59 रोमँटिक गाणं, जे ऐकताच मनाला मिळतो खास सुकून, आजही तितकच लोकप्रिय

‘इंडियन आयडल’च्या मंचावर आशा पारेख यांनी राजेश खन्नांच्या आठवणींना दिला उजाळा; सांगितला त्यांच्या सुरुवातीच्या काळातील खास किस्सा.

59 रोमँटिक गाणं, जे ऐकताच मनाला मिळतो खास सुकून, आजही तितकच लोकप्रिय
Image Credit source: Social media
| Updated on: Jun 01, 2026 | 3:07 PM

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख लवकरच लोकप्रिय संगीत रिअॅलिटी शो Indian Idol च्या आगामी भागात पाहुण्या म्हणून सहभागी होणार आहेत. या विशेष भागात त्यांनी दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याशी संबंधित अनेक आठवणी आणि किस्से प्रेक्षकांसोबत शेअर केले. शोचा प्रोमो सोशल मीडियावर समोर आल्यानंतर या आठवणींची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

कार्यक्रमादरम्यान स्पर्धक मिस्सी बसूने 1967 मधील गाजलेल्या ‘आजा पिया तोहे प्यार दूं’ या गाण्यावर सुंदर सादरीकरण केले. हे गाणे ऐकताच आशा पारेख जुन्या आठवणींमध्ये रमल्या आणि त्यांनी ‘बहारों के सपने’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी घडलेला एक रंजक प्रसंग सांगितला.

सुरुवातीला खूपच लाजाळू होते राजेश खन्ना

आशा पारेख यांनी सांगितले की, ‘बहारों के सपने’च्या चित्रीकरणाच्या काळात राजेश खन्ना चित्रपटसृष्टीत नवीन होते. त्यांची कारकीर्द नुकतीच सुरू झाली होती आणि त्यांना अद्याप फारशी प्रसिद्धी मिळाली नव्हती. त्या काळात ते अत्यंत शांत आणि लाजाळू स्वभावाचे होते. सेटवर ते फार कमी बोलत असत आणि लोकांशी सहज मिसळतही नसत.

मात्र कालांतराने परिस्थिती बदलली. अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम करताना दोघांमध्ये चांगली मैत्री निर्माण झाली. एकमेकांसोबत बराच वेळ घालवल्यामुळे ते एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजू लागले आणि वैयक्तिक आयुष्यातील सुख-दुःखाच्या गोष्टीही एकमेकांशी शेअर करू लागले.

‘आजा पिया तोहे प्यार दूं’

‘आजा पिया तोहे प्यार दूं’ हे गाणे ‘बहारों के सपने’ या चित्रपटातील आहे. या गीताला लता मंगेशकर यांनी स्वर दिले होते तर संगीत R. D. Burman यांनी दिले होते. गीतकार मजरूह सुलतानपुरी यांनी या गाण्याचे शब्द लिहिले होते. चित्रपटात आशा पारेख आणि राजेश खन्ना यांची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती.

चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक दशके उलटून गेली असली तरी ‘आजा पिया तोहे प्यार दूं’ हे गाणे आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि सदाबहार रोमँटिक गीतांपैकी एक मानले जाते. ‘इंडियन आयडल’च्या मंचावर आशा पारेख यांनी सांगितलेल्या या आठवणींमुळे प्रेक्षकांना हिंदी सिनेसृष्टीच्या सुवर्णकाळाची पुन्हा एकदा सफर घडणार आहे.

Follow Us