39 वर्षांय अभिनेत्री, जिने दिला फक्त 1 ब्लॉकबस्टर, बेस्ट फ्रेंडला धोका देत केलं लग्न, आता फ्लॉप अभिनेत्री म्हणून ओळख

बॉलिवूडमधील 39 वर्षीय अभिनेत्री जिने करिअरमध्ये दिला फक्त 1 ब्लॉकबस्टर चित्रपट. बेस्ट फ्रेंडला दिला धोका. परत लागला फ्लॉप अभिनेत्रीचा टॅग.

39 वर्षांय अभिनेत्री, जिने दिला फक्त 1 ब्लॉकबस्टर, बेस्ट फ्रेंडला धोका देत केलं लग्न, आता फ्लॉप अभिनेत्री म्हणून ओळख
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 28, 2026 | 5:50 PM

ब्रिटिश वंशाची अभिनेत्री आणि मॉडेल हेजल कीच हिंदी चित्रपटसृष्टीत फारशी झळकली नसली तरी तिची ओळख नेहमीच वेगळी आणि खास राहिली आहे. तिच्या आयुष्यात तब्बल तीन वेगवेगळी नावे जोडली गेली आहेत आणि हाच तिच्या प्रवासातील सर्वात रंजक भाग मानला जातो. एक साधी मुलगी ते मॉडेल नंतर अभिनेत्री आणि पुढे भारतीय क्रिकेटपटूची पत्नी असा तिचा प्रवास अनेक चढ-उतारांनी भरलेला आहे.

हेजल कीचचा जन्म 28 फेब्रुवारी 1987 रोजी इंग्लंडमधील Essex येथे झाला. तिचे वडील ब्रिटिश तर आई भारतीय वंशाची आहे. लहानपणापासूनच तिला नृत्य आणि रंगमंचाची आवड होती. शालेय जीवनात तिने अनेक स्टेज शोमध्ये सहभाग घेतला. तिने इंडियन क्लासिकल आणि वेस्टर्न कंटेम्पररी डान्सचे प्रशिक्षणही घेतले.

मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात

वयाच्या 18 व्या वर्षी हेजल भारतात फिरण्यासाठी आली होती. याच काळात तिला मॉडेलिंगची ऑफर मिळू लागली आणि तिने भारतातच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल टाकताच एका एजन्सीने तिचे नाव बदलून ‘रोज डॉन’ असे ठेवले. या नावाने तिने अनेक जाहिराती आणि म्युझिक व्हिडिओ केले.

नंतर तिने पुन्हा आपले मूळ नाव स्वीकारले आणि चित्रपटांमध्ये हेजल कीच म्हणून ओळख मिळवली. भारतीय क्रिकेटपटू Yuvraj Singh याच्याशी विवाह केल्यानंतर शीख परंपरेनुसार त्यांनी ‘गुरबसंत कौर’ हे नाव धारण केले. त्यामुळे तिच्या आयुष्यात तिसरे नाव जोडले गेले. म्हणूनच तिला ‘तीन नावांची अभिनेत्री’ असेही म्हटले जाते.

चित्रपट आणि रिअॅलिटी शोमधील उपस्थिती

चित्रपटसृष्टीत तिला खरी ओळख 2011 साली प्रदर्शित झालेल्या Bodyguard या चित्रपटातून मिळाली. या चित्रपटात तिने सहाय्यक भूमिका साकारली होती. कथानकात तिच्या व्यक्तिरेखेमुळे मैत्री आणि प्रेम यांमध्ये गुंतागुंत निर्माण होते.

याआधी ती तमिळ चित्रपट Billa मधील एका डान्स नंबरमुळे चर्चेत आली होती. काही अन्य चित्रपटांमध्येही तिने लहान भूमिका केल्या. मात्र ती मोठी स्टार बनू शकली नाही. याशिवाय ती लोकप्रिय रिअॅलिटी शो Bigg Boss 7 मध्येही झळकल्या होती. मात्र या शोमधील तिचा प्रवास फार काळ टिकला नाही.

 

Follow Us