West Bengal Election 2021 : यंदा M फॅक्टर कुणाच्या पारड्यात?

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची (West Bengal Election 2021) रंगत वाढत आहे. आपआपल्या मतदारांना लक्ष्य करुन प्रचाराला धार दिली जात आहे.

West Bengal Election 2021 : यंदा M फॅक्टर कुणाच्या पारड्यात?
MAMTA Banerjee Suvendu Adhikari

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची (West Bengal Election 2021) रंगत वाढत आहे. आपआपल्या मतदारांना लक्ष्य करुन प्रचाराला धार दिली जात आहे. बंगालमध्ये मुस्लिम मतदारांनी सत्ताधाऱ्यांना साथ दिल्याचं चित्र आतापर्यंत पाहायला मिळतं. वर्ष 2011 च्या जनगणनेनुसार पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम लोकसंख्या 27.01 टक्के आहे. जी पूर्ण देशात तिसऱ्या नंबरवर आहे. मुस्लिम लोकसंख्या असलेल्या राज्यात जम्मू काश्मीर (68.31%) आणि आसाम (34.22%) दुसऱ्या क्रमांकावर आहे. (Muslim voter is gamechanger West Bengal Election 2021 Mamata Banerjee vs Suvendu Adhikari )

पश्चिम बंगालमध्ये 1977 मध्ये डाव्या आघाडीने काँग्रेसचा पराभव करुन सत्ता काबिज केली. त्यावेळी मुस्लिम मतदारांनी 1977 पासून 2006 पर्यंत डाव्यांची साथ दिली. मात्र 2008 मध्ये पंचायत निवडणुकांमध्ये याला ब्रेक लागला. मुस्लिम मतदार हे ममता बॅनर्जींचा पक्षा तृणमूल काँग्रेसकडे आकर्षित झाला. त्याचाच परिणाम म्हणून ममता बॅनर्जींच्या “मां माटी आणि मानुष’ला साथ दिली आणि त्यांना 2011 मध्ये सत्तेच्या चाव्या दिल्या.

भाजपचं स्वप्न  

बंगालच्या राजकीय इतिहासात 2019 पर्यंत भाजपला इथे सत्ता स्थापन करणे एका स्वप्नाप्रमाणे होतं. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत 294 पैकी केवळ 3 जागा भाजपला मिळाल्या होत्या. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळालं. लोकसभेच्या 42 जागांपैकी 18 जागांवर विजय मिळवून, भाजपने विधानसभेच्या निवडणुकीसाठी हुंकार भरला. भाजपच्या खात्यात 40.64 % मतं पडली. त्यावेळी सत्ताधारी तृणमूलने 22 जागांवर विजय मिळवला. म्हणजे भाजपपेक्षा केवळ चार जागाच जास्त मिळाल्या. त्यावेळी भाजपने बंगालमध्ये नारा दिला होता, “उन्नीशे हॉफ, एकुशे साफ” म्हणजेच 2019 मध्ये हाफ तर 2021 मध्ये पूर्ण साफ.

मुस्लिम मतांचं महत्त्व

बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात सामना होईल असं चित्र होतं. मात्र आता इंडियन सेक्युलर फ्रंटने (ISF) दोन्ही पक्षांची डोकेदुखी वाढवली आहे. ISF ने डावे आणि काँग्रेसला साथ दिली आहे. दुसरीकडे बिहारमध्ये धमाका करणाऱ्या असदुद्दीने ओवेसी यांच्या MIM ने बंगालमध्येही निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं आहे. या सर्वांचं लक्ष मुस्लिम मतदारांवर आहे.

2019 मधील आकड्यांचं गणित

पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभा मतदारसंघापैकी 149 मतदारसंघात 20 टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम मतदार आहेत.

या 149 मतदारसंघांची फोड करायचं झाल्यास 57 मतदारसंघात 40 टक्के मुस्लिम मतदारांचा प्रभाव आहे. 2019 मध्ये या 57 पैकी 45 मतदारसंघात आघाडी मिळाली होती.

नंदीग्राममध्ये सर्वात मोठी लढाई

नंदीग्राम हा शुभेंदू अधिकारी यांचा बालेकिल्ला आहे. शुंभेदू अधिकारी हे ममतांसोबत होते, त्यावेळी हा तृणमूलचाही बालेकिल्ला समजला जात असे. मात्र आता शुभेंदू अधिकारी भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे आता या तृणमूलच्या बालेकिल्ल्यात शुभेंदू अधिकारी विरुद्ध ममता बॅनर्जी अशी थेट लढत होणार आहे. देशातील सर्वात मोठी अशी ही लढाई असेल.

शुभेंदू यांचा ममतांना विरोध का?

नंदीग्राम आंदोलनाने ममतांना सत्तेच्या सिंहासनावर बसवलं. या आंदोलनात शुभेंदू अधिकारी नायक म्हणून उदयाला आले. आता तेच शुभेंदू अधिकारी 2021 च्या निवडणुकीत ममतांसोबत नाहीत. शुभेंदू हे TMC सोडून BJP मध्ये दाखल झाले आहेत. इतकंच नाही तर ममतांवर त्यांनी हल्ला चढवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ज्या नंदिग्रामच्या मुद्द्यावरुन ममता सत्तेत आला, आता त्याच आंदोलनाचा नायक ममतांना विलन ठरवत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यात मतदान

पहिला टप्पा – 27 मार्च, 30 जागा
दुसरा टप्पा – 1 एप्रिल, 20 जागा
तीसरा टप्पा – 6 एप्रिल, 31 जागा
चौथा टप्पा – 10 एप्रिल, 44 जागा
पाचवा टप्पा – 17 एप्रिल, 45 जागा
सहावा टप्पा – 22 एप्रिल, 43 जागा
सातवा टप्पा – 26 एप्रिल, 36 जागा
आठवा टप्पा – 29 एप्रिल, 25 जागा
मतमोजणी आणि निकाल – 2 मे रोजी

बंगालमधील पक्षीय बलाबल (2016)

तृणमूल काँग्रेस -219
काँग्रेस -23
डावे – 19
भाजप – 16
एकूण – 294

संबंधित बातम्या   

बंगालमध्ये काँग्रेसला पवारांचीच धास्ती, प्रचाराला येऊ नका, काँग्रेस नेत्याचं पत्र 

बंगालमध्ये भाजपची भाजपशीच लढाई; बाहेरच्यांना तिकीट दिल्याने कार्यकर्ते रस्त्यावर

(Tv9 Election Intelligence And Research Wing)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI