
‘बिग बॉस 19’ चा शोची धमाकेदार एन्ट्री झालेली आहे. सलमान खान सुद्धा पुन्हा आपल्या हटके स्टाईलने शो होस्ट करण्यास सज्ज आहे. यावेळी सलमानची एन्ट्री एका वेगळ्या पद्धतीने करण्यात आली. त्याने स्टेजवर न जाता आधी घरात गेला आणि बिग बॉससोबत यंदाच्या सीझनच्या थीमबद्दल संवाद साधला. तेव्हा बिग बॉसने या सीझनमध्ये प्रेक्षक आणि स्पर्धकांना काय वेगळं पाहायला मिळणार याबद्दल सांगितलं आहे.
बिग बॉसने जे बदल या सीझनमध्ये सांगितले तसं याधीच्या सीझनमध्ये कधीही घडलं नव्हतं. पहिल्यांदाच असे रंजक बदल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. हे बदल ऐकून सलमानलाही आश्चर्य वाटलं. जाणून घेऊयात ते नक्की कोणते बदल आहेत.
खेळाची सुत्रे बिग बॉसच्या हाती नसणार
यावेळी रणांगणाची सूत्रे म्हणजे खेळाची सुत्रे पूर्णपणे घरातील सदस्यांच्या हातात असणार आहेत. आता घरातील सदस्यच ठरवणार आहेत की त्यांना प्रतिस्पर्ध्याकडून विजय हिसकावून घ्यायचा आहे की त्यांच्यावर हल्ला करायचा आहे. म्हणजे यावेळी ‘बिग बॉस’मधील सर्व कामे आणि उपक्रम स्पर्धकांच्या हातात सोपवणार आहेत. ‘बिग बॉस’ने रणांगणातून आपले नियंत्रण काढून घेतले आहे.
Swag se karenge Bigg Boss 19 ka swagat 😎✨
Dekhiye #BiggBoss19 Grand Premiere, streaming now on #JioHotstar aur raat 10:30 baje @ColorsTV par.#BiggBossOnJioHotstar #BB19OnJioHotstar pic.twitter.com/LJmoXZmwW7
— JioHotstar Reality (@HotstarReality) August 24, 2025
लिव्हिंग एरियामध्ये होणारं मार्गदर्शन सेशन
कधी सलमान खान तर कधी बिग बॉसने सर्व घरातील सदस्यांना लिव्हिंग एरियामध्ये बसवून मार्गदर्शन केलेलं आपण सर्वांनी पाहिलं असेल. दोघांनीही स्पर्धकांना योग्य मार्ग दाखवला आहे, पण यावेळी तसे होणार नाही. आता या सीझनमध्ये घरातील सदस्य त्यांच्या समस्या स्वतः सोडवताना दिसणार आहेत. याबाबत सलमान खानने देखील बिग बॉसच्या या निर्णयाला सहमी दिली आहे.
किचन ड्यूटी
‘बिग बॉस’च्या स्वयंपाकघर इतर सर्व जागांपेक्षा चर्चेत राहिलेली जागा आहे. कारण कोणतीही भांडणे असोत, अगदी खाण्यावरूनही का असेनात पण त्याचे सर्व प्लानिंग हे किचनमध्येच होताना बऱ्याचदा पाहायला मिळाले आहेत. यावेळी ‘बिग बॉस’ तिथेही फार लक्ष देणार नसणार आहेत. त्यामुळे स्पर्धकांना आता तिथेही आपला कस लावाला लागणार आहे.
बेडरूम
बेडरूम ही अशी जागा आहे जिथे अनेक गोष्टींवर चर्चा केली जाते आणि अनेक गुपिते लपलेली असतात. ‘बिग बॉस’ ने स्वतः अनेक वेळा त्या उघड केल्या आहेत, पण यावेळी त्यांनी हे काम देखील घरातील सदस्यांवर सोपवले आहे. याचा अर्थ यावेळी या घराभोवती बिग बॉसची नजर असेल पण हस्तक्षेप फारसा पाहायला मिळणार नाही.
बिग बॉसच्या या निर्णयामुळे घरातील सदस्य कशापद्धतीने सगळी परिस्थिती हाताळणार हे पाहणे स्पर्धकांसाठी, स्वत: बिग बॉससाठी आणि प्रेक्षकांसाठी देखील रंजक राहणार आहे. तसेच आता रोज काय नवीन ड्रामा पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षकदेखील तेवढेच उत्सुक आहेत.