Keshav Prasad Maurya : यूपीचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचा आघाडी पिछाडीचा खेळ, सर्वांचीच धाकधूक वाढली

सिराथू मतदारसंघातून सपाच्या पल्लवी पटेल (Pallavi Patel) यांनी केशवप्रसाद मौर्य यांच्यावर आघाडी मिळवलीय. त्यामुळं उत्तर प्रदेशमध्ये ही गोव्याची पुनरावृत्ती होणार का हे पाहावं लागेल.

Keshav Prasad Maurya : यूपीचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचा आघाडी पिछाडीचा खेळ, सर्वांचीच धाकधूक वाढली
केशव प्रसाद मौर्य
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 4:46 PM

नवी दिल्ली: उत्तर प्रदेश (Uttar Pradesh Assembly Election Result), उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये भाजपला निर्णायक आघाडी मिळालीय. तर, पंजाबमध्ये आपनं सत्ता मिळवलीय. आजच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांमध्ये दिग्गजांना पराभवाचं तोंड पाहावं लागलंय. पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदरसिंग, मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, नवज्योत सिंग सिद्धू यांना पराभवाला तोंड द्यावं लागलंय. दुसरीकडे उत्तराखंडमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेले हरीश रावत यांचा देखील पराभव झाला. उत्तराखंडमध्ये भाजपचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांचा पराभव झाला आहे. तर, गोव्यातील दोन उपमुख्यमंत्र्यांचा पराभव झाला आहे. तर, उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य (Keshav Prasad Maruya) यांना काही वेळ आघाडी मिळतेय तर ते पुन्हा पिछाडीवर जात आहेत. सिराथू मतदारसंघातून सपाच्या पल्लवी पटेल (Pallavi Patel) यांनी केशवप्रसाद मौर्य यांच्यावर आघाडी मिळवलीय. त्यामुळं उत्तर प्रदेशमध्ये ही गोव्याची पुनरावृत्ती होणार का हे पाहावं लागेल.

केशव प्रसाद मौर्य अजूनही पिछाडीवर

भाजप नेते केशव प्रसाद मौर्य हे मतमोजणी सुरु झाल्यापासून पिछाडीवर आहेत. केशव प्रसाद मौर्य सिराथू मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मौर्य यांच्या विरोधात सपाच्या पल्लवी पटेल निवडणूक लढवत आहेत. पल्लवी पटेल यांनी आतापर्यंच्या आकडेवारीनुसार केशवप्रसाद मौर्य यांच्यावर आघाडी मिळवलीय. पल्लवी पटेल या एक ते दीड हजार मतांनी आघाडीवर आहेत.

ट्विट

गोव्यात उपमुख्यमंत्र्यांचा पराभव

गोव्याचे उपमुख्यमंत्री बाबू उर्फ चंद्रकांत कवळेकर हे काँग्रेस सोडून भाजपात आले होते. त्यांना प्रमोद सावंत सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं होतं. त्यांच्या पराभवानं भाजपला मोठा धक्का बसला आहे. तर, गोव्याचे दुसरे उपमुख्यमंत्री मडगाव मतदारसंघातून बाबू उर्फ मनोहर आजगावकरही चारी मुंड्या चित झाले आहेत. विशेष म्हणजे दोघंही उपमुख्यमंत्री पक्षांतर करुन भाजपात आले होते.

पंजाबमध्ये चन्नींसह, सिद्धू, बादल यांचा पराभव

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी रुपनगर आणि बरनाला दोन जागी निवडणूक लढवली होती. दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू याचा देखील पराभव झाला. तर, शिरोमणी अकाली दलाचे पंजाबच्या सुखबीर सिंह बादल यांचा 13 हजार मतांनी पराभव झाला आहे. तर, प्रकाश बादल यांचा देखील पराभव झाला आहे. उत्तराखंडमध्ये काँग्रेसच्या हरिश रावत यांना पराभवाचा फटका बसलाय.

इतर बातम्या:

UP Assembly Elections 2022: उत्तर प्रदेशातल्या विजयानं योगी आदित्यनाथ आता भाजपाचे नंबर 2 चे नेते झालेत का?

Election Results : मतदारांचा दणका, पंजाबसह उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना पराभवाचा झटका

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.