AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवरात्रीत आजही गाजतं सलमान खान-ऐश्वर्याचं ‘हे’ गाणं; 27 वर्षांनंतरही क्रेझ कायम, प्रत्येकजण ऐकू येताच धरतो ठेका

27 वर्षानंतर देखील गरब्याची शान आहे सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचं हे गाणं. इतकं सुपरहिट की प्रत्येक गरबा आणि दांडियामध्ये पहिल्यांदा ऐकायला मिळतं.

नवरात्रीत आजही गाजतं सलमान खान-ऐश्वर्याचं ‘हे’ गाणं; 27 वर्षांनंतरही क्रेझ कायम, प्रत्येकजण ऐकू येताच धरतो ठेका
Salman AishwaryaImage Credit source: Social media
| Updated on: Sep 26, 2026 | 3:07 PM
Share

बॉलिवूडमधील काही चित्रपट आणि गाणी अशी आहेत, ज्यांची जादू वर्षानुवर्षे कायम राहते. 1999 मध्ये प्रदर्शित झालेला संजय लीला भन्साळी यांचा ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपटही त्यापैकीच एक. सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या जोडीने या चित्रपटाला विशेष लोकप्रियता मिळवून दिली. चित्रपटातील कथेसोबतच त्यातील गाणीही आजवर प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.

या चित्रपटातील ‘ढोली तारो ढोल बाजे’ हे गाणं आजही गरबा आणि दांडिया नाईटची रंगत वाढवताना पाहायला मिळतं. तब्बल 27 वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. नवरात्रोत्सवात गरबा खेळताना अनेक ठिकाणी हे गाणं आवर्जून वाजवलं जातं.

गुजराती लोकसंगीताचा सुंदर रंग

‘ढोली तारो ढोल बाजे’मध्ये गुजराती लोकसंगीताचा आणि पारंपरिक गरब्याचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो. ढोलाची दमदार थाप, रंगीबेरंगी वेशभूषा आणि सलमान-ऐश्वर्याचा उत्साहपूर्ण डान्स यामुळे हे गाणं विशेष लक्षवेधी ठरलं. गाण्यातील संगीत, बोल, नृत्य आणि भव्य सेट यांचा सुरेख मेळ साधण्यात आला आहे.

चित्रपटाची कथा आणि वातावरण गुजरातशी जोडलेलं असल्याने गाण्यातील गुजराती लोकसंस्कृतीही कथानकाला साजेशी ठरली. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा गुजरात आणि गरब्याशी असलेला जवळचा संबंधही या गाण्याच्या सादरीकरणातून दिसून येतो.

सलमान-ऐश्वर्याची केमिस्ट्री ठरली खास

या गाण्यात सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. दोघांची केमिस्ट्री, पारंपरिक वेशभूषा आणि उत्साही गरबा यामुळे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. आजही गरबा खेळताना तरुणाईपासून ज्येष्ठांपर्यंत अनेकजण या गाण्यावर थिरकताना दिसतात.

‘ढोली तारो ढोल बाजे’ हे जवळपास सहा मिनिटांचं गाणं असून कविता कृष्णमूर्ती, विनोद राठोड आणि करसन सागठिया यांनी ते गायलं आहे. या गाण्याला इस्माईल दरबार यांनी संगीत दिलं असून गीतकार महबूब आहेत. तर गाण्याची कोरिओग्राफी वैभवी मर्चंट यांनी केली होती.

आजही ‘ढोली तारो ढोल बाजे’ची लोकप्रियता पाहता हे गाणं केवळ 1999 सालचा हिट डान्स नंबर राहिलेलं नाही तर बॉलिवूड आणि गुजराती गरबा संस्कृती यांच्यातील एक लोकप्रिय दुवा बनलं आहे. नवरात्री आणि गरबा म्हटलं की या गाण्याची आठवण होणं, हीच त्याच्या दीर्घकाळ टिकलेल्या लोकप्रियतेची खासियत आहे.

Follow Us
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप