Miss India USA 2022: भारतीय वंशाच्या आर्या वाळवेकरने जिंकला ‘मिस इंडिया यूएसए’चा किताब

| Updated on: Aug 08, 2022 | 9:22 AM

तीस राज्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या 74 स्पर्धकांनी 'मिस इंडिया यूएसए', 'मिसेस इंडिया यूएसए' आणि 'मिस टीन इंडिया यूएसए' या तीन वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला होता.

Miss India USA 2022: भारतीय वंशाच्या आर्या वाळवेकरने जिंकला ‘मिस इंडिया यूएसए’चा किताब
आर्या वाळवेकरने जिंकला ‘मिस इंडिया यूएसए’चा किताब
Image Credit source: Instagram
Follow us on

व्हर्जिनिया (Virginia) इथल्या भारतीय अमेरिकन आर्या वाळवेकर (Aarya Walvekar) हिने यावर्षी ‘मिस इंडिया यूएसए 2022’चा (Miss India USA 2022) किताब पटकावला आहे. 18 वर्षीय आर्याला न्यू जर्सी इथं पार पडलेल्या वार्षिक स्पर्धेत ‘मिस इंडिया यूएसए 2022’चा मुकुट परिधान करण्यात आला. सौंदर्यस्पर्धेचं विजेतेपद पटकावल्यानंतर अभिनेत्री बनण्याची आकांक्षा बाळगणारी आर्या म्हणाली, “स्वत:ला मोठ्या पडद्यावर पाहणं, चित्रपट किंवा टेलिव्हिजनमध्ये काम करणं हे माझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं.” या सौंदर्यस्पर्धेत व्हर्जिनिया विद्यापिठाची विद्यार्थिनी सौम्या शर्मा ही दुसऱ्या क्रमांकावर होती तर न्यू जर्सीची संजना चेकुरी तिसऱ्या क्रमांकावर होती.

या वर्षी या स्पर्धेचा 40 वा वर्धापन दिन असून भारताबाहेर आयोजित करण्यात येणारी ही सर्वात जास्त काळ चालणारी भारतीय विजेतेपद स्पर्धा आहे. वर्ल्डवाईड पेजेंट्सच्या बॅनरखाली ही स्पर्धा प्रथम न्यूयॉर्कमधील भारतीय-अमेरिकन धर्मात्मा आणि नीलम सरन यांनी आयोजित केली होती. “गेल्या काही वर्षांत जगभरातील भारतीय समुदायाकडून मला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल मी कृतज्ञ आहे”, अशी प्रतिक्रिया धर्मात्मा सरन यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

अक्षी जैनने जिंकला ‘मिसेस इंडिया यूएसए’चा किताब

वॉशिंग्टनमधील अक्षी जैन यांनी ‘मिसेस इंडिया यूएसए’ आणि न्यूयॉर्कच्या तन्वी ग्रोव्हरने ‘मिस टीन इंडिया यूएसए’चा किताब जिंकला. तीस राज्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या 74 स्पर्धकांनी ‘मिस इंडिया यूएसए’, ‘मिसेस इंडिया यूएसए’ आणि ‘मिस टीन इंडिया यूएसए’ या तीन वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. या तिन्ही श्रेणीतील विजेत्यांना पुढील वर्षीच्या सुरुवातीला याच गटाद्वारे आयोजित ‘वर्ल्डवाईड पेजंट्स’मध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईला जाण्याची संधी मिळेल. गायिका शिबानी कश्यप, ‘मिस इंडिया वर्ल्डवाइड 2022’ खुशी पटेल आणि ‘मिसेस इंडिया वर्ल्डवाइड’ स्वाती विमल या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.