Punjab Election Result 2022 : आधी दिल्लीत इन्कलाब, आज पंजाबमध्ये, उद्या देशभर होणार; केजरीवालांच्या विजयी प्रेस कॉन्फरन्समधील मोठे मुद्दे

पंजाबचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंजाबमधील मोठ्या विजयानंतर अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत आप कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आज बाबासाहेब आंबेडरकर आणि शहीद भगतसिंग यांचं स्वप्न पूर्ण झाल्याचं म्हटलंय. अरविंद केजरीवाल यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे आपण याठिकाणी पाहणार आहोत.

Punjab Election Result 2022 : आधी दिल्लीत इन्कलाब, आज पंजाबमध्ये, उद्या देशभर होणार; केजरीवालांच्या विजयी प्रेस कॉन्फरन्समधील मोठे मुद्दे
अरविंद केजरीवाल, मनिश सिसोदियाImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 4:42 PM

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतून सीमोल्लंघन करत अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आम आदमी पक्षानं (Aam Adami Party) पंजाबमध्ये (Punjab) आपला झाडू फिरवलाय. सत्ताधारी काँग्रेसला धुळ चारत आपनं पंजाबमध्ये मोठा विजय मिळवलाय. 117 जागांपैकी आप सध्या 92 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस केवळ 18 जागी आघाडीवर आहे. महत्वाची बाब म्हणजे काँग्रेसचे नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी (CharanjitSingh Channi) यांचा दोन्ही मतदारसंघात पराभव झालाय. इतकंच नाही तर पंजाबचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंजाबमधील मोठ्या विजयानंतर अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत आप कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आज बाबासाहेब आंबेडरकर आणि शहीद भगतसिंग यांचं स्वप्न पूर्ण झाल्याचं म्हटलंय. अरविंद केजरीवाल यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे आपण याठिकाणी पाहणार आहोत.

आम आदमी पार्टीने व्यवस्था बदलली

अरविंज केजरीवाल म्हणाले की कॅप्टनसाहेब हरले, चन्नीही हरले, नवज्योतसिंह सिद्धू हरले. हा मोठा विजय आहे. भगतसिंग म्हणाले होते की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण व्यवस्था बदलली नाही तर काही बदललं नाही. पंजाबच्या जनतेनं यावेळी व्यवस्था बदलली आहे. तर आपने देशात व्यवस्था बदलली आहे.

केजरीवाल देशाचा खरा पुत्र

माझ्याविरोधात षडयंत्र रचलं गेलं. केजरीवाल दहशतवादी असल्याचं म्हटलं गेलं. मात्र या निकालातून जनतेनं सांगितलं की केजरीवाल दहशतवादी नाही तर या देशाचा खरा पुत्र आहे, अशा शब्दात केजरीवाल यांनी आपल्या भाषणातून विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

केंद्र सरकारवर जोरदार टीका

केजरीवाल म्हणाले की, आज नव्या भारताचा संकल्प करू. नवा भारत ज्यात द्वेष नसेल, माता-भगिनी सुरक्षित असतील, प्रत्येकाला शिक्षण असेल. आपण असा भारत बनवू, ज्यात अनेक मेडिकल कॉलेज असतील, ज्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना यूक्रेनमध्ये जावं लागणार नाही, अशा शब्दात केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केलीय.

आम आदमी पार्टीत प्रवेश करा

पंजाबमधील विजयानंतर अरविंद केजरीवाल यांनी महिला, युवक, शेतकरी, गरीब जनता अशा सर्वांना आम आदमी पार्टीत प्रवेश करण्याचं आवाहन केलंय. आज मोबाईल रिपेअर करणाऱ्या दुकानात नोकरी करणाऱ्या व्यक्तीने चरणजितसिंह चन्न यांचा पराभव केलाय. आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता नवज्योतने मजीठिया यांचा पराभव केला, सिद्धू यांचाही पराभूत केला. त्यामुळे आता आम आदमी पार्टीत प्रवेश करण्याचं आवाहन केजरीवाल यांनी जनतेला केलंय.

आम्ही द्वेषाचं नाही तर सेवेचं राजकारण करणार

माझे लहान बंधू भगवंत मान यांना पंजाबचा मुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा देतो. संपूर्ण निकाल अजून बाकी आहे. इतकं मोठं बहुमत. लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही, असं केजरीवाल म्हणाले. त्याचबरोबर माझ्या कपड्यांवर टीका झाली. माझ्या रंगाबाबत बोललं गेलं. पण आम्ही द्वेषाचं नाही तर सेवेचं राजकारण करु. त्यासाठी मी हनुमानाचा आशीर्वाद घेतला आहे, असंही केजरीवाल यावेळी म्हणाले.

संपूर्ण भारतात इन्कलाब होईल

आधी दिल्लीत इन्कलाब झाला, आता पंजाबमध्ये इन्कलाब झाला. आता संपूर्ण देशात इन्कलाब होईल, असा दावा करत अरविंज केजरीवाल यांनी आता देशभरात आम आदमी पार्टी निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत.

इतर बातम्या :

Election Result 2022 Live: पंजाबमधील बंपर विजयाने ‘आप’ला लॉटरी, राज्यसभेवर 7 सदस्य निवडून जाणार; वाचा गणित काय?

Assembly Election Result 2022 : उत्तर प्रदेश, गोव्यात शिवसेना सपाटून पडली, संजय राऊत म्हणतात, अजून लढाई संपली नाही !

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.