22 वर्षे जुना कल्ट क्लासिक मालिका, जिला मिळाला सर्वात कमी TRP, पण आता OTT वर टॉपमध्ये, IMDb रेटिंग जबरदस्त

टीव्हीवरील काही मालिका सुरुवातीला अपेक्षित टीआरपी मिळवू शकल्या नाहीत, पण काळाच्या ओघात त्यांना ‘कल्ट क्लासिक’चा दर्जा मिळाला. अशाच एका मालिकेबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

22 वर्षे जुना कल्ट क्लासिक मालिका, जिला मिळाला सर्वात कमी TRP, पण आता OTT वर टॉपमध्ये, IMDb रेटिंग जबरदस्त
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 13, 2026 | 3:37 PM

Tv Show: नशीबाचा खेळ असतो अस म्हणतात असच काहीसे टीव्ही मालिकांमध्ये घडताना दिसत आहे. काही वर्षांपूर्वी एक मालिका जी प्रेक्षकांना आवडली नाही त्यामुळे तिचा TRP देखील प्रचंड कमी झाला. पण आता तिच मालिका ओटीटीवर पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत.

2004 साली दूरदर्शनवर प्रसारित झालेली साराभाई वर्सेस साराभाई ही मालिका सुरुवातीला फारशी टीआरपी मिळवू शकली नाही. परिणामी पहिल्या भागानंतर ही मालिका बंद करण्यात आली. मात्र आज हीच मालिका प्रेक्षकांची आवडती ठरली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवरही ती मोठ्या उत्साहाने पाहिली जाते. या मालिकेचे दिग्दर्शन देवेन भोजानी आणि आतिश कपाड़िया यांनी केले होते. मालिकेत सतीश शाह, रत्ना पाठक शाह, सुमीत राघवन, रूपाली गांगुली आणि राजेश कुमार यांसारख्या दिग्गज कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या.

या मालिकेची कथा एका श्रीमंत गुजराती कुटुंबाभोवती फिरते. घरातील प्रमुख महिला उच्चभ्रू, ‘हाय-सोसायटी’ विचारसरणीची असते तर तिची सून साध्या मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतून आलेली असते. या दोघींमधील विचारांचा फरक आणि सतत होणारी टोलेबाजी ही मालिकेची खासियत होती. घरातील वडीलांची व्यक्तिरेखा कायम हलक्याफुलक्या स्वभावाची असून कुटुंबातील तणाव संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसते. मुलगा डॉक्टर असूनही अनेकदा घरातील विनोदी प्रसंगांमध्ये अडकतो. प्रत्येक भागात एखादी छोटीशी घटना मोठ्या आणि मजेदार परिस्थितीत रूपांतरित होत असते.

टीआरपी कमी पण लोकप्रियता अफाट

प्रदर्शित होणाच्या काळात मालिकेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. पहिल्या सिझननंतर ती थांबवण्यात आली. मात्र काळ बदलला तसतसे सोशल मीडियावर मालिकेतील संवाद आणि व्हिडीओ व्हायरल होऊ लागले. प्रेक्षकांनी पुन्हा एकदा या पात्रांवर आणि त्यांच्या वेगळ्या बोलण्याच्या शैलीवर प्रेम व्यक्त केले. एकूण 79 भाग असलेल्या या मालिकेला आज IMDb वर तब्बल 8.8 अशी प्रभावी रेटिंग मिळाली आहे.

एकंदरीत, ‘साराभाई वर्सेस साराभाई’ ही मालिका आजही भारतीय टेलिव्हिजन इतिहासातील सर्वात आवडत्या सिटकॉमपैकी एक मानली जाते. विनोद, संवाद आणि लक्षात राहणारी पात्रे यामुळे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी स्थान मिळवले आहे.