Phase 4 Lok Sabha Election 2024 : 13 मे रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान; 10 राज्यातील 96 जागांवर मतदान होणार

Lok Sabha Election Schedule 2024 : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आंध्र प्रदेशमध्ये 25, छत्तीसगडच्या 5, झारखंडमधल्या 4, मध्य प्रदेशमधल्या 8, महाराष्ट्रातील 11, ओडिशातल्या 4, तेलंगणामधील 17, उत्तर प्रदेशमधील 13, पश्चिम बंगालच्या 8 जागांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. लोकसभेच्या एकूण 543 जागांचा निकाल 4 जूनला लागणार आहे.

Phase 4 Lok Sabha Election 2024 : 13 मे रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान; 10 राज्यातील 96 जागांवर मतदान होणार
Follow us
| Updated on: Mar 28, 2024 | 2:04 PM

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. लोकसभेच्या एकूण 543 जागांसाठी सात टप्प्यांत निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. 13 मे या दिवशी चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या दिवशी लोकसभेच्या 96 जागांवर मतदान होणार आहे. या चौथ्या टप्प्यासाठी 18 एप्रिलला अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. 25 एप्रिल हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असेल. 26 एप्रिल ला उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. अर्ज मागे घेण्यासाठी 29 एप्रिल ही शेवटची तारीख असेल.

लोकसभा निवडणुकीच्या या चौथ्या टप्प्यात आंध्र प्रदेशमध्ये 25, छत्तीसगडमध्ये 5, झारखंडमध्ये 4, मध्य प्रदेशमध्ये 8, महाराष्ट्रातील 11, ओडिशातील 4, तेलंगणात 17, उत्तर प्रदेशमध्ये 13, पश्चिम बंगालमध्ये 8 जागांसाठी मतदान होणार आहे. लोकसभेच्या एकूण 543 जागांसाठी यंदा निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागेल.

चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान होणार, मतदारसंघांची यादी पाहा…

State Name Constituency Name Phase Date
Andhra Pradesh Amalapuram Phase 4 13-May-24
Andhra Pradesh Anakapalli Phase 4 13-May-24
Andhra Pradesh Anantapur Phase 4 13-May-24
Andhra Pradesh Aruku Phase 4 13-May-24
Andhra Pradesh Bapatla Phase 4 13-May-24
Andhra Pradesh Chittoor Phase 4 13-May-24
Andhra Pradesh Eluru Phase 4 13-May-24
Andhra Pradesh Guntur Phase 4 13-May-24
Andhra Pradesh Hindupur Phase 4 13-May-24
Andhra Pradesh Kadapa Phase 4 13-May-24
Andhra Pradesh Kakinada Phase 4 13-May-24
Andhra Pradesh Kurnool Phase 4 13-May-24
Andhra Pradesh Machilipatnam Phase 4 13-May-24
Andhra Pradesh Nandyal Phase 4 13-May-24
Andhra Pradesh Narasaraopet Phase 4 13-May-24
Andhra Pradesh Narsapuram Phase 4 13-May-24
Andhra Pradesh Nellore Phase 4 13-May-24
Andhra Pradesh Ongole Phase 4 13-May-24
Andhra Pradesh Rajahmundry Phase 4 13-May-24
Andhra Pradesh Rajampet Phase 4 13-May-24
Andhra Pradesh Srikakulam Phase 4 13-May-24
Andhra Pradesh Tirupati Phase 4 13-May-24
Andhra Pradesh Vijayawada Phase 4 13-May-24
Andhra Pradesh Visakhapatnam Phase 4 13-May-24
Andhra Pradesh Vizianagaram Phase 4 13-May-24
Bihar Begusarai Phase 4 13-May-24
Bihar Darbhanga Phase 4 13-May-24
Bihar Munger Phase 4 13-May-24
Bihar Samastipur Phase 4 13-May-24
Bihar Ujiarpur Phase 4 13-May-24
Jammu & Kashmir Srinagar Phase 4 13-May-24
Jharkhand Khunti Phase 4 13-May-24
Jharkhand Lohardaga Phase 4 13-May-24
Jharkhand Palamu Phase 4 13-May-24
Jharkhand Singhbhum Phase 4 13-May-24
Madhya Pradesh Dewas Phase 4 13-May-24
Madhya Pradesh Dhar Phase 4 13-May-24
Madhya Pradesh Indore Phase 4 13-May-24
Madhya Pradesh Khandwa Phase 4 13-May-24
Madhya Pradesh Khargone Phase 4 13-May-24
Madhya Pradesh Mandsour Phase 4 13-May-24
Madhya Pradesh Ratlam Phase 4 13-May-24
Madhya Pradesh Ujjain Phase 4 13-May-24
Maharashtra Ahmednagar Phase 4 13-May-24
Maharashtra Aurangabad Phase 4 13-May-24
Maharashtra Beed Phase 4 13-May-24
Maharashtra Jalgaon Phase 4 13-May-24
Maharashtra Jalna Phase 4 13-May-24
Maharashtra Maval Phase 4 13-May-24
Maharashtra Nandurbar Phase 4 13-May-24
Maharashtra Pune Phase 4 13-May-24
Maharashtra Raver Phase 4 13-May-24
Maharashtra Shirdi Phase 4 13-May-24
Maharashtra Shirur Phase 4 13-May-24
Orissa Berhampur Phase 4 13-May-24
Orissa Kalahandi Phase 4 13-May-24
Orissa Koraput Phase 4 13-May-24
Orissa Nabarangpur Phase 4 13-May-24
Telangana Adilabad Phase 4 13-May-24
Telangana Bhongir Phase 4 13-May-24
Telangana Chevella Phase 4 13-May-24
Telangana Hyderabad Phase 4 13-May-24
Telangana Karimnagar Phase 4 13-May-24
Telangana Khammam Phase 4 13-May-24
Telangana Mahabubabad Phase 4 13-May-24
Telangana Mahbubnagar Phase 4 13-May-24
Telangana Malkajgiri Phase 4 13-May-24
Telangana Medak Phase 4 13-May-24
Telangana Nagarkurnool Phase 4 13-May-24
Telangana Nalgonda Phase 4 13-May-24
Telangana Nizamabad Phase 4 13-May-24
Telangana Peddapalle Phase 4 13-May-24
Telangana Secunderabad Phase 4 13-May-24
Telangana Warangal Phase 4 13-May-24
Telangana Zahirabad Phase 4 13-May-24
Uttar Pradesh Akbarpur Phase 4 13-May-24
Uttar Pradesh Bahraich Phase 4 13-May-24
Uttar Pradesh Dhaurahra Phase 4 13-May-24
Uttar Pradesh Etawah Phase 4 13-May-24
Uttar Pradesh Farrukhabad Phase 4 13-May-24
Uttar Pradesh Hardoi Phase 4 13-May-24
Uttar Pradesh Kannauj Phase 4 13-May-24
Uttar Pradesh Kanpur Phase 4 13-May-24
Uttar Pradesh Kheri Phase 4 13-May-24
Uttar Pradesh Misrikh Phase 4 13-May-24
Uttar Pradesh Shahjahanpur Phase 4 13-May-24
Uttar Pradesh Sitapur Phase 4 13-May-24
Uttar Pradesh Unnao Phase 4 13-May-24
West Bengal Asansol Phase 4 13-May-24
West Bengal Baharampur Phase 4 13-May-24
West Bengal Bardhaman Durgapur Phase 4 13-May-24
West Bengal Bardhaman Purba Phase 4 13-May-24
West Bengal Birbhum Phase 4 13-May-24
West Bengal Bolpur Phase 4 13-May-24
West Bengal Krishnanagar Phase 4 13-May-24
West Bengal Ranaghat Phase 4 13-May-24

16 मार्च ला लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा झाली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यावेळी यंदाच्या निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती दिली. 97 कोटी मतदार लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात 10.5 लाखांहून अधिक मतदान केंद्रे आहेत. यात 55 लाखांहून अधिक ईव्हीएम मशीन या प्रक्रियेसाठी वापरले जाणार आहेत. दरम्यान, 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ 17 जून रोजी संपत आहे, असं राजीव कुमार यांनी सांगितलं.

निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. 1.5 कोटी मतदान अधिकारी आणि सुरक्षा अधिकारी तैनात केले जातील. यंदा 1.82 कोटी तरुण मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक आयोगाने 17 सार्वत्रिक निवडणूक आणि 400 हून अधिक विधानसभा निवडणुका पार पाडल्या आहेत. यंदाची लोकसभानिवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोग मागच्या दोन वर्षांपासून तयारी करत आहे. हा लोकसभेचा उत्सव हा देशाचा अभिमान आहे. भारत हा सर्वात मोठा लोकशाही देश आहे. आणि लोकसभा निवडणूक म्हणजे आपल्या देशाचा लोकशाहीचा उत्सव आहे. ही जगातील सर्वात मोठी निवडणूक आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे, असंही राजीव कुमार म्हणाले.

19 एप्रिलपासून सुरू लोकसभा निवडणुकीला सुरुवात होत आहे. यंदाची निवडणूक ही तीन राजकीय आघाड्यांमध्ये होत आहे. यात भाजप आणि मित्रपक्षांची युती अर्थात एनडीए. काँग्रेससह देशभरातील विरोधी पक्षांची आघाडी असणारी इंडिया आघाडी. याशिवाय या दोन्ही आघाड्यांमध्ये सामील न होणारी तिसरी आघाडी. या तिघांमध्ये ही निवडणूक होणार आहे.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.