निकालानंतर नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांच्यावरून भन्नाट मीम्स व्हायरल

एनडीला 350 पेक्षा जास्त जागांचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला होता. मात्र आतापर्यंत हाती आलेल्या कलांमध्ये एनडीएला बहुमत मिळत असलं तरी एक्झिट पोलइतक्या जागा मिळत नसल्याचं स्पष्ट झालंय. यावरून राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

निकालानंतर नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांच्यावरून भन्नाट मीम्स व्हायरल
सोशल मीडियावर मीम्स व्हायरल
Image Credit source: Twitter
| Updated on: Jun 04, 2024 | 5:18 PM

लोकसभा निवडणुकीच्या निकालात सकाळपासून हाती येणाऱ्या कलांनुसार भाजपाला मोठा फटका बसला आहे. भाजपाला गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदा बहुमतापेक्षा कमी आकडा मिळाला आहे. यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी एनडीएच्या घडक पक्षांवर म्हणजेच जेडीयू आणि टीडीपीवर अवलंबून राहावं लागेल. या आकड्यांच्या खेळामुळेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे एनडीए आणि इंडिया आघाडी या दोघांसाठी महत्त्वपूर्ण बनले आहेत. इंडिया आघाडीकडून नितीश कुमार यांना उपपंतप्रधानपदाची ऑफर देण्यात आल्याचीही चर्चा आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर मीम्सना उधाण आलं आहे. नितीश कुमार यांच्यावरून काही हास्यास्पद मीम्स व्हायरल होत आहेत. हे मीम्स पाहून तुम्हीसुद्धा पोट धरून हसाल!

भाजपला स्वबळावर बहुमत मिळालं नाही तर नितीश कुमार यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. तर दुसरीकडे एनडीच्या नेत्यांनी उद्या दिल्लीत बैठकीचं आयोजन केलं आहे. भाजपकडून घटक पक्षांच्या नेत्यांना संपर्क करण्यास सुरुवात झाली आहे. देशात 298 जागांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीने आघाडी घेतली आहे. यातील 242 जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर इंडिया आघाडीने 226 जागांवर आघाडी मिळवली आहे. त्यामुळे भाजपच्या मित्र पक्षांनी साथ सोडली तर इंडिया आघाडीची सत्तेची दारं खुली होऊ शकतात. त्यामुळे वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.

पहा मीम्स-

लोकसभा निवडणुकीचे आतापर्यंत हाती आलेले निकाल अनेकांना धक्के देणारे आहेत. यंदा 400 हून अधिक जागा मिळतील असा दावा भाजपाकडून करण्यात येत होता. तर एक्झिट पोलमध्येही भाजपाला 340 ते 370 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात चित्र पूर्णपणे वेगळं आहे. म्हणूनच भाजपाचे मित्रपक्ष आणि इंडिया आघाडीतील लहान पक्षांचे भाव वधारले आहेत.