनी आपलं आधीचं ट्विट करत नवी सुधारीत भूमिका मांडणारं ट्विट केलं.

राज ठाकरे यांचं सुधारित ट्विट काय?

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या 10 मे ला मतदान आहे. तिथल्या सीमाभागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना माझं आवाहन आहे की मतदान करताना एकजुटीने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनाच मतदान करा. इतर पक्षांचे उमेदवार मराठी असले तरी ते निवडून आल्यावर मराठी भाषेच्या गळचेपीविरोधात किंवा मराठी माणसांवर सीमाभागात होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात विधानभवनात तोंड उघडणार नाहीत.

तुम्ही ज्या राज्याचे आहात, त्या राज्याची भाषा, तिथली संस्कृती ह्याचा आदर केलाच पाहिजे, ह्या ठाम मताचा मी आहे. सीमाभागात कित्येक पिढ्या राहणारे बांधव कन्नड भाषा आणि इथली संस्कृती ह्याचा मान राखत आले आहेत. पण तरीही तिथलं सरकार जर मराठी माणसांना त्रास देणार असेल, मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न करणार असेल तर ते हे खपवून घेतलं जाणार नाही.

मध्यंतरी जेंव्हा पुन्हा एकदा सीमावदाला कर्नाटक सरकारकडून खतपाणी घालून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता, तेंव्हा मी म्हणलं होतं की कर्नाटक आणि महाराष्ट्रात मुळात एकजिनसीपणा आहे. इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत.

थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. तेंव्हा खरंतर कर्नाटक सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली तर संघर्षाची वेळच येणार नाही. पण कुठल्याही पक्षाचं सरकार तिकडे येऊ दे त्यांच्या वागण्यात यत्किंचितही फरक नसतो. म्हणूनच तिथल्या विधानभवनात मराठी भाषिक आमदार, जो त्या भागातील मराठी अस्मितेचं प्रतिनिधित्व करेल, मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवेल अशी लोकं असायला हवीत.

ह्यासाठी सीमाभागातील लोकांना १० मे ला संधी आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदारच निवडून येतील हे तुम्ही पाहायला हवं, हे तुमच्या आणि पर्यायाने मराठी भाषेच्या हिताचं आहे. ही संधी दवडू नका.

Non Stop LIVE Update
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण.
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं.
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा.
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय.
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त.
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा.
बुलेटचा फायदा मराठी माणसाला की गुजरातला? ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
बुलेटचा फायदा मराठी माणसाला की गुजरातला? ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल.
मतदान केलं अन् सध्याच्या राजकारणावर सुबोध भावेंनी एका वाक्यात म्हटलं..
मतदान केलं अन् सध्याच्या राजकारणावर सुबोध भावेंनी एका वाक्यात म्हटलं...
तरच मतदान करणार...बीडच्या केज तालुक्यातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार
तरच मतदान करणार...बीडच्या केज तालुक्यातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार.
आणि नरेंद्र मोदी मंचावर येऊन रडतात, प्रियंका गांधी यांचा हल्लाबोल
आणि नरेंद्र मोदी मंचावर येऊन रडतात, प्रियंका गांधी यांचा हल्लाबोल.