Up Election results 2022 : जिथं शेतकऱ्यांवर भाजपच्या मंत्र्यांच्या पोरानं गाडी घातली तिथं नेमकं कोण जिंकलं?

| Updated on: Mar 10, 2022 | 6:31 PM

आजच्या निकालात पाच पैकी चार राज्यात भाजप नेत्यांचा बोलबालो राहिला आहे. अशातच उत्तर प्रदेशात ज्या लखीमपूर खेरीमध्ये (Lakhimpur Kheri Election result) भाजप मंत्र्यांच्या मुलाने जिथे शेतकऱ्यांवर गाडी चढवली होती,त्या जागेचं काय झालं? तिथे कोण निवडूण आलं? हा सवाल सर्वांच्या मनात होता.

Up Election results 2022 : जिथं शेतकऱ्यांवर भाजपच्या मंत्र्यांच्या पोरानं गाडी घातली तिथं नेमकं कोण जिंकलं?
मंत्रिपुत्र आशिष मिश्रा पुन्हा तुरुंगात
Image Credit source: tv9
Follow us on

उत्तर प्रदेश : आजच्या निवडणूक निकालात उत्तर प्रदेशात (Up election result 2022) भाजपने पुन्हा बाजी मारली आहे. योगींनी (Yogi Adtityanath) जोमाने खिंड लढवत गड राखला आहे. आजच्या निकालात पाच पैकी चार राज्यात भाजप नेत्यांचा बोलबालो राहिला आहे. अशातच उत्तर प्रदेशात ज्या लखीमपूर खेरीमध्ये (Lakhimpur Kheri Election result) भाजप मंत्र्यांच्या मुलाने जिथे शेतकऱ्यांवर गाडी चढवली होती,त्या जागेचं काय झालं? तिथे कोण निवडूण आलं? हा सवाल सर्वांच्या मनात होता. उतर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात विधानसभेच्या ८ जागांपैकी सर्व जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. येथील जागांमध्ये पालिया, निघासन, गोला गोरखनाथ, श्रीनगर, धौरहरा, लखीमपूर, कास्ता आणि मोहम्मदी यांचा समावेश आहे. चौथ्या टप्प्यात 23फेब्रुवारीला मतदान झाले. लखीमपूर खेरी येथील टिकुनिया हिंसाचारानंतर वातावरण बदलले होते. या हिंसाचारात 8 जणांचा मृत्यू झाला होता.

भाजपने सर्व जागा जिंकल्या

चौथ्या टप्प्यातील मतदानात लखीमपूर खेरीमध्ये 62टक्के मतदान झाले. लखीमपूर खेरीमध्ये मागच्या वेळी भाजपने बाजी मारली होती. त्यानंतर शेतकऱ्यांना चिरडल्याची घटना घडली.  अशा स्थितीत शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या या घटनेनंतर भाजपचा मार्ग सोपा नाही, असे सर्वांना वाटत होते.  येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र भाजपने या ठिकाणी बाजी मारली आहे. इथल्या दहाच्या दहा जागा भाजपने जिकल्या आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपे वर्चस्व प्राप्त झाले आहे.

शेतकरी आंदोलनादरम्यानची घटना

गेल्या दोन वर्षात अनेक मोठ्या घडामोडी या जिल्ह्यात घडल्या आहेत. याठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. त्यावेळी भाजपचे मंत्री अजय टेनी मित्रा यांचा मुलगा आशिष मित्रा याने आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांवर गाडी चढवली होती. यात शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर देशभरातून त्यांच्यावर टीका झाली होही. त्यामुळे या निवडणुकीत त्यांचं काय होणार? याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. केंद्राने पास केले तिन्ही कृषी कायदे मागे घेण्यासाठी वर्षभरापेक्षाही जास्त काळ शेतकरी आंदोलन दिल्लीच्या सीमेवर चाललं. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांची माफी मागत तिन्ही कृषी कायदे मागे घेतले. मात्र या दिर्घकाळ चाललेल्या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांचा जीव गेला आहे.

Punjab Election Result 2022 : आधी दिल्लीत इन्कलाब, आज पंजाबमध्ये, उद्या देशभर होणार; केजरीवालांच्या विजयी प्रेस कॉन्फरन्समधील मोठे मुद्दे

TV9 Explainer : देवभूमी उत्तराखंडात राजकारणाचं काही खरं नाही, 12 महिन्यात भाजपला चौथ्यांदा मुख्यमंत्री शोधावा लागणार!

Keshav Prasad Maurya : यूपीचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचा आघाडी पिछाडीचा खेळ, सर्वांचीच धाकधूक वाढली